Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अचानक राजीनामा का दिला? शरद पवारांनी सांगितलं कारण; अनेक मुद्यांवर केलं भाष्य

महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मंगळवारी (दि.2) मोठी घटना घडली. शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्यांच्या या निर्णयानंतर राजकीय स्तरावर प्रचंड खळबळ उडाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते शरद पवार हेच अध्यक्षपदावर राहावेत म्हणून आग्रह करू लागले.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 04, 2023 | 08:43 AM
अचानक राजीनामा का दिला? शरद पवारांनी सांगितलं कारण; अनेक मुद्यांवर केलं भाष्य
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मंगळवारी (दि.2) मोठी घटना घडली. शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्यांच्या या निर्णयानंतर राजकीय स्तरावर प्रचंड खळबळ उडाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते शरद पवार हेच अध्यक्षपदावर राहावेत म्हणून आग्रह करू लागले. पण शरद पवार सध्यातरी त्यांच्या निर्णयावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. पण त्यांनी अचानक राजीनामा का दिला, याची चर्चा सुरु असताना खुद्द शरद पवार यांनी यावर भाष्य केले.

पवारांनी बैठकीत कार्यकर्त्यांना 1 मे या दिवसाची असलेले विशेष संबंध सांगितले. पवार म्हणाले, ‘मी 1 मे 1960 रोजी युवा संघटनेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यामुळे मला 1 मे या दिवसाशी विशेष स्नेह आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या युवक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मी भाकरी फिरवणारे विधान केले होते. त्यामुळे आता आम्ही तरुणांचे विचार लक्षात घेता ग्रामीण भागातील तरुणांना मुख्य प्रवाहात आणू इच्छितो’.

शरद पवार निर्णयावर ठाम

‘जोपर्यंत शरद पवार राजीनामा देण्याच्या निर्णयावर फेरविचार करत नाहीत, तोपर्यंत ते पक्षाच्या प्रमुखपदी कायम राहतील आणि त्यांचा उत्तराधिकारी निवडण्याबाबत कोणतीही चर्चा होणार नाही’, असे माजी केंद्रीयमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

5 मे ला होणार बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नवा अध्यक्ष असणार याबाबत 5 मे ला बैठक होणार आहे. शरद पवार यांनी जाहीर केलेल्या निवड समितीची 5 मे ला बैठक होईल. या बैठकीत याबाबत निर्णय होणार आहे. विशेष म्हणजे निवड समितीची 6 मे ला बैठक होणार होती. पण ही बैठक शरद पवार यांनी 5 मे ला घेतली आहे. निवड समितीची बैठक जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल, असं शरद पवार यांनी सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

अजित पवारांना पसंती?

शरद पवार यांनी त्यांच्या निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते, पदाधिकारी भावनिक झाले. शरद पवारांनी मोठी घोषणा केल्यानंतर पक्षाचा पुढील अध्यक्ष कोण? यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे. त्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे नाव चर्चेत आहे. मात्र, शरद पवारांच्या काटेवाडीतील ग्रामस्थांची आगामी नेतृत्वासाठी अजित पवार यांच्या नावाला पसंती असल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: Ncp chief sharad pawar give reason of his resignation nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2023 | 08:43 AM

Topics:  

  • ajit pawar
  • maharashtra
  • NCP Resign
  • supriya sule

संबंधित बातम्या

अवैध खनिज उत्खननावर कडक कारवाई; तीन महिन्यांत सर्वेक्षण करुन दोषींवर कारवाई करणार – चंद्रशेखर बावनकुळे
1

अवैध खनिज उत्खननावर कडक कारवाई; तीन महिन्यांत सर्वेक्षण करुन दोषींवर कारवाई करणार – चंद्रशेखर बावनकुळे

सातारा पोलिसांच्या निलंबनाला मंत्री जयकुमार गोरे यांचा विरोध, विधान परिषदेत शंभूराजे देसाई आणि जयकुमार आमने सामने
2

सातारा पोलिसांच्या निलंबनाला मंत्री जयकुमार गोरे यांचा विरोध, विधान परिषदेत शंभूराजे देसाई आणि जयकुमार आमने सामने

Satara News: सातारा पालिकेच्या रोखल्या घंटागाड्या, सोनगाव ग्रामस्थ आक्रमक, धुराचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची केली मागणी
3

Satara News: सातारा पालिकेच्या रोखल्या घंटागाड्या, सोनगाव ग्रामस्थ आक्रमक, धुराचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची केली मागणी

भोर तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा बिगुल वाजला; ‘या’ तारखेला होणार मतदान
4

भोर तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा बिगुल वाजला; ‘या’ तारखेला होणार मतदान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.