प्रा. राम शिंदे घेणार विधान परिषद सदस्यांचा 'तास'; सभापतीपदी एकमताने निवड
भाजपचे नेते राम शिंदे याची आज विधान परिषदेच्या सभापतीपदी एकमताने निवड झाली. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचे तसेच विरोधकांचे आभार मानले. सभापतीपद भूषवणारे शिंदे हे दुसरे प्राध्यापक ठरले आहेत. कर्जत -जामखेड मतदारसंघातून त्यांनी भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवली होती, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार यांनी त्यांचा पराभव केला आहे.
‘पंकजा मुंडेंनी भाजपचं काम केलंच नाही’; भाजप नेत्यांचीच नाराजी उघड
राम शिंदे यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती निवड करण्यासंदर्भातील प्रस्ताव आज (१९ डिसेंबर) श्रीकांत भारतीय यांनी सभागृहात मांडला. याला विधान परिषदेच्या सदस्य मनीषा कायंदे तसेच अमोल मिटकरी, शिवाजी गर्जे, ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी अनुमोदन दिले. यानंतर आवाजी मतदानातून राम शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राम शिंदे यांच्या निवडीची औपचारिक घोषणा सभागृहात केली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचे आभार मानले.
यावेळी फडणवीस म्हणाले, “प्राध्यापक राम शिंदे हे सर आहेत. त्यामुळे क्लास कसा चालवायचा याची त्यांना सवय आहे. यापूर्वी देखील ना. स. फरांदे एक सर होते त्यांनी क्लास योग्य प्रकारे चालवला होता. मला विश्वास आहे की आपणही अतिशय शिस्तीने पण संवेदनशीलतेने सभागृहाचा कार्यभार चालवाल यात मला शंका नाही”.
Winter Session : यांना उचलून बाहेर फेका! विधानसभा अध्यक्षांनी आमदाराला काढलं बाहेर, Video एकदा पाहाच
शिक्षक म्हणजे ज्ञानाची प्रज्वलीत ज्योत असं आपण मानतो. त्यामुळे शिक्षक जन्मभर शिक्षक असतो. तो शिकतही असतो आणि शिकवतही. त्यामुळेच या पदावर बसल्यावर या सभागृतून तुम्ही काही गोष्टी ग्रहण कराल आणि आपल्या मुखातून अनेक गोष्टी समाजाने घ्याव्यात अशा बाहेर पडतील, असा विश्वास आहे. चांगले पायंडे तयार करणं ही पीठासीन अधिकाऱ्यांची महत्त्वाची जबाबदारी असते. ती पार पाडाल याबरोबरच आम्ही सगळे बेशिस्त झाल्यावर आम्हाला शिस्त लावाल असा विश्वास देखील आम्हाला असल्याचं ते म्हणाले.
विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांची ७ जुलै, २०२२ रोजी मुदत संपली होती. तेव्हापासून विधान परिषदेचं सभापतीपद रिक्त होतं. सभापती निवडणुकीसाठी राम शिंदे यांनीच एकमेव अर्ज दाखल केला होता, त्यामुळे त्यांची निवड निश्चित मानली जात होती. अखेर त्यांनी बिनविरोध निवड झाली आहे. राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापती म्हणून निवड झाल्यानंतर कारर्यभार स्वीकारला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी राम शिंदेंना शुभेच्छा दिल्या.
शिवसेना नेत्या आमदार निलम गोऱ्हे सभापती पदासाठी इच्छुक होत्या. विधानपरिषदेचे सभापतीपद आपल्याला मिळावे, यासाठी शिवसेनेने जोरदार प्रयत्न केले होते. मात्र विधान परिषदेतील संख्याबळामुळे भाजपने सभापतीपद स्वत:कडे ठेवत शिवसेनेला धक्का दिला आहे. विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठी भाजपमधून राम शिंदे आणि प्रवीण दरेकर यांच्या नावाची चर्चा रंगली होती. मात्र भाजपकडून राम शिंदे यांना संधी देण्यात आली आहे.