Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे महानगरपालिका निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार? कार्यकर्त्यांना थेट सूचना

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचे स्पष्ट संकेत देत कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 16, 2025 | 01:28 PM
नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा मतदारसंघातच तळ; दादा भुसेंसह गिरीश महाजनही राजकीय मैदानात...

नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा मतदारसंघातच तळ; दादा भुसेंसह गिरीश महाजनही राजकीय मैदानात...

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना सर्वच पक्षांनी संघटनबांधणीला वेग दिला आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते. यावेळी नेत्यांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचे स्पष्ट संकेत देत कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले.

प्रफुल्ल पटेल म्हणाले, पुणे हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे इथे सक्षम पक्षकार्यालय असणे गरजेचे होते. अजित पवार आणि पार्थ पवार यांच्या पुढाकाराने हे कार्यालय उभे राहिले आहे. आपण महायुतीत असलो तरी जिथे युती शक्य नाही, तिथे परिस्थिती पाहून स्वतंत्र लढण्याचा निर्णय घ्यावा. मैत्रीपूर्ण लढती झाल्या तरी चालतील; पण केवळ तिकिट न मिळाल्याने आपला कार्यकर्ता दुसऱ्या पक्षात जाऊ नये. पुण्यात आपण 162 जागांसाठी तयारी केली पाहिजे, असे सांगत पटेल यांनी प्रत्यक्षात ‘एकला चलो रे’चा संदेशच दिला. यावेळी त्यांनी विरोधकांवरही टीका केली. मतचोरीचा आरोप करून राहुल गांधी महाराष्ट्राला बदनाम करत आहेत. विरोधक गोबेल्स नीतीचा वापर करत आहेत. या खोट्या प्रचाराला आपण ठाम प्रत्युत्तर दिले पाहिजे, असे पटेल म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही स्वबळावर लढण्याच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला. आमचा पक्ष प्रचंड राजकीय इच्छाशक्ती असलेला आहे. राज्यात आम्ही महायुतीतून लढणार असलो, तरी अनेक शहरांतील राजकीय समीकरणे वेगवेगळी आहेत. अंतिम निर्णय राज्यातील तीन प्रमुख नेते घेतील, असे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा : हिंजवडीतील आयटी कंपनीकडून 400 उमेदवारांची कोट्यवधींची फसवणूक; चार महिन्यांपासून थकला पगार

भाजपचीही जोरदार तयारी

राज्यात लवकरच महापालिका निवडणूक होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून आता महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे. दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे आणि काही पदाधिकाऱ्यांनी गेल्या काही दिवसाखाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि चर्चा केली. यावेळी आगामी महापालिका निवडणुकीत भाजपाचाच महापौर करायचा आहे. त्यासाठी कामाला लागा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपाने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुती की भाजपा स्वबळावर लढणार? हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Web Title: Ncp leaders have hinted at contesting the pune municipal corporation elections on their own

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2025 | 01:28 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • Prafull Patel
  • pune news
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

Gaja Marne Bail : गजानन मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; खासदार मोहोळांना मोठा धक्का
1

Gaja Marne Bail : गजानन मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; खासदार मोहोळांना मोठा धक्का

NCP Politics: तिजोरीच्या चाव्यांवरून नव्या वादाची ठिणगी; लाडकी बहीण योजनेवरून प्रफुल्ल पटेलांचा पुनरूच्चार
2

NCP Politics: तिजोरीच्या चाव्यांवरून नव्या वादाची ठिणगी; लाडकी बहीण योजनेवरून प्रफुल्ल पटेलांचा पुनरूच्चार

Crime News: ऐकावे ते नवलचं! टेम्पोतून कपडे चोरणाऱ्या महिलेला अटक; कुठे घडला प्रकार?
3

Crime News: ऐकावे ते नवलचं! टेम्पोतून कपडे चोरणाऱ्या महिलेला अटक; कुठे घडला प्रकार?

Matheran News: माथेरान मधील वस्तू पेटंट म्हणून विकसित करणार! सुनील तटकरे यांचे आश्वासन
4

Matheran News: माथेरान मधील वस्तू पेटंट म्हणून विकसित करणार! सुनील तटकरे यांचे आश्वासन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.