Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhagan Bhujbal : ‘कब तक सहें ये अपमान हम,… तो सब्र का भी अंत होता है’; छगन भुजबळ यांचा शायराना अंदाज कोणासाठी इशारा?

कब तक सहें ये अपमान हम, सुनते-सुनते दिल ही थक जाता है, अशी शायरी म्हणत छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता मोठं पाऊल उचलण्याचा इशारा दिला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Dec 19, 2024 | 08:26 PM
'कब तक सहें ये अपमान हम,... तो सब्र का भी अंत होता है'; छगन भुजबळ यांचा शायराना अंदाज कोणासाठी इशारा?

'कब तक सहें ये अपमान हम,... तो सब्र का भी अंत होता है'; छगन भुजबळ यांचा शायराना अंदाज कोणासाठी इशारा?

Follow Us
Close
Follow Us:

कब तक सहें ये अपमान हम, सुनते-सुनते दिल ही थक जाता है, जब वार हो स्वाभिमान पर हर बार, तो सब्र का भी अंत हो जाता है, चुप रहकर क्या मिलता है आखिर,दिल का दर्द ही बढ़ जाता है, उठानी पड़ती है आवाज़, जब पानी सर से उपर चढ़ जाता है! अशी शायरी म्हणत छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता मोठं पाऊल उचलण्याचा इशारा दिला आहे.

BJP Vs Congress : मुंबईत काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काँग्रेसचं कार्यालय फोडलं, Video व्हायरल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना ऐनवेळी डावलण्यात आलं. त्यामुळे भुजबळ कमालीचे नाराज असून त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. आज एका वृत्त वाहिनीवर झालेल्या मुलाखतीतही त्यांचा नाराजीचा सूर होता. त्यांनी कोणाचं नाव घेतलं नाही, पण अनेक संकेत दिले आहेत. मंत्रि‍पदापासून वंचित राहिलेल्यामुळे छगन भुजबळ मोठा निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चाही आहेत. भुजबळ भाजपमध्ये जाणार का? असा प्रश्न विचारला जातो आहे. या प्रश्नाचं उत्तरही स्वतः छगन भुजबळ यांनी या मुलाखतीत दिलं आहे.

यावेळी भुजबळ म्हणाले की ‘लोक म्हणातायेत भाजपमध्ये जा, समता परिषदेतील काही जण म्हणत आहेत की स्वतःचा पक्ष काढा. प्रत्येक जण आपलं मत व्यक्त करत आहेत. समता परिषद ही अखिल भारतीय आहे. त्यामुळे सर्वांशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल. बाहेर पडण्यासाठी त्यांच्याकडेही मार्ग मोकळा आहे’, असे संकेत त्यांनी दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी माझ्याशी थेट संपर्क साधला नाही. मात्र, समीर भुजबळ यांच्याशी सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांनी संपर्क साधल्याचे त्यांनी सांगितलं.

Ram Shinde : प्रा. राम शिंदे घेणार विधान परिषद सदस्यांचा ‘तास’; सभापतीपदी एकमताने निवड

समता परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं नसल्यानं आंदोलन करण्यात येत आहे. समता परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले. तसेच कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांच्या बद्दल अपशब्द वापरण्यात आले. त्यावर भुजबळ म्हणाले, अशा प्रकारच्या आंदोलनाला माझा विरोध आहे. याबाबत मी स्पष्ट केलं आहे की असं आंदोलन करणाऱ्यांशी माझा काहीच संबंध नाही. असं आंदोलन करणारे समता परिषदेचा कार्यकर्ते नाहीत आणि चुकीचं बोलणाऱ्यांनाही पाठींबा नाही, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

छगन भुजबळ राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील आणि महायुतीमधीलही ज्येष्ठ नेते. त्यांनीच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना अंगावर घेतलं होतं. खालच्या पातळीवरची टीका सहन केली होती. त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळावंही त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना होती, मात्र त्यांची घोर निराशा झाली असून भुजबळ मोठा निर्णय घेतील अशा चर्चा आहेत.

Web Title: Ncp senior leader chhagan bhujbal warn ajit pawar in shayari upset on maharashtra cabinet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2024 | 07:46 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Chhagan Bhujbal
  • CM Devendra Fadnavis

संबंधित बातम्या

Baramati Politics: पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुका चुरशीच्या; बारामतीत महायुती-आघाडी आमने-सामने
1

Baramati Politics: पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुका चुरशीच्या; बारामतीत महायुती-आघाडी आमने-सामने

Mumbai News: राज्यात बनणार आयकॉनिक शहरे; विविध प्राधिकरणांकडील लँड बँकेचा वापर
2

Mumbai News: राज्यात बनणार आयकॉनिक शहरे; विविध प्राधिकरणांकडील लँड बँकेचा वापर

मोठी बातमी! पार्थ पवारांच्या ‘त्या’ प्रकरणात अंजली दमानिया करणार ‘मोठा गौप्यस्फोट’
3

मोठी बातमी! पार्थ पवारांच्या ‘त्या’ प्रकरणात अंजली दमानिया करणार ‘मोठा गौप्यस्फोट’

Local Body Election: माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत ट्विस्ट; अजित पवारांना मिळणार ‘या’ व्यक्तीची साथ
4

Local Body Election: माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत ट्विस्ट; अजित पवारांना मिळणार ‘या’ व्यक्तीची साथ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.