Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News : नाशिककरांना मार्च महिन्यातच पाणी टंचाई; १३ टँकरद्वारे करावा लागतोय पाणी पुरवठा

नाशिक शहराला भेडसाविणाऱ्या पाणी प्रश्नावर महासभेत वादळी चर्चा झाली. पण कोणताही ठोस तोडगा निघू शकला नाही. उलट उन्हाचा चटका वाढू लागल्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य देखील मोठ्या प्रमाणावर जाणवू लागले आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 15, 2026 | 06:53 PM
(फोटो सौजन्य-AI)

(फोटो सौजन्य-AI)

Follow Us
Follow Us:
  • शहराला भेडसाविणाऱ्या पाणी प्रश्नावर महासभेत वादळी चर्चा
  • पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी वाढू लागली
  • नाशिककरांची तहान भागवण्यासाठी किती टँकर
Nashik News : शहराला भेडसाविणाऱ्या पाणी प्रश्नावर महासभेत वादळी चर्चा होवूनही कोणताही ठोस तोडगा निघू शकला नाही, उलट उन्हाचा चटका वाढू लागल्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य देखील मोठ्या प्रमाणावर जाणवू लागले आहे. महापालिकेकडे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी वाढू लागली असून, सध्या १३ टँकरव्दारे मागेल त्याला पाणी विनामुल्य पुरवले जात आहे. मात्र शहरात खासगी टँकरचा झालेला सुळसुळाट पाहता सारी भिस्त खासगी टँकरवरच आहे. गेल्या आठवड्यात महापौर हिमगौरी आडके आहेर यांनी शहरातील पाणी आणि रस्ते या महत्वाच्या दोन प्रश्नांवर विशेष महासभा घेत प्रशासनाला जाब विचारत उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

Nashik News : हजारो विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ, जिल्ह्यातील वसतिगृह आश्रमशाळांना भासतेय व्यावसायिक सिलिंडरची भ्रांत

नाशिककरांची तहान भागवण्यासाठी किती टँकर

मार्च महिन्यातच सध्या नाशिकमध्ये पाण्याचा तुडवडा भासत आहे. त्यामुळे मार्चमध्येच टँकरचा आधार घ्यावा लागतो आहे. सध्या एकून 13  पाणी टँकर कार्यरत आहे.  त्यात स्वतः महापालिकेच्या मालकीचे एकून ६ टँकर आहेत. हे टँकर पुरेसे नाहीत त्यामुळे इतर टँकरचाही आधार घ्यावा लागतो आहे. या टँकरांव्यतिरिक्त ठेकेदारांकडील 6 टँकर्सकडून पाणी पुरवठा केला जात आहे.

नगरसेवकांनी पाणी उपलब्ध करून द्यावे

धरणांमध्ये पाणी साठा मुबलक असूनही पाण्याची ओरड होतांना दिसत आहे. विशेष महासभेत तर पाण्यावरूनच नगरसेवकांनी प्रशासनाला घेरत पुरेसा पाणी पुरवठा कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला आहे. मात्र सिंहस्थाची सुरू असलेली कामे पाहता अजुन किमान सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी त्यासाठी लागू
शकतो. महापालिकेच्या माध्यमातून टैंकरव्दारे पाणी पुरवठा केला जातो मात्र ही संख्या अत्यल्प असल्याने नागरिकांना पाणीच मिळत नसल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी करत प्रत्येक प्रभागासाठी किमान एक पाण्याचा टैंकर द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार महापौरांनी पुरेसे टैंकर उपलब्ध करून द्यावेत.

२४ तास पाण्याची व्यवस्था करा

महापालिकेच्या सहाही विभागाच्या कार्यालयांच्या ठिकाणी २४ तास पाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. यामुळे टँकर भरण्यासाठी कोणतीही अडचण नसल्याने मागेल त्याला पाणी उपलब्ध करून दिले जात असल्याचे धारणकर यांनी सांगितले. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. सहा ते दहा हजार लिटर क्षमतेचे पाण्याचे टैंकर आहेत. गरज पडल्यास टँकरची संख्या वाढविण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.

कौतुकास्पद ! विद्यार्थ्याने अपघातानंतर चक्क रुग्णवाहिकेतून दिला दहावीचा पेपर; अडचणींवर केली मात

Web Title: Nashik news water scarcity in march water supply by 13 tankers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 06:53 PM

Topics:  

  • Nashik News
  • Water Crisis

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: भीषण दुष्काळामुळे गाव सोडण्याची वेळ! अहिल्यानगरच्या चापडगावात 1972 पेक्षाही भयावह परिस्थिती
1

Ahilyanagar News: भीषण दुष्काळामुळे गाव सोडण्याची वेळ! अहिल्यानगरच्या चापडगावात 1972 पेक्षाही भयावह परिस्थिती

Ahilyanagar News : १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळ? चापडगावात पाण्यासाठी गावकऱ्यांवर स्थलांतराची वेळ
2

Ahilyanagar News : १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळ? चापडगावात पाण्यासाठी गावकऱ्यांवर स्थलांतराची वेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.