Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवगिरेने जागविला आशेचा ‘किरण’; भारतीय टी-ट्वेंटी महिला क्रिकेट संघात निवड

मिरे (ता. माळशिरस) येथील किरण नवगिरे हिची आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. अनघा देशपांडे नंतर भारतीय संघात स्थान मिळवणारी किरण ही सोलापुरची दुसरी खेळाडु आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 20, 2022 | 03:17 PM
नवगिरेने जागविला आशेचा ‘किरण’; भारतीय टी-ट्वेंटी महिला क्रिकेट संघात निवड
Follow Us
Close
Follow Us:

अकलुज : मिरे (ता. माळशिरस) येथील किरण नवगिरे हिची आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. अनघा देशपांडे नंतर भारतीय संघात स्थान मिळवणारी किरण ही सोलापुरची दुसरी खेळाडु आहे. अत्यंत प्रतिकुल परिस्थित श्रीपुरच्या चंद्रशेखर विद्यालयात शिकत असताना तिने विविध क्रीडा स्पर्धा गाजविल्या होत्या. पुढे पुणे विद्यापिठ महिला क्रिकेट संघ, तसेच नागालँड, अरुणाचल प्रदेश कडुन खेळत सराव आणि सातत्याच्या बळावर तिने भारतीय महिला संघात स्थान मिळवले आहे.

येत्या दहा सप्टेंबरपासून इंग्लंडविरुद्ध सुरु होणाऱ्या तीन सामन्याच्या मालिकेसाठी तिचा टी-ट्वेंटी महिला संघात समावेश झाला आहे. सोलापूरच्या क्रिकेट क्षेत्रासाठी ही आनंदाची बातमी आहे. सोलापुरातील रागिणी क्रिकेट क्लबच्या माध्यमातून तिने अनेक सामने खेळलेले आहेत. माळशिरस तालुक्यातील मिरे या आडवळणी गावातील अल्पभूधारक शेतकरी प्रभू नवगिरे यांची मुलगी आहे. सत्तावीस वर्षीय किरण ही नागालंड क्रिकेट संघाकडून सलामीवीर बॅट्समन (फलंदाज) म्हणून खेळतेय. जोरदार फटकेबाजी करणारी अशी तिची ओळख असून, तिने गेल्या मोसमात अवघ्या ७६ चेंडूत १६२ धावांची तडाखेबाज खेळी करून सर्वाचे लक्ष वेधून घेतले. नागालंडकडून खेळताना अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या वरिष्ठ महिलाच्या देशांतर्गत टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेतील प्लेटग्रुपमध्ये तिने वाखाणण्याजोगी कामगिरी केली आहे. सात सामन्याची ही देशांतर्गत टी-ट्वेंटी मालिका होती.

याच मालिकेतून तिला अखेर आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी सामन्यांसाठी भारतीय महिला टी-ट्वेंटी संघात ब्रेक मिळाला. या सात सामन्यांच्या मालिकेत तिने ५४ चौकार आणि ३५ षटकार खेचले आहेत. याशिवाय पुण्यात झालेल्या महिलांच्या टी-ट्वेंटी चालेजमध्ये ३४ चेंडूत ६९ धावांची उल्लेखनीय कामगिरी बजावली. तिच्या या प्रशसनीय खेळीमुळेच येथूनच तिची आंतर राष्ट्रीय क्रिकेटकडे वाटचाल सुरु झाली.

किरण नवगिरेची भारतीय महिला टी-ट्वेंटी संघातील निवड म्हणजे तिच्यासाठी सुखद धक्का आणि आश्चर्यकारक असल्याचे तिने म्हंटले आहे. माझी संघातील निवडीची सुखद बातमी मी माझ्या वडिलांना सांगितली. आमचा आनंद द्विगुणीत झाला होता. ही माजी खरी सुरवात होती. महिलाच्या टी-ट्वेंटीमध्ये जलद धावा कुटण्यासाठी माझे डोळे उघडले. त्यामुळे रनिंग बिट्वीन विकेटवर मी खूप काम केले. आंतरराष्ट्रीय भागीदारी क्रिकेट खेळाडूला चांगला ऑपरेटर बनण्यास मदत करते.

किरण पुढे म्हणते, आगामी देशांतर्गत क्रिकेटमधील दमदार कामगिरीसाठी गेल्या दोन महिन्यापासून पुण्यात टेक्निक (तंत्र) आणि टेम्परामेंटवर अथक मेहनत घेतली आहे. निवड समितीचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि मोठ्या खेळीसाठी माझ्या खेळण्याच्या शैलीवर काम करावे लागणार हे मी ओळखून होते. इंग्लंडमध्ये खेळणे म्हणजे एक आव्हानच आहे. त्यांच्याकडे मोठ्या अनुभवी गोलंदाजांची फळी आहे. मी भरपूर तयारी करेन आणि माझ्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करेन. मला गोलंदाजावर तुटून पडणे आणि षटकार खेचणे खूप आवडते. तरी मी एखाद्या लूस चेंडूची नक्कीच प्रतीक्षा करेन. शेफालीने तिच्या तंत्रावर ज्या पद्धतीने काम करते ते कौतुकास्पद आहे. असे किरण ने नमूद केले.

ती एक नैसर्गिक पॉवर हिटर आहे. तिची ताकद हे तिच्या लहानपणी शेतात कुटुंबियांच्या सोबत काम आणि त्यांना मदत केल्यामुळे तिला बळ मिळाले. आणि वाढत्या वयात तिने खेळलेल्या विविध खेळांमधून तिला बळ मिळाले. ती शॉट पुट आणि भाला फेकायची, कदाचित हेच तिच्या पॉवर हिटिंगचे रहस्य असावे. ती धोनीची मोठी फॅन आहे.

शून्यावर बाद झाल्यानंतर तिला प्रचिती आली की ती दररोज मजा म्हणून षटकार मारू शकत नाही. त्या शून्याने खेळाकडे पाहण्याचा तिचा मानसिक दृष्टिकोन बदलला. महिला टी-ट्वेंटी चॅलेंजनंतर तिने क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आणि तीने याकडे व्यावसायिकाप्रमाणे विचार करायला सुरुवात केली. ती एकच नेट सेशन करायची, पण आता पहाटे साडेचार ते रात्री दहापर्यंत ती अॅकाडमीत असते, ती कॅन्टीनमध्येच जेवत असते. आगामी इंग्लंड दौरा हा तिच्यासाठी तिच्यासाठी एक शिकण्याची संधी असेल आणि तिला तिची प्रतिभा दाखवण्यासाठी एक संधी असणार आहे.

भारताचा टी-ट्वेंटी संघ असा राहील

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, जेमिमाह रॉड्रिग्स, स्नेह राणा, रेणुका ठाकूर, मेघना सिंग, राधा यादव, सब्बिनेनी मेघना, भाटिया (तानिया), राजेश्वरी गायकवाड, दयालन हेमलता, सिमरन दिल बहादूर, रिचा घोष (डब्ल्यूके), किरण प्रभू नवगिरे.

अखिल भारतीय महिला निवड समितीने शुक्रवारी भारताच्या आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी संघांची घोषणा केली. भारत १० सप्टेंबरपासून इंग्लंडमध्ये तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे.

‘बाप’चं खरा मार्गदर्शक

[blockquote content=”शिक्षक, आईबाप आणि शिकणारी मुले या तिघांनी ठरविले तर, निश्चितच काहीतरी चांगले घडते. मी अंगठे बहाद्दर आहे. रोज लोकांकडे काम करणारा माणूस आहे. पण, मी कधीच हार मानत नाही. मी शिकलो नाही. पण पोरं शिकवली आहेत. पोरं चांगली शिकली याचा आनंद आहे. कुठेही सामना असला तर, किरण अगोदर मला फोन करते. खेळाबाबत चर्चा करते. कुठे बॉल गेला तर कसा मारायचा हे मी तिला सांगतो. बॉल कसा हाणायचा म्हणजे उंच जाईल. कसा हाणला तर भुईटी जाईल. हे मी तिला सांगतो. त्यावेळी, ती जाम खूश होते. दादा तुमचे विचार मोठे आहेत. तुम्ही सांगताय तसेच खेळण्याचा मी प्रयत्न करते असे म्हणते. त्यावेळेला मलाही खूप आनंद होतो. ” pic=”” name=”- प्रभू महादेव नवगिरे”]

Web Title: Navagire awakened a ray of hope selection in the indian t20 womens cricket team nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2022 | 03:16 PM

Topics:  

  • India Team
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update

संबंधित बातम्या

Asia Cup 2025 साठी 8 संघ जाहीर! सर्वात मजबूत स्क्वॉड कोणता? पहा एका क्लिकवर
1

Asia Cup 2025 साठी 8 संघ जाहीर! सर्वात मजबूत स्क्वॉड कोणता? पहा एका क्लिकवर

महाराष्ट्र बदलत आहे…१७ ऑगस्ट शेवटची संधी, लवकरच सहभागी व्हा @ MH 1st Conclave 2025
2

महाराष्ट्र बदलत आहे…१७ ऑगस्ट शेवटची संधी, लवकरच सहभागी व्हा @ MH 1st Conclave 2025

Top Marathi News Today Updates : गोंदियात छगन भुजबळांचा ध्वजारोहणास नकार; प्रकृतीचे दिले कारण
3

Top Marathi News Today Updates : गोंदियात छगन भुजबळांचा ध्वजारोहणास नकार; प्रकृतीचे दिले कारण

तुमचा एक प्रश्न महाराष्ट्राची दिशा बदलू शकतो! @ MH 1st Conclave 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स
4

तुमचा एक प्रश्न महाराष्ट्राची दिशा बदलू शकतो! @ MH 1st Conclave 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.