Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime: आई आहे की औदसा…! पाच दिवसांच्या चिमुकल्याचा 70 हजारांत सौदा; मालेगावात आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल

Nashik Crime: नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये अवघ्या पाच दिवसांच्या नवजात बाळाची 70 हजार रुपयांत कथित विक्री केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. आयशानगर पोलिसांनी बाळाच्या आईला अटक केली असून न्यायालयाने तिला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आणखी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 29, 2026 | 11:53 AM
आई आहे की औदसा...! पाच दिवसांच्या चिमुकल्याचा 70 हजारांत सौदा; मालेगावात आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल

आई आहे की औदसा...! पाच दिवसांच्या चिमुकल्याचा 70 हजारांत सौदा; मालेगावात आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल

Follow Us
Follow Us:
  • मालेगाव हादरलं! 5 दिवसांच्या बाळाची 70 हजारांत विक्री
  • मालेगाव प्रकरणातून मोठ्या रॅकेटचा संशय
  • मालेगावात आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल
Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातील (nashik crime) मालेगावमध्ये अवघ्या पाच दिवसांच्या नवजात बाळाची 70 हजार रुपयांत विक्री झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी आयशानगर पोलिसांनी बाळाच्या आईला अटक केली आहे. तिला मालेगाव न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, संबंधित महिलेचा विवाह फार काळ टिकला नव्हता आणि ती सध्या एकटी राहत होती. जुलै महिन्यात तिने एका बाळाला जन्म दिला. त्यानंतर अवघ्या पाच दिवसांच्या बाळाची 70 हजार रुपयांत विक्री करण्यात आल्याचा आरोप आहे.

Accident in Pimpri : ओव्हरटेक करताना टेम्पोची कारला जोरदार धडक; वृद्धाचा मृत्यू, चालक गंभीर

धारावीतील तपासातून मालेगावचे कनेक्शन

या प्रकरणाचा उलगडा मुंबईतील (Mumbai Police) धारावी पोलिसांकडून सुरू असलेल्या कथित बाल तस्करी प्रकरणाच्या तपासादरम्यान झाल्याचे सांगण्यात येत आहे. धारावी पोलीस ठाण्यात बालकांच्या विक्रीसंदर्भात गुन्हा दाखल असून त्याचा तपास करताना पोलिसांच्या हाती मालेगावमधील संबंधित महिलेच्या प्रसूतीशी संबंधित कागदपत्रे लागली.

या कागदपत्रांमुळे संशय निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी मालेगाव गाठून संबंधित महिलेची चौकशी केली. चौकशीदरम्यान पाच दिवसांच्या बाळाची 70 हजार रुपयांत विक्री झाल्याची माहिती समोर आल्याचा पोलिसांचा दावा आहे.

आणखी चौघांविरोधात गुन्हा

या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी महिलेसह आणखी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बाळाच्या विक्रीमध्ये मध्यस्थ म्हणून नेमके कोण सहभागी होते, आर्थिक व्यवहार कसा झाला आणि बाळ सध्या कोणाच्या ताब्यात आहे, याचा शोध घेतला जात आहे.

विशेष म्हणजे प्राथमिक तपासात या प्रकरणामागे नवजात बालकांच्या विक्रीचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा संशय निर्माण झाला आहे. या नेटवर्कचे धागेदोरे तामिळनाडूपर्यंत पोहोचत असल्याची माहिती तपासातून पुढे येत असल्याने पोलीस त्या दिशेनेही तपास करत आहेत.

पाच दिवसांच्या बाळाचा शोध सुरू

या संपूर्ण प्रकरणातील सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विक्री झाल्याचा आरोप असलेल्या नवजात बाळाचा शोध. पोलिसांकडून बाळाला सुरक्षितपणे शोधून ताब्यात घेण्यासाठी तपास सुरू आहे. संबंधित व्यक्तींचे संपर्क, आर्थिक व्यवहार आणि या प्रकरणात सहभागी असलेल्या संभाव्य मध्यस्थांची माहिती तपासली जात आहे.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या महिलेच्या वकिलांनी मात्र आरोपांवर आक्षेप घेतला आहे. खोट्या कागदपत्रांच्या आधारे महिलेला या गुन्ह्यात गोवण्यात आल्याचा दावा बचाव पक्षाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांचा तपास, बाळाचा शोध आणि न्यायालयीन प्रक्रियेतून समोर येणाऱ्या पुराव्यांकडे आता लक्ष लागले आहे.

जुन्या किरकोळ कारणावरून तरुणाचा खून, आईने आरडाओरड केली पण…; नांदेड जिल्ह्यातील घटनेनं खळबळ

Web Title: Malegaon mother arrested for allegedly selling five day old baby for 70000 child trafficking probe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 11:53 AM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • police

संबंधित बातम्या

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा
1

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

Mira Road News: वाहतूक पोलीस चौकी हटवली, मग इतर अतिक्रमणांचे काय? मराठी एकीकरण समितीचा सवाल; कारवाईवरून संताप
2

Mira Road News: वाहतूक पोलीस चौकी हटवली, मग इतर अतिक्रमणांचे काय? मराठी एकीकरण समितीचा सवाल; कारवाईवरून संताप

Navi Mumbai Police: नवी मुंबई पोलीस दलात मोठ्या खांदेपालटाचे संकेत! ११ वरिष्ठ पोलीस निरीक्षक एसीपी पदोन्नतीच्या निवडसूचीत
3

Navi Mumbai Police: नवी मुंबई पोलीस दलात मोठ्या खांदेपालटाचे संकेत! ११ वरिष्ठ पोलीस निरीक्षक एसीपी पदोन्नतीच्या निवडसूचीत

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
4

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.