Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News : शेतकरी चिंतेत! अवकाळी पावसाचा कहर; २८ हजार हेक्टर क्षेत्र बाधित

नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले असून सुमारे 28 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 04, 2026 | 04:31 PM
शेतकरी चिंतेत! अवकाळी पावसाचा कहर; २८ हजार हेक्टर क्षेत्र बाधित

शेतकरी चिंतेत! अवकाळी पावसाचा कहर; २८ हजार हेक्टर क्षेत्र बाधित

Follow Us
Follow Us:
  • ३४९ गावांमध्ये पिकांना बसला फटका
  • २८ हजार हेक्टर क्षेत्र बाधित
  • अवकाळी पावसाचा कहर
Nashik News Marathi : नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसासह जोरदार वाऱ्यामुळे शेती, फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. प्रशासनाने तयार केलेल्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यातील २८ हजार ३६४ हेक्टरहून अधिक क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक अहवालानुसार सटाणा, निफाड, सिन्नर आणि मालेगाव तालुके सर्वाधिक बाधित ठरले आहेत. पावसासोबत आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे कांदा, भाजीपाला, मका तसेच द्राक्ष, डाळिंब आणि आंबा या फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. अहवालानुसार जिल्ह्यातील ३४९ गावांमध्ये नुकसान नोंदविण्यात आले असून सुमारे ३९ हजार हेक्टर शेती क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यापैकी मोठ्या क्षेत्रातील पीक नुकसानीची खात्री झाली आहे. विशेषतः कांदा व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Nashik News: धक्कादायक! 12 वर्षांपासून आधार कार्डसाठी ‘तिचा’ वनवास, अखेर प्रशासनाला दिला आत्महत्येचा इशारा

पंचनामे सुरू, मदत प्रक्रियेला गती

प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले असून बाधित शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळावी यासाठी प्रस्ताव तयार केले जात आहेत. प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला असून अंतिम अहवालानंतर मदत जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वादळामुळे उभी पिके झाली आडवी

निफाड, येवला, सिन्नर, बागलाण, दिंडोरी आणि कळवण भागात उभी पिके आडवी पडली. काढणीस तयार असलेला कांदा, गहू आणि मका पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. शेतातून काढून ठेवलेला कांदा भिजल्यामुळे कुजण्याचा धोका वाढला आहे. द्राक्ष पट्टयात सतत बदलणाऱ्या हवामानामुळे फळांच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शेतकरी चिंतेत, कृषी विभागाचे आवाहन

गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यावर अस्मानी सुल्तानी संकटांची मालिकाच सुरू आहे. यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे. आता हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावनू घेतला आहे. सतत सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे आगामी खरीप हंगामाच्या तयारीवरही परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. कृषी विभागाने नुकसानग्रास्त पिकांची माहिती तात्काळ नोंदविण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले असून त्यामुळे मदत प्रक्रिया जलद होण्यास मदत होणार आहे.

Water Shortage : धोक्याची घंटा! गावाची लोकसंख्या 7830 आणि केवळ 5 टँकरने पाणीपुरवठा, अवकाळीच्या तडाख्यात जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट

Web Title: Nashik unseasonal rain damage 28 thousand hectares farmers demand compensation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 04:31 PM

Topics:  

  • Farmers
  • Nashik
  • Unseasonal Rain

संबंधित बातम्या

Nashik Bus Stand: बसस्थानकच आले रस्त्यावर! तीन महिने प्रवाशांचे हाल, सिटीलिंकच्या केवळ एका बसला जागा
1

Nashik Bus Stand: बसस्थानकच आले रस्त्यावर! तीन महिने प्रवाशांचे हाल, सिटीलिंकच्या केवळ एका बसला जागा

Devendra Fadnavis: ऊस उत्पादकांसाठी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरपासून राज्यात गाळप हंगामाला सुरुवात
2

Devendra Fadnavis: ऊस उत्पादकांसाठी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरपासून राज्यात गाळप हंगामाला सुरुवात

Ganpati Decoration 2026: यंदा बाप्पाची आरास खिशाला कात्री लावणार! डेकोरेशन साहित्याच्या किमतीत 20 ते 30 टक्के वाढ
3

Ganpati Decoration 2026: यंदा बाप्पाची आरास खिशाला कात्री लावणार! डेकोरेशन साहित्याच्या किमतीत 20 ते 30 टक्के वाढ

आदिवासी शेतकऱ्यांना मोठा दिलासा! स्ट्रॉबेरी लागवडीसाठी ४ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर; दिलीप वळसे पाटील यांची माहिती
4

आदिवासी शेतकऱ्यांना मोठा दिलासा! स्ट्रॉबेरी लागवडीसाठी ४ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर; दिलीप वळसे पाटील यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.