Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Crane Accident: ऐरोली माईंडस्पेसमध्ये क्रेनचा हुक तुटला; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने उपचारादरम्यान जीव गमावला

Navi Mumbai Crane Accident: नवी मुंबईतील ऐरोली माईंडस्पेस परिसरात क्रेनचा हुक तुटून झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. यातील एका व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान प्राण गेला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 18, 2026 | 06:24 PM
ऐरोली माईंडस्पेसमध्ये क्रेनचा हुक तुटला; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने उपचारादरम्यान जीव गमावला

ऐरोली माईंडस्पेसमध्ये क्रेनचा हुक तुटला; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने उपचारादरम्यान जीव गमावला

Follow Us
Follow Us:
  • क्रेनचा हुक तुटून झालेल्या अपघातात दोघांचाही मृत्यू
  • एकाचा जाग्यावर, तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान प्राण गेला
  • निष्काळजीपणावर नागरिकांचा उद्रेक
नवी मुंबई : नवी मुंबईतील ऐरोली-पटणी रोडवरील माईंडस्पेस परिसरात गुरुवारी एका बांधकाम साईटवर क्रेनचा अतिशय वजनदार हुक कोसळून घडलेल्या अपघातात दोन्ही कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. क्रेनचा अतिशय अवजड हुक थेट अंगावर पडल्याने एका कामगाराचा घटनास्थळीच तडफडून मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेले भोबि सुरेंद्र राय (वय ४५) यांचा कळवा येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या भीषण घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून बांधकाम क्षेत्रातील सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत कामगाराचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून दुसऱ्या मृत कामगाराची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत.

Navi Mumbai News: मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेत BLOच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह; उपमहापौर दशरथ भगत नाराज

सुरक्षा अधिकारी फरार? ठेकेदाराचा गुन्हा लपवण्याचा प्रयत्न

या दुर्घटनेनंतर बांधकाम साईटवरील सुरक्षेचा भीषण बोजवारा समोर आला आहे. काम सुरू असताना सुरक्षेची जबाबदारी असलेले सुरक्षा अधिकारी (सेफ्टी ऑफिसर) प्रणय हे घटनास्थळी उपस्थित नव्हते, असा गंभीर आरोप केला जात आहे. तसेच, ठेकेदार वैभव रॅपिडो यांनी या प्राणघातक घटनेची कोणतीही माहिती कामगार विभागाला (Labor Department) दिली नसल्याचे समोर आले आहे. नियमानुसार अपघाताची तात्काळ नोंद करणे बंधनकारक असताना, प्रकरण दाबण्यासाठीच हे वृत्त दडपण्याचा प्रयत्न केला गेल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

काही दिवसांपूर्वीच एपीएमसी परिसरात घडली होती अशीच दुर्घटना

काही दिवसांपूर्वीच एपीएमसी सीएनजी पंपाच्या मागे असलेल्या एका मोठ्या बांधकाम साईटवरून असाच एक प्रचंड मोठा पाईप अचानक खाली कोसळला होता. त्यावेळी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. मात्र, त्या घटनेनंतरही प्रशासनाने आणि कंत्राटदारांनी कोणतीही गंभीर दखल न घेतल्यानेच आज दोन निष्पाप कामगारांना आपला जीव गमवावा लागल्याचा संताप व्यक्त केला जात आहे.

मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

कामगारांच्या जिवाची पर्वा न करता सुरक्षेशिवाय काम करून घेणारे ठेकेदार वैभव रॅपिडो, सेफ्टी ऑफिसर प्रणय आणि संबंधित बांधकाम कंपनीवर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी आक्रमक मागणी विविध कामगार संघटना व स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Navi Mumbai News: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीला मिळणार ब्रेक? पाम बीच रोडवर उड्डाणपुलांचा पर्याय

Web Title: Navi mumbai crane accident mindspace two dead negligence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 06:24 PM

Topics:  

  • Accident
  • Airoli
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

Navi Mumbai News: ६ ऑक्टोबरला नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद; जाणून घ्या कोणत्या भागांना फटका
1

Navi Mumbai News: ६ ऑक्टोबरला नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद; जाणून घ्या कोणत्या भागांना फटका

Navi Mumbai News: वाशी एपीएमसीतील केळी पिकवण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; नियमांचे उल्लंघन झाल्याची चौकशी
2

Navi Mumbai News: वाशी एपीएमसीतील केळी पिकवण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; नियमांचे उल्लंघन झाल्याची चौकशी

Navi Mumbai News: नवी मुंबई सायन्स पार्कच्या कामाला वेग; १०५ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी, १३५ वैज्ञानिक मॉडेल्स उभारणार
3

Navi Mumbai News: नवी मुंबई सायन्स पार्कच्या कामाला वेग; १०५ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी, १३५ वैज्ञानिक मॉडेल्स उभारणार

Accident News: पहिल्यांदाच हट्ट केला अन् काळाने हिरावून नेले; दिवेआगरच्या समुद्रात सुमितचा दुर्दैवी अंत
4

Accident News: पहिल्यांदाच हट्ट केला अन् काळाने हिरावून नेले; दिवेआगरच्या समुद्रात सुमितचा दुर्दैवी अंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.