Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai: मंदा म्हात्रे यांची विरोधाची तलवार म्यान ? घर वापसी केलेल्या नगरसेवकांबाबत नेमकी भूमिका काय ?

सीवूड्स  दारावे येथील यशवंतराव चव्हाण मैदानावर सुरू असलेल्या क्रिकेट सामन्याचे उद्धाटन आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते झाले. यावेळी घरवापसी केलेल्या कार्यकर्त्यांबाबत काय म्हणाल्या मंदा म्हात्रे ?

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 21, 2025 | 04:57 PM
Navi Mumbai: संदिप नाईकांच्या समर्थकांची भाजपात घरवापसी; पक्षप्रवेशाबाबत काय म्हणाल्या मंदा म्हात्रे ?

Navi Mumbai: संदिप नाईकांच्या समर्थकांची भाजपात घरवापसी; पक्षप्रवेशाबाबत काय म्हणाल्या मंदा म्हात्रे ?

Follow Us
Close
Follow Us:

नवी मुंबई/सिद्धेश प्रधान – माजी आमदार संदिप नाईक यांच्या  समर्थकांनी नुकतंच वनमंत्री गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपात प्रवेश करत घरवापासी केली. मुख्य म्हणजे या सर्व नगरसेवकांनी भाजपच्या मंदा म्हात्रे यांना पाडण्यासाठी जीवाचे रान केले होते. तर दुसरीकडे या नगरसेवकांना घेऊ नये यासाठी नाईक विरोधक नेते तसेच जुन्या भाजपातील पदाधिकाऱ्यांनी देखील जोर लावला होता. मात्र वरिष्ठांनी येणाऱ्या पालिका निवडणुका पाहता पक्ष बळकट करण्यासाठी या माजी नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांना प्रवेश देत एकप्रकारे जुन्या भाजपा पदाधिकारी व नेत्यांच्या मागणीकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. त्यात आता आमदार मंदा म्हात्रे यांनी एका क्रिकेट स्पर्धेदरम्यान ‘ कल का भूला वापस आये तो उसे भुला नहीं केहते ‘ असे वक्तव्य केल्याने सर्वांनीच भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे आमदार मंदा म्हात्रे यांनी विरोधाची तलवार म्यान केली का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

सीवूड्स  दारावे येथील यशवंतराव चव्हाण मैदानावर सुरू असलेल्या क्रिकेट सामन्याचे उद्धाटन आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. एरव्ही जीभेचा पट्टा फिरवणाऱ्या ताई मैदानात बॅट फिरवताना दिसल्या. यावेळी पत्रकारांशी संवाद साधत क्रिकेटचा संबंध राजकारणाशी जोडण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणाल्या की,क्रिकेट खेळ मनाला आनंद देतो. कारण ज्यावेळी आपण चौकार व षटकार मारतो किंवा एखादा विकेट घेतो त्यावेळी लोकांमध्ये आनंद वेगळा असतो. त्यावेळी टाळ्यांनी प्रचंड प्रतिसाद देऊन जो विकेट घेतो किंवा षटकार मारतो त्याचं स्वागत करतं असतात. तसेच क्रिकेट खेळताना फोर सिक्स मारतो. हुतूतू खेळताना पाय ओढतो. हे खेळ राजकारणाशी काहीसे संबंधित आहेत. यावेळी मी देखील क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला असे म्हणताना, आ. म्हात्रे यांनी तुतारीमधून प्रवेश केलेल्या संदिप नाईक समर्थकांवर देखील भाष्य केले.

यावेळी ताई काहीतरी आक्रमक भूमिका घेतील असा कयास बांधला जात असताना, आ. मंदा म्हात्रे यांनी एकप्रकारे सामंजस्याची भूमिका घेतलेली पाहायला मिळाली.त्या म्हणाल्या की, काही दिवसांपूर्वी तुतारीमध्ये गेलेले माजी नगरसेवक भाजपामध्ये परतले आहेत. “कल का भूला घर वापस आये तो उसे भुला नहीं केहते” असे त्या म्हणल्या.हे वक्तव्य आमदार म्हात्रे यांनी त्यांच्याच विरुद्ध केलेल्या माजी नगरसेवकांविरुद्ध केल्याने, सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्यामुळे निवडून आल्यावर कोणत्याही नगरसेवकाला पुन्हा भाजपात प्रवेश मिळणार नाही असे म्हणणाऱ्या, मंदा म्हात्रे यांनी सामंजस्याची भूमिका घेतली आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. यापुढे मंदा म्हात्रे म्हणाल्या की, भाजपने पुन्हा एकदा या नगरसेवकांना संधी दिली आहे. आता त्यांनी संधीचा चांगला वापर करावा. विरोधी कामे करू नयेत. त्यांनी पक्ष संघटना वाढवावी एवढेच माझे म्हणणे आहे असे आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले.त्यामुळे मंदा म्हात्रे यांनी आपली विरोधाची तलवार म्यान केली की वरिष्ठांनी तसे आदेश दिले आहेत? त्यामुळे एकीकडे क्रिकेट कबड्डीची सांगड राजकारणाशी घालणाऱ्या मंदा ताईंनी मांडलेली ही सामंजस्याची भूमिका बुद्धिबळाचा डाव तर नव्हे अशी चर्चा रंगली आहे.

 

Web Title: Navi mumbai sandeep naiks supporters return home to bjp what did manda mhatre say about joining the party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2025 | 04:18 PM

Topics:  

  • BJP
  • MLA Manda Mhatre
  • Navi Mumbai
  • political news

संबंधित बातम्या

‘हा हल्ला माझ्यावर नाही, तर दिल्लीच्या जनतेच्या सेवेवर’, हल्ल्यानंतर मुख्यमंत्री Rekha Gupta यांची पहिली प्रतिक्रिया
1

‘हा हल्ला माझ्यावर नाही, तर दिल्लीच्या जनतेच्या सेवेवर’, हल्ल्यानंतर मुख्यमंत्री Rekha Gupta यांची पहिली प्रतिक्रिया

मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय…! नवी मुंबईत लोकप्रिय पोलीस अधिकाराच्या नावाने वृद्धेची 21 लाखांची फसवणूक
2

मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय…! नवी मुंबईत लोकप्रिय पोलीस अधिकाराच्या नावाने वृद्धेची 21 लाखांची फसवणूक

कोल्हापूरात राजकीय वातावरण रंगलं! कॉंग्रेसला झटका देत राहुल पाटलांचा महायुतीमध्ये प्रवेश निश्चित
3

कोल्हापूरात राजकीय वातावरण रंगलं! कॉंग्रेसला झटका देत राहुल पाटलांचा महायुतीमध्ये प्रवेश निश्चित

Voter List Fraud : महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये भाजपकडून फेरफार, खुणा अन् बदल? जितेंद्र आव्हाड यांचे गंभीर आरोप
4

Voter List Fraud : महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये भाजपकडून फेरफार, खुणा अन् बदल? जितेंद्र आव्हाड यांचे गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.