Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाशिक रिंग रोडचे काम लवकर पूर्ण करा; शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे फडणवीसांचे निर्देश

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक रिंग रोड प्रकल्पाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली. शेतकऱ्यांच्या भूसंपादनाच्या प्रश्नांना प्राधान्य देत योग्य मोबदला देण्यासह रिंग रोडचे काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

  • By विवेक
Updated On: Jul 10, 2026 | 07:45 PM
नाशिक रिंग रोडचे काम लवकर पूर्ण करा; शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे फडणवीसांचे निर्देश

नाशिक रिंग रोडचे काम लवकर पूर्ण करा; शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे फडणवीसांचे निर्देश

Follow Us
Follow Us:
  • नाशिक रिंग रोडचे काम गतीने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
  • भूसंपादनात शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यावर भर
  • रिंग रोड परिसरातील जमिनींच्या व्यवहारांची चौकशी करण्याचे आदेश
 

मुंबई, दि. 10: नाशिक येथे होऊ घातलेला सिंहस्थ कुंभमेळा दृष्टिपथात ठेवून पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आली आहेत. त्यादृष्टीने नाशिक ‘रिंग रोड’ प्रस्तावित करण्यात आला आहे. या रस्त्यांसाठीच्या भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवत ‘रिंग रोड’चे काम पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात या संदर्भात आयोजित बैठकीत दिले.

भूसंपादनाचा मोबदला देताना ज्या क्षेत्राचे (झोन) खरेदीखत भूसंपादनापूर्वी सबंधित गावामध्ये असेल, त्या संपूर्ण गावाला त्या क्षेत्राचा भूसंपादनाचा दर लागू करावा, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

बैठकीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, आमदार देवयानी फरांदे,आमदार माणिकराव कोकाटे, आमदार सरोज अहिरे, आमदार राहुल ढिकले, डॉ. राहुल आहेर उपस्थित होते.

अजित पवार विमान अपघात प्रकरणात मोठी अपडेट; ब्लॅक बॉक्सची माहिती मिळाली, फडणवीसांनी दिली तपासाची माहिती

नाशिक ‘रिंग रोड’च्या पूर्णतेसाठी संपूर्ण यंत्रणेने लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश

नाशिक ‘रिंग रोड’च्या पूर्णतेसाठी संपूर्ण यंत्रणेने लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, भूसंपादनासदर्भात असलेले सर्व प्रश्न तातडीने निकाली काढावे. जिथे राष्ट्रीय महामार्ग आणि ‘रिंग रोड’चे आरेखन सोबतच येत असेल, अशा ठिकाणी एकच रस्ता ठेवण्यात यावा. स्थानिक स्वराज्य संस्थेनुसार गुणांक देण्यात यावा. त्या गुणांकानुसारच भूसंपादनाचा मोबदला अदा करण्यात यावा. राज्यामध्ये असलेल्या नगरपंचायतींना ‘ अर्बन बॉडी मेकिंग’ समजून त्या पद्धतीने गुणांक देण्यात यावा. ‘ रिंग रोड’च्या जवळील जमिनीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार बाबत अनेक तक्रारी प्राप्त झाले आहेत. तक्रारींच्या अनुषंगाने अशा खरेदी विक्री व्यवहार प्रकरणाबाबत शासन गंभीर असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी.

शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी

रिंग रोडचे भूसंपादन करताना ज्या ठिकाणी बागायती जमीन असूनही जिरायती जमिनीचे दर दिले असतील अशा ठिकाणी तातडीने बागायती जमिनीचे दर लागू करावेत त्यानुसारच शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला द्यावा, अशा प्रकरणात कुठेही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. सध्या स्थितीत असलेल्या रस्त्याचा दर्जा वाढ करून त्यामध्ये रुंदी वाढल्यास शेतकऱ्यांना भूसंपादित करून मोबदला द्यावा, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

‘मिमिक्री आर्टिस्ट असते तर स्टँडअप कॉमेडियनना मार्केटच राहिलं नसतं’; फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला

बैठकीला अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे, अपर मुख्य सचिव (सार्वजनिक बांधकाम) मिलिंद म्हैसकर, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण महानगर आयुक्त जलज शर्मा, नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री आदी उपस्थित होते. नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यासंदर्भातील सादरीकरण केले.

Web Title: Devendra fadnavis nashik ring road farmers land acquisition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 07:45 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Maharashtra Monsoon Session
  • Nashik
  • Nashik News

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांना मोठी गुडन्यूज! 6.36 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 5,086 कोटी; मंत्रिमंडळाचे 4 मोठे निर्णय
1

शेतकऱ्यांना मोठी गुडन्यूज! 6.36 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 5,086 कोटी; मंत्रिमंडळाचे 4 मोठे निर्णय

दोम्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पार पडणार हाय वोल्टेज मिटिंग!
2

दोम्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पार पडणार हाय वोल्टेज मिटिंग!

‘फडणवीसांना कॉपी-पेस्टही करता येत नाही’; ‘राहुल गांधींच्या कार्यक्रमाची नक्कल फसली,’ हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
3

‘फडणवीसांना कॉपी-पेस्टही करता येत नाही’; ‘राहुल गांधींच्या कार्यक्रमाची नक्कल फसली,’ हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Nashik Kumbh Mela Works: : “विकास हवा, पण जीव नको!” ओव्हरलोड वाहनांविरोधात नाशिककर आक्रमक!
4

Nashik Kumbh Mela Works: : “विकास हवा, पण जीव नको!” ओव्हरलोड वाहनांविरोधात नाशिककर आक्रमक!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.