Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai News : नवी मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल! नव्या जबाबदाऱ्यांसह कामगिरीकडे लागल्या सर्वांच्या नजरा

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात गेल्या काही दिवसांपासून प्रशासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात बदल्या सुरू असून आता वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांनाही वेग आला आहे. परिमंडळ एक, परिमंडळ तीन आणि प्रशासन विभागातील उपायुक्तांच्या बदल्यांनंतर विविध पोलीस ठाण्यांतील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 01, 2026 | 06:49 PM
नवी मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल! नव्या जबाबदाऱ्यांसह कामगिरीकडे लागल्या सर्वांच्या नजरा

नवी मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल! नव्या जबाबदाऱ्यांसह कामगिरीकडे लागल्या सर्वांच्या नजरा

Follow Us
Follow Us:
  • नवी मुंबई पोलिसांत वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
  • अनेक वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
  • नव्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या कामगिरीकडे लक्ष
सावन वैश्य | नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात गेल्या काही दिवसांपासून प्रशासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात बदल्या होत असून, त्यानंतर आता वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांनाही वेग आला आहे. यापूर्वी परिमंडळ एक, परिमंडळ तीन तसेच प्रशासन विभागातील उपायुक्तांच्या बदल्या झाल्यानंतर आता विविध पोलीस ठाण्यांतील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या बदल्यांमुळे पोलीस दलात नवचैतन्य निर्माण झाले असून, नव्या ठिकाणी अधिकारी कोणत्या प्रकारे कामगिरी बजावतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

नवीन आदेशानुसार, तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांची बदली एपीएमसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तर एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांची नियुक्ती सेंट्रल क्राईम ब्रांचमध्ये करण्यात आली आहे. याशिवाय सुनील शिंदे यांची बदली तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

रात्रीच्या वीज कपातीने नवी मुंबईकर हैराण! वाढत्या उष्णतेत झोपमोड, संताप आणि प्रशासनाविरोधात नाराजी

अजय शिंदे यांची उल्लेखनीय कामगिरी

एपीएमसी पोलीस ठाण्यात कार्यरत असताना अजय शिंदे यांनी अनेक महत्त्वपूर्ण गुन्ह्यांचा तपास यशस्वीपणे पूर्ण केला. गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची उकल, गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय मानले जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा छडा लावण्यात आला असून नागरिकांमध्येही त्यांच्या कार्यपद्धतीबाबत सकारात्मक भावना होती.

आबासाहेब पाटील यांचे तुर्भे एमआयडीसीतील कार्य

तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आबासाहेब पाटील यांनीही प्रभावी कामगिरी बजावली. औद्योगिक क्षेत्रातील विविध समस्या, गुन्हेगारी नियंत्रण आणि स्थानिक पातळीवरील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करण्यात येत आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यासह जनतेशी संवाद वाढविण्याचे प्रयत्न करण्यात आले.

नव्या जबाबदाऱ्यांमध्ये काय ठरणार प्राधान्य?

नव्या पोलीस ठाण्यांची जबाबदारी स्वीकारल्यानंतर हे अधिकारी स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून कोणत्या प्रकारे काम करतात, गुन्हेगारी नियंत्रणासाठी कोणत्या उपाययोजना राबवतात आणि नागरिकांशी समन्वय कसा साधतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेषतः एपीएमसी आणि तुर्भे एमआयडीसीसारख्या संवेदनशील व महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांमध्ये नव्या नेतृत्वाकडून प्रभावी कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या नेतृत्वाची चर्चा

नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे हे एक सक्षम, अभ्यासू आणि परिणामकारक अधिकारी म्हणून ओळखले जातात. कोणताही गाजावाजा किंवा प्रसिद्धीचा हव्यास न बाळगता ते शांतपणे आणि प्रभावीपणे प्रशासन चालवत असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविणे आणि जनतेचा विश्वास संपादन करणे यामध्ये उल्लेखनीय प्रगती केली आहे.

विशेष म्हणजे, पोलीस दलातील महत्त्वाच्या आणि तथाकथित “क्रीम पोस्टिंग” मानल्या जाणाऱ्या ठिकाणांवर नियुक्त्या करताना त्यांनी कोणत्याही प्रकारच्या राजकीय दबावाला बळी न पडता गुणवत्ताधारित निर्णय घेतल्याचे बोलले जाते. गेल्या चार वर्षांत अनेक सक्षम आणि कार्यक्षम अधिकाऱ्यांना संधी देत त्यांनी प्रशासनात पारदर्शकता आणि कार्यक्षमता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

घणसोली उद्यानात पाण्याच्या टाकीची दुरावस्था, दूषित पाण्याची नगरसेवक सौरभ शिंदे यांनी केली पोलखोल

नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या

वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या या बदल्यांमुळे नवी मुंबई पोलीस दलात नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे. अनुभवी अधिकाऱ्यांच्या या नियुक्त्यांमुळे संबंधित पोलीस ठाण्यांच्या कामकाजात अधिक गतिमानता येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आता नव्या जबाबदाऱ्या स्वीकारलेल्या अधिकाऱ्यांची पुढील कामगिरी कशी राहते आणि नागरिकांच्या अपेक्षांवर ते कितपत खरे उतरतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: Navi mumbai police commissionerate senior police inspector transfers administrative changes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 06:49 PM

Topics:  

  • Maharashtra Police
  • Navi Mumbai
  • police

संबंधित बातम्या

Rohit Pawar: पुण्यात कलम 144 लागू केल्याने रोहित पवार संतप्त; ‘विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकार घाबरलं का?’
1

Rohit Pawar: पुण्यात कलम 144 लागू केल्याने रोहित पवार संतप्त; ‘विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकार घाबरलं का?’

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

घणसोलीत पाण्यासाठी नागरिकांचा संताप अनावर! डोक्यावर हंडे घेऊन महापालिका कार्यालयावर धडक, रस्त्यावर आंघोळ-दात घासत अनोखा निषेध
3

घणसोलीत पाण्यासाठी नागरिकांचा संताप अनावर! डोक्यावर हंडे घेऊन महापालिका कार्यालयावर धडक, रस्त्यावर आंघोळ-दात घासत अनोखा निषेध

IndiGo Flight Accident: मोठा अनर्थ टळला! प्रवासी विमानात असतानाच खांबाला धडकली इंडिगो फ्लाइट; पुढील भागाचे नुकसान
4

IndiGo Flight Accident: मोठा अनर्थ टळला! प्रवासी विमानात असतानाच खांबाला धडकली इंडिगो फ्लाइट; पुढील भागाचे नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.