Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवी मुंबई पालिकेची भरती परीक्षा रद्द; १९,२२० उमेदवारांना मोठा धक्का, अवघे २४ तास असताना भाजपाने आणला रद्दचा प्रस्ताव

नवी मुंबई महानगरपालिकेची भरती परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आली आहे. राज्यभरातील १९,२२० उमेदवारांच्या आशांवर पाणी फेरले असून, परीक्षेच्या अवघ्या २४ तास आधी भाजपाने रद्द करण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 20, 2026 | 06:22 PM
नवी मुंबई पालिकेची भरती परीक्षा रद्द; १९,२२० उमेदवारांना मोठा धक्का, अवघे २४ तास असताना भाजपाने आणला रद्दचा प्रस्ताव

नवी मुंबई पालिकेची भरती परीक्षा रद्द; १९,२२० उमेदवारांना मोठा धक्का, अवघे २४ तास असताना भाजपाने आणला रद्दचा प्रस्ताव

Follow Us
Follow Us:
  • नवी मुंबई पालिकेची भरती परीक्षा रद्द
  • राज्यभरातील १९,२२० उमेदवारांचा हिरमोड
  • अवघे २४ तास असताना भाजपाने आणला रद्दचा प्रस्ताव
सिद्धेश प्रधान, नवी मुंबई : नवी महानगरपालिका सरळसेवा भरती 2025-2026 अंतर्गत गट-अ, गट-ब व गट-क मधील 20 संवर्गातील 132 पदांकरिता एकूण 19 हजार 220 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका सरळसेवा भरती 2025-2026 अंतर्गत गट-अ, गट-ब व गट-क मधील 6 संवर्गाची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑनलाईन स्पर्धा परीक्षा दि.21 व 22 जुलै 2026 या कालावधीत 6 जिल्ह्यांतील 13 परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार होती. यामध्ये उमेदवारांना त्यांच्या नजिकच्या केंद्रावर परीक्षा देता यावी अशाप्रकारे नियोजन करण्यात आले होते. मात्र २० जुलै रोजी झालेल्या नवी मुंबई महापालिकेच्या महासभेत ही परीक्षा रद्द करण्याचा प्रस्ताव सत्ताधारी भाजपाने सभागृहात मांडला. या प्रस्तावाला विरोधकांनी देखील समर्थन दिल्याने सर्वानुमते हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. Ya निर्णयाने भरती परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या १९ हजार विद्यार्थ्यांचे स्वप्न धुळीस मिळणार आहे. तर नवी मुंबईतील तरुणांना नोकरीच्या संधी तयार होण्यासाठी सत्ताधारी नवीन सेवा भरती विनियम तयार करणार आहेत.

JP Nadda On CJP Protest: कॉकरोच जनता पार्टी’चे आंदोलन मागे घेतले जाणार? जे. पी. नड्डा यांच्या वक्तव्याने वाढल्या राजकीय चर्चा

नवी मुंबई महानगरपालिकेची भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक पध्दतीने काटेकोर रितीने व्हावी याकडे महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी कटाक्षाने लक्ष दिले होते. परीक्षा सुव्यवस्थितरित्या पार पाडाव्यात याकरिता प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे वर्ग 1 श्रेणीचे अधिकारी हे समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्याचप्रमाणे १३ केंद्रावर महानगरपालिकेचे 2 अथवा 3 अधिकारी केंद्र निरीक्षक नियुक्त करण्यात आले होते.

अमरावती जिल्ह्यात 1112, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 2535, मुंबई जिल्ह्यात 8123, नागपूर जिल्ह्यात 948, नाशिक जिल्ह्यात 1783 व पुणे जिल्ह्यात 4429 अशा प्रकारे 6 जिल्ह्यात एकूण 18,930 उमेदवार परीक्षेस प्रविष्ट झाले होते. सदर परीक्षा प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्या माध्यमातून घेण्यात येणार होती.

परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांना सदर परीक्षेचे प्रवेश पत्र दि.10 जुलै 2026 पासूनच ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले होते. तसेच उमेदवारांना प्रवेशपत्रे लवकरात लवकर डाऊनलोड करावीत, असे संदेश एसएमएस व ई मेलव्दारे पाठविण्यात आलेले होते. मात्र परीक्षेच्या २४ तास आधी भरती प्रक्रिया रद्द करण्यात आल्याने उमेदवारांसाठी धक्कादायक बाब मानली जात आहे.

भरती पालिकेची प्रत्येक जिल्ह्यांमध्ये का ठेवली आहे. नवी मुंबईतील तरुणांसाठीच भरती प्रक्रिया पार पडणे आवश्यक होते. नियमात भरती राज्यभरात राबवणे असे कोठेही लिहिलेले नाही. आपण नवी सेवा भरती विनियम आणणार आहोत. त्यामुळे ही भरती रद्द करावी. आपण अर्जामध्ये लिहिले आहे की कोणत्याही कारणास्तव परीक्षा रद्द करता येईल. ते अधिकार पालिकेकडे अबाधित आहेत. पालिकेने तातडीने या सर्वानुमते संमत केलेल्या प्रस्तावाची अंमलबजावणी करायची आहे, अशी माहिती नवी मुंबई महापालिका सभागृह नेते, भाजपा सागर नाईक यांनी दिली.

नवी मुंबईत दरवर्षी हजारो तरुण पास होतात. यात अभियांत्रिकी, मेडिकल असे सर्व क्षेत्रातील तरुण आहेत. त्यांना विविध शहरांत नोकऱ्यांसाठी वणवण फिरावे लागते. त्यामुळे पालिकेने राज्यभरासाठी भरती करण्याऐवजी नवी मुंबई पुरती भरती प्रक्रिया राबवावी. लोकसंख्या वाढत आहे. पालिकेने देखील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी माहिती नगरसेविका, नेरूळ,भाजपा नेत्रा शिर्के यांनी दिली.

कलम ४५६ अधिन्वये अधिसूचित केले आहे. अवघ्या २४ तासांवर आलेली परीक्षा होऊन द्यावी. भविष्यात भरपूर पदे रिक्त होणार आहेत. आपली निमसरकारी संस्था आहे. खासगी संस्था नसल्याने ती शहरापुरती मर्यादित ठेवू शकत नाही. परीक्षा रद्द केल्यास, अनेक प्रश्न उपस्थित होतील. न्यायालयाला उत्तर द्यावे लागेल. आपल्याला परीक्षेचे नियम बदलण्यासाठी परीक्षा रद्द केली हे योग्य नाही. कोणी न्यायालयात गेल्यास त्याला आपण काय उत्तर द्यायचं ? आयुक्त, नवी मुंबई पालिका डॉ. कैलास शिंदे यांनी दिली.

कोणी कोठेही जातात, सेटिंग करतात, डिग्री विकत घेऊन येतात. मग नवी मुंबईतील तरुणांनी काय करायचे? सभागृहाचा निर्णय पाळायचा का नाही हे आयुक्तांनी सांगावे. आयुक्तांनी भावनिक साद घालू नये, अशी माहिती नगरसेवक, शिवसेना, कोपरखैरणे शिवराम पाटील यांनी दिली.

Diesel Blending: महत्त्वाची बातमी! डिझेलमध्येही बायोडिझेलचं मिश्रण; पेट्रोल पंपांवर विक्रीला सुरुवात, किती टक्के आहे प्रमाण?

Web Title: Navi mumbai municipal corporation recruitment exam cancelled 19220 candidates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 06:22 PM

Topics:  

  • BJP
  • Navi Mumbai
  • police

संबंधित बातम्या

Mumbai protest : मुंबईत नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांचा दणका, चैत्यभूमी प्रकरणाची चौकशी सुरू; 8 गुन्हे दाखल
1

Mumbai protest : मुंबईत नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांचा दणका, चैत्यभूमी प्रकरणाची चौकशी सुरू; 8 गुन्हे दाखल

‘दिल्ली पोलिसांनी व्यवस्थित पुठ्ठे सुजवले…’ भाजप नेता पुन्हा बरळला, CJP आंदोलनावरून भाजपकडून जहरी टीका
2

‘दिल्ली पोलिसांनी व्यवस्थित पुठ्ठे सुजवले…’ भाजप नेता पुन्हा बरळला, CJP आंदोलनावरून भाजपकडून जहरी टीका

आता थांबायचं नाय…! आंदोलकांवरील लाठीचार्ज पाहून Sonam Wangchuk यांचा मोठा निर्णय; 23 व्या दिवशी उपोषण सुरु ठेवण्याचा मेसेज
3

आता थांबायचं नाय…! आंदोलकांवरील लाठीचार्ज पाहून Sonam Wangchuk यांचा मोठा निर्णय; 23 व्या दिवशी उपोषण सुरु ठेवण्याचा मेसेज

Rahul Gandhi on Central Goverment: ‘विद्यार्थी रस्त्यावर, पेपर लीकचे गुन्हेगार मोकाट’; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर घणाघात
4

Rahul Gandhi on Central Goverment: ‘विद्यार्थी रस्त्यावर, पेपर लीकचे गुन्हेगार मोकाट’; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.