Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Bus Stand: बसस्थानकच आले रस्त्यावर! तीन महिने प्रवाशांचे हाल, सिटीलिंकच्या केवळ एका बसला जागा

Nashik Bus Stand: नाशिकरोड बसस्थानकातील व्यवस्थेत बदल करण्यात आल्याने पुढील तीन महिने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेससाठी पोलिस ठाण्यासमोरील रस्त्यावर जागा निश्चित करण्यात आली असून, सिटीलिंकच्या केवळ एका बससाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 10, 2026 | 02:24 PM
बसस्थानकच आले रस्त्यावर! तीन महिने प्रवाशांचे हाल, सिटीलिंकच्या केवळ एका बसला जागा

बसस्थानकच आले रस्त्यावर! तीन महिने प्रवाशांचे हाल, सिटीलिंकच्या केवळ एका बसला जागा

Follow Us
Follow Us:
  • नाशिकरोड बसस्थानक आता रस्त्यावर!
  • तीन महिने प्रवाशांचे हाल
  • ST बसेसला पोलिस ठाण्यासमोर जागा
  • ३ महिने सुरू राहणार दुरूस्तीचे काम
नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड एसटी बस (Nashik Bus Stand) स्थानकाच्या काँक्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. बुधवारी (9 सप्टेंबर 2026) या बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात होत असल्याने पुढील तीन महिन्यांसाठी नाशिकरोड स्थानकाचे संपूर्ण कामकाज नाशिक-पुणे रस्त्यावरील उड्डाणपुला खालील, नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या परिसरातून चालवले जाणार आहे.

कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांची आणि प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता महामंडळाने बस स्थानकाच्या पुनर्बाधणीचा निर्णय घेतला आहे. नाशिकहून पुणे, शिर्डी आणि अहिल्यानगरच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसेस आता उड्डाणपुलाखालील तात्पुरत्या प्रवासी निवाऱ्यातून आणि नियंत्रण कक्षातून चालवल्या जातील. इतर विभागांतून नाशिकरोड स्थानकात येणाऱ्या बसचालक व वाहकांना या बदलाबद्दल सूचना देण्यात आल्या असून, वाहतूक नियंत्रण कक्ष व कर्मचारी तात्पुरत्या ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत.

Ganpati Decoration 2026: यंदा बाप्पाची आरास खिशाला कात्री लावणार! डेकोरेशन साहित्याच्या किमतीत 20 ते 30 टक्के वाढ

वाहतुकीचा बोजवारा उडण्याची चिन्हे

एसटी बसेसचा नवीन थांबा थेट रस्त्यावर आणि नाशिकरोड पोलीस ठाण्यासमोर आल्याने मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. बिटको पॉईंट ते सिन्नर फाटा या उड्डाणपुलाखालील रस्त्यावर नेहमीच वाहनांची गर्दी असते. त्यातच पुढील तीन महिन्यांत गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दीपावली असे मोठे सण पार पडणार आहेत. या सण-उत्सवांच्या काळात रस्त्यावरच बसथांबा असल्याने वाहतुकीची कोंडी अटळ मानली जात असून, प्रवाशांची मोठी तारांबळ उडणार आहे. या गोंधळाचा फायदा घेऊन परजिल्ह्यातून आणि राज्यातून येणाऱ्या भाविकांची रिक्षाचालकांकडून भरमसाठ लूट होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

सिटीलिंक बसेससाठी अशी असेल सुविधा

रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी सिटीलिंक प्रशासनाने बस स्थानकाच्या एका कोपऱ्यात दर पाच मिनिटांना एक बस उपलब्ध असेल अशी व्यवस्था आहे. उभी असलेली बस भरून निघाल्यानंतर दुसरी बस तत्काळ तेथे पाठवण्यात येणार आहे.मात्र, प्रवाशांची मोठी गर्दी लक्षात घेता ही यंत्रणा कितपत यशस्वी ठरते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. बस थांबा बनवण्यात आलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असते. आता येथेच बसस्थानक करण्यात आल्याने त्यात भर पडणार आहे. परिसरात आर्मीच्या वाहनांचीही मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. आता या वाहनांनाही मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.

हॉकर्स सेलचा विरोध

उड्डाणपुलाखाली २४-२५ वर्षांपासून शेकडो फेरीवाले व्यवसाय करत असून, एसटी बसेसमुळे त्यांचा रोजगार हिरावला जाईल. प्रशासनाने मनपा शाळा क्रमांक १२५ जवळील एसटीच्या पडीक भूखंडाचा पर्यायी जागा म्हणून वापर करावा, जेणेकरून फेरीवाल्यांचा रोजगार टिकेल, अन्यथा, लोकशाही व सनदशीर मार्गाने तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा ‘श्रमशक्ती हॉकर्स सेल’चे डॉ. वसंत ठाकूर व दस्तगीर शेख यांनी मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

परिवहन महामंडळाच्या बसेसला पोलिस ठाण्यासमोरच थांबा देण्यात आला आहे, हे काम पुढील तीन महिन्यात पूर्ण होणार आहे. रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी बस स्थानकाजवळच एक सिटीलिंक बस उभी करण्यात येणार असून, वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे.पोलिस निरीक्षक (वाहतूक शाखा) बडेसाहेब नाईकवाडे यांनी माहिती दिली.

Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्याने बदलणार नाशिकचा वाहतूक नकाशा; ६५.६ किमी रिंग रोडसह १,४३५ किमी रस्त्यांचा महाप्रकल्प

Web Title: Nashik road bus stand shifted on road msrtc buses near police station passengers face inconvenience

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • msrtc
  • Nashik
  • st bus

संबंधित बातम्या

Ganpati Decoration 2026: यंदा बाप्पाची आरास खिशाला कात्री लावणार! डेकोरेशन साहित्याच्या किमतीत 20 ते 30 टक्के वाढ
1

Ganpati Decoration 2026: यंदा बाप्पाची आरास खिशाला कात्री लावणार! डेकोरेशन साहित्याच्या किमतीत 20 ते 30 टक्के वाढ

MSRTC News: एसटी महामंडळ संकटात; 4,500 कोटींहून अधिक वैधानिक देणी थकीत, 200 कोटींच्या कर्ज परतफेडीचाही मागितला हिशोब
2

MSRTC News: एसटी महामंडळ संकटात; 4,500 कोटींहून अधिक वैधानिक देणी थकीत, 200 कोटींच्या कर्ज परतफेडीचाही मागितला हिशोब

Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्याने बदलणार नाशिकचा वाहतूक नकाशा; ६५.६ किमी रिंग रोडसह १,४३५ किमी रस्त्यांचा महाप्रकल्प
3

Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्याने बदलणार नाशिकचा वाहतूक नकाशा; ६५.६ किमी रिंग रोडसह १,४३५ किमी रस्त्यांचा महाप्रकल्प

Nashik News: रस्त्यांची दुर्दशा अन् पोलिसांची परीक्षा! खड्ड्यांतून भाविकांचा प्रवास, त्र्यंबकेश्वर मार्गावर हजारो भाविकांची गर्दी
4

Nashik News: रस्त्यांची दुर्दशा अन् पोलिसांची परीक्षा! खड्ड्यांतून भाविकांचा प्रवास, त्र्यंबकेश्वर मार्गावर हजारो भाविकांची गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.