(फोटो सौजन्य-AI)
शासकीय आदिवासी आश्रमशाळा, वसतीगृहे असून खासगी शैक्षणिक संस्था असलेली मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्था, आदिवासी सेवा समिती, ब्रह्मा व्हॅली, संदीप फाऊंडेशन, सपकाळ नॉलेज हब, भुजबळ नॉलेज सिटी अशा एक डझनाहून अधिक शैक्षणिक संस्थांमध्ये दाखल होणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या भोजनाच्या सोयीसह वसतीगृह सध्या कार्यरत आहेत.
आश्रमशाळा व जिल्हा परिषदेच्या शाळातील मध्यान्ह भोजन आणि पोषण आहार योजनेला बसली आहे. राज्यभरातून शिक्षण घेण्यासाठी आलेले हजारो विद्यार्थी या वेगवेगळ्या वसतिगृहामध्ये आणि आश्रमशाळांमध्ये राहत आहे. या वसतिगृहांना वेळेवर सिलिंडर उपलब्ध झाले नाही, तर हजारो विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे, जिल्हा परिषदेने तातडीने जिल्हा पुरवठा विभागाकडे २७९ सिलिंडरची मागणी नोंदवली आहे.
शहरामध्ये समाजकल्याण विभागाचे दोन वसतिगृह आहे. यामध्ये आडगावमधील वसतिगृहामध्ये ९५० तर नासर्डी पुलाजवळील वसतिगृहात ४५० असे एकूण एक हजार ४०० विद्यार्थी आहेत.
या वसतिगृहाचे पालकत्व राज्य शासनाकडे असल्याने वसतिगृहांना सिलिंडरचा पुरवठा सुरळीत सुरु ठेवावा, असे पत्र समाजकल्याण विभागाने पुरवठा विभागाला दिल्याचे सांगत शिल्लक गैस साठ्यावर अधिक बोलणे टाळले. त्यामुळे समाजकल्याणच्या वसतिगृहामध्ये काहींच आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. याशिवाय आदिवासी विकास विभागाने देखील संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन सिलिंडरचा पुरवठा सुरु राहण्यासाठी पुरवठा विभागाला पत्र दिले आहे.
भुजबळ नॉलेज सिटीच्या वसतीगृहात सुमारे आठ हजार विद्यार्थी आहेत. संस्थेने वसतीगृहाच्या किचनचा ठेका खासगी व्यक्तीला दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तुर्त अडचण नसली तरी, व्यावसायिक सिलीडर मिळत नसल्याने जेवणाच्या काही पदार्थामध्ये बदल करण्यात आला आहे. ठेकेदाराची सिलींडरसाठी कसरत सुरू आहे. ब्रह्मा व्हॅलीत दोन हजार विद्यार्थी आहेत. त्यांचीही अवस्था यापेक्षा वेगळी नाही. आदिवासी विकास विभागाला संस्थेने पत्र देण्याची तयारी चालविली आहे. मराठा संस्थेच्या एका वसतीगृहात आठशे विद्यार्थी आहेत. सिलींडर नसल्यामुळे संस्थेने चूलीचा पर्याय निवडला आहे.






