
त्यानुसार महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी परिपत्रक जारी केले असून हरित विभाग स्पर्धेमध्ये पर्यावरणप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील उद्याने, ट्री बेल्ट, रस्ता दुभाजक व चौक नीटनेटके ठेवण्यासाठी व रहिवास क्षेत्राभोवतालच्या परिसरातील हिरवळ वाढवून नवी मुंबईला स्वच्छ व हरित शहर म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी पर्यावरण रक्षक व संवर्धक अशी विभागनिहाय ‘हरित विभाग स्पर्धा’ आयोजित करण्यात येत आहे.
उद्यानांची जोपासना करीत असताना नाविन्यपूर्ण संकल्पना राबवून शहरातील हरित आच्छादन वाढवावे व नवी मुंबई परिसरात ज्या ठिकाणी सुशोभिकरण करण्यास वाव आहे अशा ठिकाणी अत्याधुनिक स्वरूपात सुशोभिकरण करण्याचे उद्दिष्ट साकारण्यासाठी या हरित विभाग स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
आपल्या परिसराचा स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक विकास करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या हरित विभाग स्पर्धेमध्ये खालील बाबींवर विशेष भर देण्यात येणार आहे. या स्पर्धेचा कालावधी ऑगस्ट 2026 ते मार्च 2027 पर्यंत राहील. सदर कालावधीत विभाग स्तर अधिकारी तथा वृक्ष अधिकारी यांचे नियंत्रण व मार्गदर्शनाखाली विभाग जास्तीत जास्त हरित व सुशोभित होईल यादृष्टीने कामकाज अपेक्षिलेले आहे. त्या अनुषंगाने विभाग अधिकारी तथा वृक्ष अधिकारी यांनी आपल्या अधिनस्त अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून अंमलबजावणी करून घ्यावयाची आहे. या अंतर्गत नागरिकांमध्ये पर्यावरणविषयक जाणीव जागृती करून व्यापक लोकसहभागातून विविध उपक्रम राबवावयाचे आहेत.
या हरित विभाग स्पर्धेत, नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व ८ विभाग कार्यालयांचा समावेश असेल व आपला विभाग हरित व आदर्श बनवण्यासाठी सर्व साधनांचा वापर करुन या स्पर्धेचे नियोजन करावे असे प्रस्तावित आहे.
सदर स्पर्धेचा कालावधी ३१ मार्च २०२७ पर्यंत राहील. या कालावधीत विभाग स्तरावर विभाग अधिकारी तथा वृक्ष अधिकारी यांचे नियंत्रण व मार्गदर्शन राहील. त्यांनी आपला विभाग जास्तीत जास्त हरित, सुंदर व सुशोभित होईल यादृष्टीने कामकाज करावयाचे आहे. त्या अनुषंगाने विभाग अधिकारी तथा वृक्ष अधिकारी यांनी आपल्या अधिनस्त कर्मचारी समुहाच्या सहाय्याने आवश्यक कामे करून घ्यावयाची आहेत. यामध्ये लोकसहभागावर भर द्यावयाचा आहे. स्पर्धेचा एकूण कालावधी ८ महिने इतका राहील. त्यामध्ये प्रभागनिहाय ‘ग्रीन प्रोफाईल’ तयार करणे आणि जनजागृती करणे, प्रभागांमध्ये प्रत्यक्ष कामे, वृक्षारोपण, सुशोभिकरण आणि नागरिकांचा सहभाग इ. बाबींवर काम करावयाचे आहे. स्पर्धेच्या अंतिम 15 दिवसात केलेल्या कामाचे मूल्यमापन, गुणांकन होईल आणि अंतिम निकालाची घोषणा करण्यात येईल.
या कामाचे मूल्यमापन पारदर्शक व्हावे यादृष्टीने उपआयुक्त (उद्यान) यांच्या अध्यक्षतेखाली नामांकित पर्यावरण संस्था / स्वयंसेवी संस्था यांच्या पर्यवेक्षण नियंत्रण समितीकडून अंतिम परीक्षण केले जाईल. या ‘हरित विभाग’ अर्थात ‘ग्रीन वॉर्ड’ स्पर्धेच्या माध्यमातून विभागाविभागांमध्ये निकोप स्पर्धा होऊन नवी मुंबईच्या हरित विकासाला चालना मिळेल आणि लोकसहभागावर भर दिल्याने पर्यावरणविषयक जाणीवजागृती होऊन लोकचळवळ उभी राहील असा विश्वास महापौर सुजाता पाटील आणि आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
Mumbai News: जुहू चौपाटीवर कचऱ्याचा डोंगर! ६ तासांत ८६ टन कचरा हटवला