
विकासकांना नवी मुंबई पालिकेचा दणका (फोटो सौजन्य - iStock)
वायू प्रदूषणाबाबत महत्त्वाचे पाऊल
सध्या हिवाळी कालावधीत वातावरणातील वाढलेले धूळ आणि धुळीचे प्रमाण लक्षात घेत त्यादृष्टीने विविध उपाययोजना करताना बांधकाम साईट्सवर प्रदूषण प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केल जात असल्याबाबत प्रत्यक्ष साईट्सला भेट देऊन तपासणी करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार मानक कार्यप्रणालीची प्रत्यक्ष जागेवर अंमलबजावणी योग्य रितीने होत असलेबाबतची खातरजमा करणेकरिता नगररचना विभागामार्फत अभियंत्यांची विभागनिहाय पथके तयार करण्यात आली होती. या अभियंत्यांनी बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पांच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एकूण 85 प्रकल्पांच्या ठिकाणी सदर कार्यप्रणालीचे पूर्णपणे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले होते.
त्यानुसार 26 नोव्हेंबर 2025 रोजीच्या पत्रान्वये सदर 85 प्रकल्पांच्या विकासकांना अधिनियमातील तरतुदीनुसार दंडात्मक कार्यवाही करणेबाबत तसेच उक्त मानक कार्यप्रणालीतील बाबींची त्वरीत पूर्तता करुन पुढील 7 दिवसात आपला खुलासा सादर करणेबाबत सूचित करण्यात आले होते. अन्यथा त्यांच्या भूखंडावर देण्यात आलेल्या बांधकाम परवानगीस काम स्थगिती आदेश देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे कळविण्यात आले होते.
८५ पैकी १८ विकासकांना नोटीस
एकूण 85 प्रकल्पांपैकी 18 प्रकल्पांच्या विकासकांनी मानक कार्यप्रणालीतील प्रमुख बाबींची पूर्तता न केल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित प्रकल्पांना महापालिका आयुक्त यांच्या मान्यतेने बांधकाम स्थगिती आदेश देण्यात आलेले आहेत.नवी मुंबईतील पर्यावरणाविषयी जागरूक राहत वायूप्रदूषण प्रतिबंधासाठी ठोस पावले उचलली जात असून 18 बांधकामांना दिलेले स्थगिती आदेश हा त्याच उपाययोजनांचा एक भाग आहे.
त्या अनुषंगाने आयुक्त महोदय यांचे मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व विकासक, वास्तुविशारद यांची सर्व विभागांचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी यांच्यासमवेत ध्वनी व वायू प्रदूषणास प्रतिबंध करणेकरिता जाहीर मानक कार्यप्रणालीचे पालन करणेबाबत सूचना करण्याकरिता 06 नोव्हेंर 2025 रोजी बैठक आयोजित केली होती.
या बैठकीमध्ये सहायक संचालक नगररचना सोमनाथ केकाण यांनी सर्व विकासकांना मानक कार्यप्रणालीची सविस्तर माहिती देत त्याचे काटेकोरपणे पालन करावे अशा सूचना दिल्या होत्या व ज्या विकासकांकडून सदर मानक कार्यप्रणालीचे उल्लंघन होईल अशा विकासकांना दंड आकारण्यात येईल तसेच याबाबत गांभीर्याने कार्यवाही न झाल्यास सदर विकासकांच्या प्रकल्पांना बांधकाम स्थगिती आदेश देण्यात येतील, असे स्पष्टपणे सूचित केले होते.
१८ बांधकामांना पालिकेची स्थगिती
१) मयुरेश रिअल इस्टेट, बेलापुर
भूखंड क्रमांक ७५, ७६ सेक्टर २५
२) टुडे रॉयल बिलकोन
भूखंड क्रमांक १, सेक्टर ३०,३१, बेलापुर
३) वेलवन सिक्युरिटी प्रा. लिमिटेड
भूखंड क्रमांक ८६ ए, सेक्टर १५ बेलापुर
४) गामी एंटर प्रायजेस
शहाबाज, बेलापुर
५) शिवशक्ती
भुखंड जी,४१,४२, सेक्टर १९/२० बेलापुर
६) संत ज्ञानेश्वर माऊली संस्था
भूखंड १४, सेक्टर ३०, बेलापुर
७) दत्तगुरु सोसायटी
सीटीएस ए 122,शहाबाज, किल्ले गावठाण, बेलापुर
८) दत्तगुरु सोसायटी
सीटीएस बी 122,शहाबाज, किल्ले गावठाण, बेलापुर
९) विनय आंग्रे
सीटीएस १०० ते१०७, ११९८
किल्ले गावठाण, बेलापुर
१०) ड्रीमवूड सोसायटी, डीडीएसआर
भुखंड क्रमांक २२ ते २६ सेक्टर १३ नेरूळ
११) ए. के इंफ्रा
भूखंड ५५, सेक्टर १९ ए, नेरूळ
१२) वर्षा इन्फ्रास्ट्रकचर
भूखंड ५६, सेक्टर १९ ए, मी
१३)प्लॅटिनम डेव्हलपर
भूखंड ३६,३७, ३८, नेरूळ सेक्टर २५
१४) सारस इन्फ्रा
भुखंड ११ ए, सेक्टर ३० नेरूळ
१५)प्लॅटिनम डेव्हलपर
भूखंड ११ , नेरूळ सेक्टर ३०
१६) शुभम सोसायटी
भूखंड १, सेक्टर १६, वाशी
१७) पंचरत्न सोसायटी
अक्षर डेव्हलपर
सेक्टर ९ ,वाशी
१८) सीटी इन्फ्रा
भूखंड २२, सेक्टर ९, घणसोली