Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Child Skeleton Found: काळजाचा थरकाप उडवणारी घटना! हरवलेल्या लेकाचा जंगलात सापडला सांगाडा; चप्पल पाहून आईचा आक्रोश

मुसळगाव औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या शंकर नगर परिसरातील नाल्याकाठी या बालकाचा हाडांचा सांगाडा आढळून आला. घटनास्थळी सापडलेले कपडे आणि चप्पल पाहून आईने आपल्या पोटच्या गोळ्याची ओळख पटवली, तेव्हा उपस्थितांचेही डोळे पाणावले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 28, 2025 | 04:50 PM
हरवलेल्या लेकाचा जंगलात सापडला सांगाडा (Photo Credit- AI)

हरवलेल्या लेकाचा जंगलात सापडला सांगाडा (Photo Credit- AI)

Follow Us
Follow Us:

 

  • जंगलात आढळला चिमुकल्याचा सांगाडा
  • आईने ओळखले मुलाचे कपडे आणि चप्पल
  • हिंस्र श्वापदाचा हल्ला की घातपात?
नाशिक: दिवाळीपासून बेपत्ता असलेल्या एका ५ वर्षीय चिमुकल्याचा अंत अत्यंत करुण झाल्याची धक्कादायक घटना सिन्नरमध्ये उघडकीस आली आहे. मुसळगाव औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या शंकर नगर परिसरातील नाल्याकाठी या बालकाचा हाडांचा सांगाडा आढळून आला. घटनास्थळी सापडलेले कपडे आणि चप्पल पाहून आईने आपल्या पोटच्या गोळ्याची ओळख पटवली, तेव्हा उपस्थितांचेही डोळे पाणावले.

सरपण गोळा करताना उघड झाला प्रकार

शनिवारी (दि. २७) दुपारी तीनच्या सुमारास शंकर नगर परिसरात एक दाम्पत्य सरपण गोळा करण्यासाठी गेले होते. नाल्यालगतच्या दाट झाडीत आणि गवताआड त्यांना लहान मुलाचे हाडांचे अवशेष आणि कपडे दिसले. त्यांनी तातडीने सिन्नर पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे, सहाय्यक निरीक्षक रूपाली चव्हाण आणि पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

हे देखील वाचा: Nashik Crime: ऑनलाईन हॉस्पिटलचा नंबर शोधणे पडलं महागात! सायबर भामट्यांनी नाशिकमध्ये दोन जणांना लावला लाखांचा चुना

आईने ओळखले लेकाचे कपडे; घटनास्थळीच फोडला हंबरडा

१५ ऑक्टोबर २०२५ रोजी गणेश नगर भागातून जितेंद्र गुड्डू कुमार सिंग (वय ५) हा मुलगा बेपत्ता झाला होता. पोलीस गेल्या दोन महिन्यांपासून त्याचा शोध घेत होते. घटनास्थळी मिळालेले कपडे आणि चप्पल पाहून जितेंद्रची आई रेश्मा सिंग यांनी हंबरडा फोडला. हा सांगाडा आपल्याच मुलाचा असल्याची ओळख त्यांनी पटवली. मात्र, तांत्रिक खात्रीसाठी पोलिसांनी आईचे रक्ताचे नमुने डीएनए (DNA) चाचणीसाठी घेतले आहेत.

हिंस्र श्वापदाचा हल्ला की घातपात?

जितेंद्र बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी उत्तर प्रदेश, मुंबई आणि शिर्डीपर्यंत तपास चक्रे फिरवली होती. प्राथमिक अंदाजानुसार, या बालकाचा मृत्यू एखाद्या हिंस्र श्वापदाच्या हल्ल्यात झाला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

तपासासाठी फॉरेन्सिक टीम पाचारण

घटनेचे गांभीर्य ओळखून नाशिकहून फॉरेन्सिक लॅबचे पथक आणि श्वानपथक पाचारण करण्यात आले होते. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन ठोंबरे यांच्या उपस्थितीत पंचनामा करून सर्व अवशेष तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

हे देखील वाचा: Nashik Accident: देवीची भेट घेतली अन् क्रूर नियतीशी गाठ पडली! सप्तशृंगी गडाजवळ कार दरीत कोसळून ६ भाविकांचा जागीच मृत्यू

Web Title: The skeleton of a young child was found in the forest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2025 | 04:48 PM

Topics:  

  • Nashik
  • Nashik News

संबंधित बातम्या

Ashok Kharat Case : अशोक खरातच्या अडचणी आणखी वाढणार; एक-दोन नाहीतर तब्बल 105 साक्षीदार तयार
1

Ashok Kharat Case : अशोक खरातच्या अडचणी आणखी वाढणार; एक-दोन नाहीतर तब्बल 105 साक्षीदार तयार

Nashik Crime: वर्षभरापूर्वी लग्न, सतत वाद आणि तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; कुटुंबाचा इशारा- ‘अटक करा अन्यथा आत्मदहन करू’
2

Nashik Crime: वर्षभरापूर्वी लग्न, सतत वाद आणि तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; कुटुंबाचा इशारा- ‘अटक करा अन्यथा आत्मदहन करू’

Nashik News : मटण प्रेमींसाठी धक्कादायक बातमी ! मटण-दहीचे जेवण ठरले जीवघेणे? जेवणानंतर दाम्पत्याची प्रकृती बिघडली; पत्नीचा मृत्यू
3

Nashik News : मटण प्रेमींसाठी धक्कादायक बातमी ! मटण-दहीचे जेवण ठरले जीवघेणे? जेवणानंतर दाम्पत्याची प्रकृती बिघडली; पत्नीचा मृत्यू

Nashik Crime: Snapchat वरून मैत्री, लग्नाचं आमिष अन् 18 वर्षीय तरुणीची फसवणूक; आरोपीविरोधात POCSO अंतर्गत गुन्हा
4

Nashik Crime: Snapchat वरून मैत्री, लग्नाचं आमिष अन् 18 वर्षीय तरुणीची फसवणूक; आरोपीविरोधात POCSO अंतर्गत गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.