Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai : विमानतळाच्या नामकरणाचा प्रश्न कागदावरच! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष

लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासंदर्भातला प्रश्न केंद्र शासनाकडे प्रलंबित असल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष पसरला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 30, 2025 | 05:52 PM
विमानतळाच्या नामकरणाचा प्रश्न कागदावरच! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष

विमानतळाच्या नामकरणाचा प्रश्न कागदावरच! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/ स्नेहा जाधव,काकडे : लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासंदर्भातला प्रश्न केंद्र शासनाकडे प्रलंबित असल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष पसरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत येत्या १५ दिवसात बैठक आयोजित केली जाईल. राज्य शासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत तातडीने लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करुन नाव जाहिर करावे. तसेच नोटिफिकेशन जारी करावे. अन्यथा असंतोषाचा स्फोट होईल, असा इशारा कृती समितीच्या वतीने अध्यक्ष, ज्येष्ठ समाजवादी नेते दशरथ पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.

लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देणे तसेच इतर प्रश्नांबाबत विचारविनिमय करण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत दशरथ पाटील बोलत होते.

बैठकीला माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, जे. डी. तांडेल, संतोष केणे, गुलाब वझे, नितीन पाटील, डॉ. यशवंत सोरे, शरद म्हात्रे, वासुदेव भोईर, दीपक पाटील, दीपक म्हात्रे, सीमा घरत, संजय घरत, संतोष घरत, धीरज कालेकर आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकनेते दि. वा पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे यासाठी आजवर अनेक आंदोलने केली. त्यामुळे राज्य सरकारने त्यांच्या नावाचा ठराव महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करून तो केंद्र सरकारकडे पाठविला आहे. परंतु हा ठराव केंद्रात अजूनही प्रलंबित आहे. विमानतळाचे काम आता पूर्णत्वास आले आहे. कदाचित नोव्हेंबर पासून उड्डाणाला सुरुवात होईल. अशावेळी दि. बां.चे नाव या विमानतळाला देणे गरजेचे आहे, असे दशरथ पाटील म्हणाले.

केंद्र सरकारच्या हवाई वाहतूक मंत्र्यांबरोबर बैठक घेऊन कृती समितीच्या वतीने या प्रश्नाचा पाठपुरावा केला आहे. तरीही आजपर्यंत हा प्रश्न केंद्रात प्रलंबित असल्याने पकल्पग्रस्तांमध्ये असंतोष पसरला आहे. या असंतोषाचा स्फोट होऊ न देता केंदाने हा प्रश्न त्वरीत सोडवावा असे दशरथ पाटील म्हणाले.

विमानतळ परिसरात नोकऱ्यांचा प्रश्न कसा सोडवायचा त्यात प्रकल्पग्रस्तांना व ठाणे, रायगड, पालघर, मुंबई येथील भुमिपूत्रांना प्राधान्य देऊन नोकरभर्ती करणेसाठीही प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे दशरथ पाटील म्हणाले.

लोकनेते दि. बा. पाटील यांचा स्मृतीदिन दि. 24 जून 2025 रोजी आहे. या दिवशी काही भव्य कार्यक्रम आखता येईल का? यावर बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. यासाठी वेगवेगळ्या भागात त्या त्या भागातील कार्यकर्त्यांनी लोकजागृती करत बैठका घ्याव्यात आणि कार्यक्रम यशस्वी करावा असे सांगण्यात आले.

Web Title: Navi mumbai the issue of naming the airport remains on paper dissatisfaction among project beneficiaries regarding navi mumbai international airport

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2025 | 05:52 PM

Topics:  

  • airport
  • Navi Mumbai
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Navi Mumbai: मनोरमा खेडकर पुन्हा चर्चेत! पोलिसांनी लावलेली नोटीस फाडली, अपहरणप्रकरणात अजूनही फरार
1

Navi Mumbai: मनोरमा खेडकर पुन्हा चर्चेत! पोलिसांनी लावलेली नोटीस फाडली, अपहरणप्रकरणात अजूनही फरार

Mumbai Local News : धावत्या लोकलमध्ये मोटारमनची तब्येत बिघडली अन्… ;काळ आला पण वेळ आली नव्हती
2

Mumbai Local News : धावत्या लोकलमध्ये मोटारमनची तब्येत बिघडली अन्… ;काळ आला पण वेळ आली नव्हती

युती होवो अथवा न होवो…नवी मुंबईचा महापौर मीच ठरवणार, वनमंत्री गणेश नाईकांचा दावा
3

युती होवो अथवा न होवो…नवी मुंबईचा महापौर मीच ठरवणार, वनमंत्री गणेश नाईकांचा दावा

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”
4

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.