Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News: पीकविम्यावरून शेतकऱ्यांची फसवणूक; ३३४ हप्ता भरूनही फक्त १८३ रुपयांची भरपाई

येवला तालुक्यात पीकविम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप होत आहे. शेतकऱ्यांनी ३३४ रुपये हप्ता भरूनही केवळ १८३ रुपयांची भरपाई मिळाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 10, 2026 | 10:31 AM
पीकविम्यावरून शेतकऱ्यांची फसवणूक; ३३४ हप्ता भरूनही फक्त १८३ रुपयांची भरपाई (फोटो सौजन्य-Gemini)

पीकविम्यावरून शेतकऱ्यांची फसवणूक; ३३४ हप्ता भरूनही फक्त १८३ रुपयांची भरपाई (फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us
Follow Us:
  • पीकविम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची क्रूर थट्टा
  • येवला तालुक्यात बळीराजाची फसवणूक
  • हप्ता ३३४ अन् भरपाई मिळाली १८३ रुपये
 राजेंद्र शेलार, येवला : शासनाकडून पिकांचे ५० टक्के नुकसान गृहीत धरून मदत जाहीर केली जात असताना, पीक विमा कंपन्यांनी नुकसानीची टक्केवारी अत्यल्प दाखवून शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळले आहे. तालुक्यातील साताळी येथील एका शेतकऱ्याला मका आणि सोयाबीनच्या नुकसानीपोटी विम्याच्या प्रीमियमपेक्षाही कमी भरपाई मिळाल्याने तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. तालुक्यातील साताळी येथील शेतकरी संदीप मच्छिंद्र कोकाटे यांनी ‘ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी’कडे मका पिकासाठी ३३४ रुपये आणि सोयाबीनसाठी ४०८ रुपये असा एकूण ७४२ रुपये प्रीमियम भरला होता. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने त्यांना मक्यासाठी ३३,४८० रुपये तर सोयाबीनसाठी २७, २५० रुपये भरपाई मिळणे अपेक्षित होते. मात्र, विमा कंपनीने नुकसानीची टक्केवारी केवळ १ टक्का दाखवून मका पिकासाठी अवघे १८३.२१ रुपये मंजूर केले आहेत. सोयाबीनसाठी अद्याप छदामही मिळाला नाही.

“हा तर ‘कॉर्पोरेट जिहाद’…”; IT कंपन्यांतील महिलांच्या लैंगिक शोषणावरून नितेश राणे संतापले; म्हणाले…

विमा कंपन्यांकडून आकडेवारीचा खेळ?

शासकीय स्तरावर ५० टक्के नुकसान गृहीत धरले जात असताना विमा कंपन्यांनी मात्र १ टक्का नुकसान दाखवून ही मदत जाहीर केली आहे. प्रत्यक्ष शेतातील परिस्थिती आणि विमा कंपनीचा विमा कंपन्या नेमके कोणाचे हित जोपासत आहेत? असा सवाल आता शेतकरी विचारत आहेत. प्रीमियम म्हणून भरलेल्या रकमेच्या निम्मी रक्कमही भरपाई म्हणून मिळत नसल्याने ही शेतकऱ्यांची कुचेष्टा असल्याची भावना तालुक्यात व्यक्त होत आहे.

दाव्याचा तपशील असा

अर्ज क्रमांक: ०४०१२७२५००११८२६३५६७०१
नुकसान टक्केवारी: १.०२ टक्के
क्षेत्र टक्केवारी: ० टक्के
एकूण दावा रक्कम रुपये ३४१.५४
देय दावा रक्कम रुपये १८३.३२
अर्ज क्रमांक : ०४०१२७२५००११८२६३५६७०१,
नुकसान टक्केवारी: १.०२ टक्के
क्षेत्र टक्केवारी: ० टक्के
एकूण दावा रक्कमः ० रुपये
“देय दावा रक्कम १५८.२२ रुपये

आम्ही मोठ्या आशेने विम्याचा हप्ता भरतो, पण नुकसान झाल्यावर कंपनी आम्हाला भिकारी समजून तुटपुंजी मदत देते. ७४२ रुपये भरून जर १८३ रुपये मिळणार असतील, तर या योजनेचा फायदा काय? ही आमची चेष्टा आहे. अस्मानी अन् सुल्तानी संकटांनी बळीराजा गेल्या काही वर्षांपासून बेजार आहे. त्यात आता हे संकट आल्याने अजून चिता वाढली आहे, अशी प्रतिक्रिया पीडित शेतकरी साताळी संदीप कोकाटे यांनी दिली.

सखोल चौकशी करण्याची मागणी

मका पिकासाठी केवळ १८३ रुपयांचा दावा मंजूर, सोयाबीन पिकाची भरपाई अद्याप खात्यावर जमा नाही. शासन ५० टक्के नुकसान म्हणतेय, कंपनी मात्र १ टक्काच गृहीत धरतेय. कृषी विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. येवला तालुक्यातील या प्रकरणामुळे आता संपूर्ण जिल्ह्यात पीक विमा योजनेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कृषी विभाग आणि प्रशासन यावर काय भूमिका घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

धक्कादायक! लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर Ashok Kharat यांचे आर्थिक धागेदोरे उघड; सिन्नरमध्ये कुटुंबीयांकडे ४५ एकर जमीन

Web Title: Yeola crop insurance fraud farmers compensation issue news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 10:26 AM

Topics:  

  • agriculture
  • Farmers

संबंधित बातम्या

Maharashtra Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा! कर्जमाफी योजनेला ब्रेक; पुढील आठवड्यात अंमलबजावणीची शक्यता
1

Maharashtra Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा! कर्जमाफी योजनेला ब्रेक; पुढील आठवड्यात अंमलबजावणीची शक्यता

Dharashiv Farmers : धाराशिवच्या ७,६२९ शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ५३.१६ कोटींच्या कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा
2

Dharashiv Farmers : धाराशिवच्या ७,६२९ शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ५३.१६ कोटींच्या कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा

‘सातबारा कोरा करा’; रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाबाहेर शेतकऱ्यांचे आंदोलन, झाडावर चढून कार्यकर्त्यांचा अनोखा विरोध
3

‘सातबारा कोरा करा’; रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाबाहेर शेतकऱ्यांचे आंदोलन, झाडावर चढून कार्यकर्त्यांचा अनोखा विरोध

आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा, रखडलेल्या पेरण्यांना आला वेग; खरीप हंगामासाठी आवश्यक वातावरण तयार
4

आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा, रखडलेल्या पेरण्यांना आला वेग; खरीप हंगामासाठी आवश्यक वातावरण तयार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.