Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Kumbh Mela: पंचवटीतील पेठ रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा; सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग

Nashik Kumbh Mela: नाशिकच्या पंचवटी परिसरातील पेठ रोड रुंदीकरणातील मोठा अडथळा दूर झाला आहे. महाकाय वीज पोलचे स्थलांतर आणि वीजवाहिन्यांच्या आधुनिकीकरणाच्या कामाला वेग आल्याने आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला चालना मिळणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 05, 2026 | 11:59 AM
पंचवटीतील पेठ रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा; सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग

पंचवटीतील पेठ रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा; सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग

Follow Us
Follow Us:
  • पंचवटीतील रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा
  • आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला
  • अखेर पेठ रोडवरील महाकाय पोलचे गुपित उलगडले
  • वीजवाहिन्यांचे आधुनिकीकरण वेगाने सुर
राजू ठाकरे, पंचवटी : गेल्या काही दिवसांपासून पेठ रोडवरून प्रवास करणाऱ्या नागरिक, स्थानिक व्यावसायिक आणि वाहनधारकांचे लक्ष रस्त्याच्या कडेला व दुभाजकात उभारल्या जाणाऱ्या प्रचंड उंच पोलादी खांबांकडे वेधले गेले होते. हे महाकाय पोल नेमके कशासाठी उभारले जात आहेत, याबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात होते. अखेर या पोलमागील कारण स्पष्ट झाले. (Nashik Kumbh Mela)

पेठ रोड, पंचवटी, म्हसरूळ आणि दिंडोरी नाका परिसरातील बहुप्रतिक्षित रस्ता रुंदीकरणासाठी उच्चदाब वीजवाहिन्यांचे आधुनिकीकरण वेगाने सुरू आहे. नाशिक महानगरपालिका आणि महापारेषण यांच्या समन्वयातून जुन्या जाळीदार लोखंडी टॉवरऐवजी अत्याधुनिक स्टील मोनोपोल उभारले जात आहेत. कमी जागा व्यापणारे हे मोनोपोल रस्त्याच्या दुभाजकात बसविल्याने वाहतुकीसाठी अधिक जागा उपलब्ध होणार असून रस्ता रुंदीकरण आणि सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या कामांना गती मिळणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या पायाभूत सुविधा विकासातील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

Nashik Politics: पालकमंत्रीपदाचा तिढा कायम; मध्यरात्री झळकले भुजबळ समर्थकांचे फलक, दुपारपर्यंत हटविण्याचे आदेश

वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा

पेठ रोड हा नाशिक शहराला दिंडोरी, साक्री आणि गुजरातकडे जोडणारा महत्त्वाचा व्यापारी मार्ग आहे. अनेक वर्षांपासून खराब रस्ते, वाहतूक कोंडी, धुळीचे साम्राज्य आणि विजेच्या टॉवरमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींना नागरिकांना सामोरे जावे लागत होते. आता उच्चदाब वीजवाहिन्यांचे मोनोपोलवर यशस्वी स्थलांतर झाल्यानंतर रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण व सिमेंट काँक्रीटीकरणाची प्रलंबित कामे अधिक वेगाने पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सिंहस्थासाठी महत्त्वाचा प्रवेशमार्ग ठरणार सक्षम

पेठ रोड हा पंचवटी, तपोवन, दिंडोरी मार्ग आणि उत्तर महाराष्ट्राला जोडणारा प्रमुख मार्ग असून, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात याच मार्गावरून लाखो भाविक, साधू-महंत आणि वाहने ये-जा करतात. त्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण, उच्चदाब वीजवाहिन्यांचे सुरक्षित स्थलांतर आणि आधुनिक पायाभूत सुविधा उभारणी ही सिंहस्थपूर्व नियोजनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. सुरक्षितता आणि आधुनिकतेच्या दृष्टीने हे काम अत्यंत महत्त्वाचे आहे. शहरातील वीज पारेषण व्यवस्था अधिक सुरक्षित आणि आधुनिक करण्यासाठी हे काम केले जात आहे. आगामी सिंहस्थ काळात अखंड आणि सुरक्षित वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठीही हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे, अशी माहिती नाशिक महापारेषण मुख्य अभियंता महेंद्र वाळके यांनी दिली.

पेठ रोडच्या कामातील सर्वांत मोठा अडथळा आता दूर झाला आहे. विजेचे जुने टॉवर हटवून नवीन मोनोपोल उभारणीसाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा केला होता. हे काम पूर्ण होताच रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण क्षमतेने सुरू होईल. पुढील काही दिवसांत पंचवटीकरांना रुंद, दर्जेदार आणि खड्डेमुक्त रस्ता पाहायला मिळेल, अशी माहिती आमदार अॅड. राहुल ढिकले यांनी दिली.

  • मोनोपोल तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये
  • जुन्या टॉवरच्या तुलनेत केवळ १ ते २ मीटर जागेत उभारणी शक्य.
  • रस्त्याच्या दुभाजकात बसविल्याने दोन्ही बाजूंना वाहतुकीसाठी अधिक मोकळी जागा.
  • विशेष दर्जाच्या पोलादामुळे वादळ, मुसळधार पाऊस आणि प्रतिकूल हवामानात अधिक सुरक्षित.
  • शहराच्या सौदर्यात भर घालणारी नेटकी रचना.
  • देखभाल खर्च तुलनेने कमी आणि वीजवाहिन्यांचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षम
Nashik News: पूर ओसरताच गोदापात्र बनले ‘खुले सर्व्हिस स्टेशन’; वाहनधारकांकडून सर्रास वाहन धुलाई

Web Title: Nashik peth road widening clears way for simhastha kumbh power line modernisation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 11:59 AM

Topics:  

  • Kumbh Mela
  • mahavitaran
  • Nashik

संबंधित बातम्या

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर
1

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
2

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Nashik Farmers: बळीराजाची चिंता वाढली! शेतीपिकांवर संकट, ५४ कृषी मंडळांत तीन आठवड्यांहून अधिक पाऊस गायब
3

Nashik Farmers: बळीराजाची चिंता वाढली! शेतीपिकांवर संकट, ५४ कृषी मंडळांत तीन आठवड्यांहून अधिक पाऊस गायब

FDA Seizes Suspected Food Items : नाशिकमध्ये एफडीएचा धडक कारवाईचा बडगा; १० दिवसांत ५.४० कोटींचा भेसळयुक्त माल जप्त!
4

FDA Seizes Suspected Food Items : नाशिकमध्ये एफडीएचा धडक कारवाईचा बडगा; १० दिवसांत ५.४० कोटींचा भेसळयुक्त माल जप्त!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.