Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai: सातत्याने कामांना मुदतवाढ का? कंत्राटदारांच्या मुदतवाढीवरून सुतारांचा संताप, स्थायी समितीत उपस्थित केला सवाल

Navi Mumbai News: नवी मुंबई पालिकेच्या स्थायी समितीत शहरातील विविध विकासकामांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली जात असताना, अनेक कामांच्या मुदतवाढीच्या प्रस्तावांवर सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 02, 2026 | 01:04 PM
सातत्याने कामांना मुदतवाढ का? कंत्राटदारांच्या मुदतवाढीवरून सुतारांचा संताप, स्थायी समितीत उपस्थित केला सवाल

सातत्याने कामांना मुदतवाढ का? कंत्राटदारांच्या मुदतवाढीवरून सुतारांचा संताप, स्थायी समितीत उपस्थित केला सवाल

Follow Us
Follow Us:
  • सातत्याने कामांना मुदतवाढ का?
  • कंत्राटदारांच्या मुदतवाढीवरून सुतारांचा संताप
  • स्थायी समितीत उपस्थित केला सवाल
सिद्धेश प्रधान, नवी मुंबई: नवी मुंबई पालिकेच्या स्थायी समिती बैठकांमध्ये शहराच्या विविध भागातील विकास कामांना सध्या स्थायी समितीत मंजुरी देण्यात येत आहे. शहराच्या आठ विभागांसह १४ गावांतील विविध विकासकामांचे प्रस्ताव स्थायी समितीत येत आहेत. यातील अनेक प्रस्ताव हे महासभा अस्तित्वात आल्यावर शहरातील नागरिकांनी मांडलेल्या समस्या व सूचनांनुसार तयार करण्यात आले आहेत. मात्र अनेक प्रस्ताव हे प्रशासनाने देखील आणलेले आहेतं तर अनेक प्रस्ताव हे वर्षानुवर्षे सुरू असलेल्या कामांचे येत आहेत. मात्र यात देखील अनेक प्रस्ताव हे मुदतवाढीसाठी पटलावर येत असल्याचे दिसून येत आहे.

आतापर्यंत झालेल्या स्थायी समितीच्या बैठकांमध्ये या मुदतवाढीच्या प्रस्तावांवर सातत्याने स्थायी समिती सदस्यांकडून ताशेरे ओढले जात आहेत. माजी महापौर तसेच विद्यमान स्थायी समिती सदस्य जे. डी सुतार यांनी या मुदतवाढीच्या प्रस्तावांवर आक्षेप घेत, अधिकारी मुदतवाढ देईपर्यंत काय करत असतात? अधिकाऱ्यांना उशिरा जाग येते का असा संतप्त सवाल सदस्य जयवंत सुतार यांनी बैठकीत केला.

Navi Mumbai : स्थायी समितीत 9.41 कोटींच्या नागरी कामांना मंजुरी; वाशी-शिरवणेतील रस्ते सुधारणा लागणार मार्गी

नवी मुंबई पालिकेत प्रशासकीय कालावधी संपल्यावर महासभा अस्तित्वात येऊन, स्थायी समितीचे कामकाज सुरू झाले आहे. शहरातील नागरी समस्या दूर करण्यासाठी विकासकामांचे प्रस्ताव स्थायी समितीसमोर येत आहेत. मात्र अनेक प्रस्ताव मुदतवाढीचे येत आहेत. या मुदतवाढीवर सर्वच स्थायी समिती सदस्यांनी आक्षेप घेतले आहेत. तर भाजपाचे सदस्य जयवंत सुतार हे सातत्याने अधिकाऱ्यांना असे प्रस्ताव न आणता नव्याने टेंडर काढलेले प्रस्ताव आणावेत अशा सूचना दिलेल्या आहेत. गुरुवारी झालेल्या स्थायी समिती सभेत देखील वाशी विभागातील पालिका वास्तूंच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाच्या देखभाल दुरुस्तीसाठी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव आला होता. यावर सदय जयवंत सुतार व सरोज पाटील यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली.

वारंवार अनेक कामांना मुदतवाढ का दिली जाते. एखाद्या कंत्राटाचा कालावधी संपणार असल्याचे अधिकाऱ्यांना कळत नाही का ? त्याची पूर्वतयारी का केली जात नाही? तोपर्यंत अधिकारी काय करत असतात? अधिकाऱ्यांनी यापुढे एखाद्या कामाचा कालावधी संपणार असल्यास त्याच्या सहा महिने आधी आपल्या दालनात बोर्डावर लिहून ठेवावे. त्यानुसार त्या कामाचे टेंडर प्रक्रिया सुरू करावी. तसेच आता आणलेल्या वाशी क्षेत्रातील शाळा, रुग्णालय, अन्य इमारती कोणत्या याची माहिती देणे गरजेचे आहे मोघम प्रस्ताव न आणता परिपूर्ण प्रस्ताव आणावेत, अशी माहिती स्थायी समिती सदस्य, भाजपा, माजी महापौर जयवंत सुतार यांनी दिली.

पालिकेने वारंवार मुदतवाढ न देता, नव्याने प्रस्ताव आणावेत. त्याची आधीच तयारी करावी. यातून अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा दिसून येतो. अनेक प्रस्ताव परिपूर्ण नसतात. परिपूर्ण प्रस्ताव आणल्यावर सदस्यांना देखील वारंवार प्रश्न विचारावे लागणार नाहीत, अशी माहिती शिवसेना,स्थायी समिती सदस्या सरोज पाटील यांनी दिली.

मुंबईच्या स्वच्छतेसाठी ‘वॉर्ड’ स्तरावर ॲक्शन प्लान! राडारोडा पसरवणाऱ्यांवर महानगरपालिकेची नजर, आराखडा तयार करण्याचे आदेश

Web Title: Navi mumbai standing committee extension proposals controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 01:04 PM

Topics:  

  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

Navi Mumbai bars closed: नवी मुंबईत रात्रीचे बार, हॉटेल आणि क्लब बंद? ‘तोंडी आदेश’ नेमका कुणाचा, चर्चांना उधाण
1

Navi Mumbai bars closed: नवी मुंबईत रात्रीचे बार, हॉटेल आणि क्लब बंद? ‘तोंडी आदेश’ नेमका कुणाचा, चर्चांना उधाण

Shiv Sena Protest: ‘मर्सिडीज द्या, टेंडर घ्या!’ म्हणत शिवसेनेचे आंदोलन; नेत्यांच्या वाहनावरून महापालिकेत गदारोळ
2

Shiv Sena Protest: ‘मर्सिडीज द्या, टेंडर घ्या!’ म्हणत शिवसेनेचे आंदोलन; नेत्यांच्या वाहनावरून महापालिकेत गदारोळ

खारघर इस्कॉन मंदिरात जन्माष्टमीची जय्यत तयारी; कीर्तन, अभिषेक अन् महाआरतीचे आयोजन
3

खारघर इस्कॉन मंदिरात जन्माष्टमीची जय्यत तयारी; कीर्तन, अभिषेक अन् महाआरतीचे आयोजन

Navi Mumbai News: डी-मार्ट सर्कलपासून रेल्वे स्थानकापर्यंत वाहतूककोंडी; कर्मचारी नेमके कुठे? नागरिकांमध्ये नाराजी
4

Navi Mumbai News: डी-मार्ट सर्कलपासून रेल्वे स्थानकापर्यंत वाहतूककोंडी; कर्मचारी नेमके कुठे? नागरिकांमध्ये नाराजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.