Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fasting Food Prices: यंदा श्रावणातील उपवासही महागणार!फळांसह किराणा मालाच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या नवे दर

Fasting Food Prices:  श्रावण महिन्याला गुरुवार, १३ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. श्रावणात उपवास करणाऱ्या भाविकांची आणि विशेषतः महिलांची संख्या मोठी असते. मात्र, श्रावण सुरू होण्यापूर्वीच उपवासाच्या खाद्यपदार्थांसह फळे आणि किराणा मालाच्या दरात वाढ झाली आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने दरवाढ झाली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 08, 2026 | 01:08 PM
यंदा श्रावणातील उपवासही महागणार!फळांसह किराणा मालाच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या नवे दर

यंदा श्रावणातील उपवासही महागणार!फळांसह किराणा मालाच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या नवे दर

Follow Us
Follow Us:
  • श्रावणातील फराळाला महागाईचा तडका
  • किराणा मालासह फळांच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने झळ
  • जाणून घ्या नवे दर
नाशिक: श्रावण महिन्याला गुरुवार (दि. १३) पासून सुरुवात होत असून या काळात भाविकांचे आणि विशेषतः महिलांचे उपवास मोठ्या प्रमाणावर असतात. मात्र, श्रावण सुरू होण्यापूर्वीच बाजारात उपवासाच्या खाद्यपदार्थांच्या कमती वाढल्या आहेत. मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्यामुळे किराणा मालासह फळांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. श्रावण महिन्यात (Fasting Food Prices) मोठ्या प्रमाणात मागणीत वाढ होण्याची शक्यता असल्याने दरात अजून काहीशी वाढ होण्याची शक्यताही व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे. त्यामुळे यंदा श्रावणातील उपवास करणेही महागणार असल्याने सर्वसामान्य नागरिक विशेषतः महिलावर्गातून मोठी नाराजी व्यक्त होत आहे. १०-१५ टक्क्यांची उपवासाच्या पदार्थांमध्ये दरवाढ झाली आहे. तर  २० टक्क्यांपर्यंत फळांच्या किंमतीही वधारल्या आहेत.

नाशिकमध्ये उभारणार ज्ञान आणि तंत्रज्ञानाचा संगम घडविणारे राष्ट्रीय शैक्षणिक केंद्र; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

बाजारात मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी

श्रावण महिन्यात श्रावणी सोमवार, मंगळागौर, नागपंचमी आणि संकष्टी चतुर्थी यांसारखे धार्मिक सण व व्रते येतात. या काळात अनेक महिला महिनाभर उपवास पाळतात, तर काही जणी ठराविक सणांच्या दिवशी उपवास करतात. त्यामुळे बाजारात फराळी पदार्थांना अचानक मोठी मागणी होते. दरवर्षी श्रावणात या पदार्थांची मोठ्या प्रमाणात आवक होत असते परंतु, यंदा बाजारात मालाची आवक मर्यादित राहिल्याने व्यापारीवर्गाने भाव वाढवले असून, याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला बसत आहे.

खजूर २२० ते ३१० रुपये किलो

गेल्या महिन्यात २०० रुपये किलो विकली जाणारी भगर आता २४० रुपयांवर पोहोचली आहे तर ७० रुपये किलोचा साबूदाणा ८५ रुपये किलो, शेंगदाणे १४० ते १६० रुपये किलो, राजगारा पिठाच्या किमतीत मात्र मोठी वाढ झाली असून, १५० रुपये किलोचे राजगिरा पीठ २४० रुपये किलोने विक्री होत आहे. तर फळांमध्ये खजूर २२० ते ३१० रुपये किलो, सफरचंद २०० ते २७० रुपये किलो तर केळी ७० ते ९० रुपये डझनने विक्री होत आहे.

राजगिऱ्याच्या किमतीत मोठी वाढ

किराणा बाजारात साबुदाणा, शेंगदाणे, राजगिरा पीठ आणि भगूर या उपवासाच्या मुख्य पदार्थांच्या दरात प्रति किलोमागे २० ते ३० रुपयांची दरवाढ झाली आहे. फक्त किराणाच नव्हे, तर फळबाजारही या महागाईतून सुटलेला नाही, सफरचंद, केळी, अलिब व इतर फळांव्या किमती प्रचंड वाढल्याने उपवासाच्या दिवशी फलाहार करणेही आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.

Pune Nashik Railway Route: खेड विमानतळ पुरंदरला अन् पुणे-नाशिक रेल्वे शिर्डीमार्गे? उत्तर पुण्यावर अन्यायाची भावना

Web Title: Shravan month fasting food prices increase fruits grocery maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 01:08 PM

Topics:  

  • maharashtra
  • Nashik
  • Shravan 2026

संबंधित बातम्या

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद
1

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
2

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Nashik Kumbh Mela 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी मोठी तयारी; 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, अमृत स्नानाच्या तारखाही ठरल्या
3

Nashik Kumbh Mela 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी मोठी तयारी; 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, अमृत स्नानाच्या तारखाही ठरल्या

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
4

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.