
वेळीच सावध व्हा! स्वाईन फ्लूमुळे तीन मृत्यू, ऑगस्टमध्ये डेंग्यूचे ९१ रुग्ण; उपाययोजना करण्यावर भर
स्वाईन फ्लूचा धोका वाढला
डेंग्यूवर नियंत्रण मिळवल्याचा महापालिकेचा दावा
डेंग्यूचे ११९ रुग्ण उपचाराधीन
नाशिक: शहरात स्वाईन फ्ल्यूमुळे (Swine Flu) आत्तापर्यंत तीन रूग्णांचा मृत्यू झाला असून, त्यात एक शहरातील व दोन बाहेरगावचे रूग्ण आहेत. हे तीन्ही मृत्यू जून आणि जुलै महिन्यातील आहेत. हवेतील संसर्गाने होणाऱ्या स्वाईन फ्लूचा देशातच उद्रेक वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करीत मनपा आयुक्त मनिषा खत्री यांनी डेंग्यूवर मनपाने मोठे नियंत्रण मिळविल्याचा दावा केला आहे. डेंग्यूचे ऑगष्ट महिन्यात ९१ रूग्ण आढळून आले असून, आत्तापर्यंत १२४ संशयित रूग्ण असले तरी, त्यातील ११९ रूग्ण सध्या उपचारार्थ आहेत. मात्र गेल्या दोन वर्षात ऑगष्टमधील डेंग्यूची संख्या लक्षात घेता यंदा त्यावर महापालिकेने नियंत्रण मिळविल्याचेही त्यांनी सांगितले.
या मोहिमेत डास उत्पत्ती ठिकाणे आढळून आलेल्या ठिकाणांवर संबंधितांवर ५१ लाखांचा दंड ठोठावण्यात आला, विशेष करून डासांची हिटीग स्पॉट शोधून काढण्यात आल्यामुळे त्यावर नियंत्रण मिळविणे शक्य झाल्याचेही खत्री यांनी सांगितले. अशा ठिकाणांवर वारंवार भेटी देणे, पान वेली काढणे, गप्पी मासे सोडगे आदी उपाययोजना करण्यात येत आहेत. कचऱ्याचे निर्मुलनालाही महत्व देण्यात आल्याने घंटागाडी ठेकेदाराला आठ लाखाचा दड करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी सोमवारी (दि.३१) वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेवून साथ रोगाचा आढावा घेतला. डेंग्यूवर नियंत्रीत ठेवण्यासाठी ऑगष्ट महिन्यात राबविण्यात आलेल्या आरोग्य पंधरवडा मोहीमेचे यश असल्याचे निदर्शनास आल्याने यापुढे दर महिन्यात दहा दिवस मोहीम राबवून सातत्य राखण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले, पाऊस कमी झाल्याने आता आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. पावसाचे पाणी सावून त्यात डेडेंग्यू, मलेरियाचे डासांची उत्पती होत असल्याचे पाहून १० ते २५ ऑगष्ट दरम्यान मनपाने डेंग्यू निर्मूलन मोहीम राबविली. त्यात १ लाख, ७० हजार घरांतील ६ लाख, ५० हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली त्यात १४२७ तापाचे रूग्ण आढळून आले.
देशात सर्वत्र स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढला आहे. हवेतून संसर्ग होणाऱ्या या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी टॉमी पलूचे औषधे मनपाकडून मोफत दिले जाते. खासगी रूग्णालयात रूग्ण उपचार घेत असेल तरीही मनपा टॉमीपलू उपलब्ध करून देईल अशी माहितीही आयुक्त खत्री यांनी दिली. दर वर्षाआड येणाऱ्या या साथीच्या आजाराचा गर्दीतूनब प्रसार होतो. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात हा प्रचार रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जाणार असल्याचे आयुक्त खत्री यांनी सांगितले.