पुणे महानगरपालिका निवडणूक (फोटो- सोशल मीडिया)
पुण्यात उमेदवारांनी प्रचारासाठी लावला जोर
पुणे महानगरपालिका निवडणूक होणार चुरशीची
15 तारखेला मतदान तर 16 तारखेला निकाल जाहीर होणार
पुणे: राज्यात महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. 15 तारखेला मतदान आणि 16 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान पुण्यात दोन्ही राष्ट्रवाद कॉँग्रेस एकत्रित तर भाजप आणि शिवसेना एकत्रित लढणार आहेत. प्रचार करण्याचे दिवस संपत आल्याने उमेदवारांनी प्रचार करण्यासाठी जोर लावला आहे.
फुलेनगर- नागपूर चाळ प्रभाग क्रमांक २ भारतीय जनता पार्टी (BJP) व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांचे अधिकृत उमेदवार ऍड. रेणुका चलवादी , सुभाष वाघमोडे ,राहुल जाधव व भाजपा पुरस्कृत आदिती बाबर यांनी नागपूरचाळ , शांतीनगर, कामगारनगर, प्रेस कॉलनी ,मेंटल कॉर्नर, जाधवनगर या ठिकाणी प्रत्येक मतदारांच्या घरी जाऊन प्रचार केला प्रभागाचा विकासाला चालना देण्यासाठी भाजपला बहुमत द्या असे आवाहन रेणुकाताई यांनी केले.
पदयात्रेदरम्यान व गृहभेटीदरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग व सकारात्मक प्रतिसाद मिळाला यावेळी अनेक मंडळे महिला मंडळ महिला बचत गटाच्या नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यावर सकारात्मक चर्चा करून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन रेणुकाताई चालवादी यांनी दिले ठिक ठिकाणी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला .या रॅलीमध्ये उमेदवारासमवेत सामाजीक कार्यकर्ते के .टी. सूर्यवंशी , स्वप्नील शिर्के ,नागाप्पा गुडद्वार, अमरेश चालवादी , पूजा वाघमारे ,उमेश वाघमारे ,प्रतीक्षा वाघमारे, प्रज्ञा ओव्हाळ , सीमा धावरे आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






