Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाशिकचा दुसरा खरात! कार्यलयात सापडले 120 अश्लील व्हिडीओ अन् प्राण्यांचे अवयवही…; Ravindra Erande विरोधात धक्कादायक माहिती समोर

नाशिकमध्ये रवींद्र एरंडे प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली असून, अश्लील व्हिडिओ आणि प्राण्यांच्या अवयवांबाबत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 07, 2026 | 12:40 PM
नाशिकचा दुसरा खरात! 120 अश्लील व्हिडीओ अन् प्राण्यांचे अवयवही...; रवींद्र एरंडे विरोधात धक्कादायक माहिती समोर

नाशिकचा दुसरा खरात! 120 अश्लील व्हिडीओ अन् प्राण्यांचे अवयवही...; रवींद्र एरंडे विरोधात धक्कादायक माहिती समोर

Follow Us
Follow Us:
  • १० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत वाढ
  • एरंडेच्या कार्यालयात प्राण्यांचे अवयव
  • रवींद्र एरंडे विरोधात धक्कादायक माहिती समोर
Nashik Ravindra Erande News Marathi : सातपूर येथील रवींद्र एरंडे याच्या विरोधातील गुन्ह्यात दररोज नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. सोमवारी (६ मार्च 2026) झालेल्या सुनावणीत पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला असून, एरंडे याच्या कार्यालयात केवळ अश्लील व्हिडिओच नव्हे, तर प्राण्यांचे अवयवही सापडल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपीच्या पोलीस कोठडीत ४ दिवसांची वाढ केली असून, आता तो १० एप्रिलपर्यंत पोलिसांच्या ताब्यात राहणार आहे.

रवींद्र एंडे याची दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्याने त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले. यावेळी सरकारी पक्षातर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बारी यांनी तपासातील प्रगती सादर केली. हस्तगत केलेल्या पेनड्राईव्हची तपासणी केली असता, त्यात तब्बल ७ महिलांचे १२० अश्लील व्हिडिओ आढळून आले आहेत. विशेष म्हणजे, आरोपीने प्राथमिक चौकशीत या व्हिडिओंची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. या व्हिडिओमधील महिलांची ओळख पटवून त्यांचे जबाब नोंदवण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

Ashok Kharat Case : ‘अशोक खरात तू तो गियो’ ED च्या एन्ट्रीनंतर आता मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल

न्यायालयात जोरदार युक्तिवाद

आरोपी तपासात सहकार्य करत नसून, त्याने गुन्ह्यासाठी नेमकी कोणती इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरली, याची माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे. हार्डडिस्कमधील डेटा तपासण्यासाठी तसेच रॅकेटची व्याप्ती शोधण्यासाठी ७ दिवसांच्या कोठडीची मागणी तपासाधिकारी सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी यानी केली. तर, तर आरोपीचे वकील अरुण दोंदे यांनी या मागण्यांना विरोध केला, त्यांनी दावा केला की, पेनड्राईव्ह आणि कॅमेरा जप्त केल्याची पोलिसांची बाब चुकीची आहे. कार्यालयात सापडलेली वस्तू सापाची कात आहे, कातडी नाही. केवळ रागातून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला न्यायालयीन कोठडी मिळावी, असा युक्तिवाद त्यांनी केला.

सापाचे कातडे सापडल्याचा बचाव पक्षाचा दावा

तपास पथकाने एरंडे याच्या घर आणि कार्यालयाची झडती घेतली असता, तिथे अनेक संशयास्पद बाबी हाती लागल्या आहेत. कार्यालयात काही प्राण्यांचे अवयव आढळून आले असून, या अवयवांचा वापर नेमका कशासाठी केला जात होता, याचा तपास करणे बाकी आहे. मात्र एरंडे यांच्या कार्यालयात प्राण्यांचे नव्हे तर सापाची कातडी असल्याचा दावा बचाव पक्षाच्यावतीने करण्यात आला.

न्यायालयाचा निकाल

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने ४ दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली. पोलिसांनी आरोपीला विचारले असता, त्याने पोलिसांविरुद्ध कोणतीही तक्रार नसल्याचे न्यायालयात सांगितले. दरम्यान, संशयित आरोपी तांत्रिक माहिती देण्यास वेळकाढूपणा करत असून, त्याने हे अश्लील साहित्य आणखी कुठे साठवून ठेवले आहे का, याचा शोध घेणे आवश्यक आहे. या प्रकरणाचे धागेदोरे शहरात इतरत्र पसरलेले असण्याची शक्यता असून, मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

Ashok Kharat प्रकरणात नाशिक पोलिसांची हाताची घडी, SIT चे तोंडावर बोट; बड्या धेंडांना वाचवण्याचा प्रयत्न की राजकीय स्वार्थ?

Web Title: Nashik ravindra erande case obscene videos animal organs shocking revelations police investigation india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 12:37 PM

Topics:  

  • cyber crime
  • Nashik

संबंधित बातम्या

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
1

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Rahul Gandhi : राहुल गांधी यांचा उद्या नाशिक दौरा; आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेणार
2

Rahul Gandhi : राहुल गांधी यांचा उद्या नाशिक दौरा; आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेणार

Swine Flu: वेळीच सावध व्हा! स्वाईन फ्लूमुळे तीन मृत्यू, ऑगस्टमध्ये डेंग्यूचे ९१ रुग्ण; उपाययोजना करण्यावर भर
3

Swine Flu: वेळीच सावध व्हा! स्वाईन फ्लूमुळे तीन मृत्यू, ऑगस्टमध्ये डेंग्यूचे ९१ रुग्ण; उपाययोजना करण्यावर भर

Ganeshotsav 2026: श्री मिरवणूक मार्गावर २० स्पीड ब्रेकरचे विघ्न; ‘विटंबना झाल्यास जागेवरच प्रतिष्ठापना’ करण्याचा इशारा
4

Ganeshotsav 2026: श्री मिरवणूक मार्गावर २० स्पीड ब्रेकरचे विघ्न; ‘विटंबना झाल्यास जागेवरच प्रतिष्ठापना’ करण्याचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.