Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! सरकारी नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार, ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

नोकरीचे आमिष दाखवल्यानंतर इरफानने फोनवर त्या मुलीसोबत अश्लील संभाषण केले आणि तिला आभासी लैंगिक संबंधांसाठी प्रलोभन दिले. त्यानंतर तिचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 15, 2026 | 11:21 AM
धक्कादायक ! सरकारी नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार, अश्लील व्हिडिओ व्हायरल

धक्कादायक ! सरकारी नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार, अश्लील व्हिडिओ व्हायरल

Follow Us
Follow Us:

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना लक्षणीय आहेत. असे असताना आता 19 वर्षीय तरुणीला सरकारी नोकरीचे आमिष दाखवून तिचे अश्लील संभाषण घडवून आणत तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी तहसील पोलिसांनी विविध राज्यांतील पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, यामागे आणखी काही व्यक्तींचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात इरफान अली (वय ३५, रा. राजस्थान), नरेंद्र मीना (वय ४०, रा. लखनौ), नितीन जैन (वय २७, रा. शहडोल, मध्य प्रदेश), किरण मित्तल (वय ३७, रा. चंदीगड) आणि पायल उर्फ डेस्टिनी (वय ३४, रा. पणजी, गोवा) अशी आरोपींची नावे आहेत. ५ नोव्हेंबर २०२५ ते १३ ऑक्टोबर २०२६ दरम्यान ही घटना घडली आहे.

पीडितेला झाला शारीरिक व मानसिक त्रास

पीडित तरुणी सोशल मीडियावर शिक्षणासह विविध विषयांवर व्हिडिओ बनवून प्रसारित करते. यादरम्यानच तिची ऑनलाइन माध्यमातून इरफान अलीशी ओळख झाली. आरोपी इरफानच्या सांगण्यावरून त्या मुलीने ‘मिका’ नावाचे अॅप्लिकेशन डाउनलोड केले आणि त्याच्याशी संपर्क वाढवला. इरफानने तिला उत्तर प्रदेशातील एका संघटनेच्या वरिष्ठ नेत्याला ओळखत असल्याचे सांगून, त्या नेत्यासोबत भेटीची व्यवस्था करण्याचे व आपल्या ओळखीच्या माध्यमातून तिला सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. याच बहाण्याने आरोपीने पीडित मुलीची शैक्षणिक कागदपत्रेही संपादन केली.

पोलिसांकडून तपास सुरु

नोकरीचे आमिष दाखवल्यानंतर इरफानने फोनवर त्या मुलीसोबत अश्लील संभाषण केले आणि तिला आभासी लैंगिक संबंधांसाठी प्रलोभन दिले. त्यानंतर तिचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला. या गंभीर प्रकारामुळे पीडितेला शारीरिक व मानसिक त्रासाचा सामना करावा लागला. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे तहसील पोलिसांनी पाचही आरोपींविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल केला असून, पोलीस आता या रॅकेटमधील इतर संशयितांच्या भूमिकेचा कसून तपास करत आहेत.

💡 Frequently Asked Questions

आभासी लैंगिक शोषण म्हणजे काय?

– एखाद्या तरुणीच्या खऱ्या फोटो/व्हिडिओला AI, Deepfake, Morphing, Face-swap तंत्राने बदलून अश्लील बनवणे, किंवा तिच्या नावाने फेक प्रोफाइल बनवून लैंगिक छळ करणे, किंवा तिचे प्रायव्हेट फोटो तिच्या परवानगीशिवाय व्हायरल करणे. यात शारीरिक स्पर्श नसतो, पण मानसिक आघात खूप मोठा असतो.

हे कसे घडते?

– 3 प्रकारे जास्त घडते -Deepfake : इंस्टाग्रामवरील साध्या फोटोवर AI ने कपडे बदलून न्यूड दाखवणे. Morphing : एका अश्लील फोटोवर तरुणीचा चेहरा लावणे. Sextortion / Blackmail : फेक कॉल/चॅट करून फोटो मागणे.

हा गुन्हा नेमका आहे का? भारतात कायदा काय सांगतो?

– हो, हा गंभीर गुन्हा आहे. भारतात थेट Deepfake साठी वेगळा कायदा नाही, पण या कलमांखाली गुन्हा दाखल होतो – IT Act 66E : प्रायव्हसी भंग करून प्रायव्हेट फोटो काढणे/प्रसारित करणे – 3 वर्षे तुरुंग + 2 लाख दंड.I T Act 66D : इलेक्ट्रॉनिक माध्यमातून फसवून तोतयागिरी करणे – 3 वर्षे तुरुंग.IT Act 67, 67A, 67B.

Crime News : नाशिकमध्ये बाल लैंगिक शोषणाचे २५० व्हिडिओ व्हायरल; दीड वर्षांपासून सुरू होता प्रकार…

Web Title: Abused under the pretext of offering a government job nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 11:21 AM

Topics:  

  • Abused Case
  • crime news
  • cyber crime

संबंधित बातम्या

Crime News: नाशिकमध्ये बाल लैंगिक शोषणाचे २५० व्हिडिओ व्हायरल; दीड वर्षांपासून सुरू होता प्रकार…
1

Crime News: नाशिकमध्ये बाल लैंगिक शोषणाचे २५० व्हिडिओ व्हायरल; दीड वर्षांपासून सुरू होता प्रकार…

बारामतीत बंद घर चोरट्यांच्या निशाण्यावर! पत्रकाराचे घर फोडले; सोनं, चांदीसह पावणे चार लाखांचा ऐवज लंपास
2

बारामतीत बंद घर चोरट्यांच्या निशाण्यावर! पत्रकाराचे घर फोडले; सोनं, चांदीसह पावणे चार लाखांचा ऐवज लंपास

Nalasopara News: मैत्री, प्रेमाचं आमिष अन् धर्मांतरासाठी दबाव; नालासोपाऱ्यात तरुणीचा गंभीर आरोप
3

Nalasopara News: मैत्री, प्रेमाचं आमिष अन् धर्मांतरासाठी दबाव; नालासोपाऱ्यात तरुणीचा गंभीर आरोप

Crime News: उत्तर प्रदेशातून उल्हासनगरमध्ये गांजाची तस्करी; दोन तरुणांना अटक, १५ किलो गांजा जप्त
4

Crime News: उत्तर प्रदेशातून उल्हासनगरमध्ये गांजाची तस्करी; दोन तरुणांना अटक, १५ किलो गांजा जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.