Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: शिंदेंची खेळी अन् शरद पवारांना दणका; 6 माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

ठाण्यामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. ठाण्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाला एकनाथ शिंदेंनी मोठा धक्का दिला आहे. सहा माजी नगरसेवकांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 08, 2025 | 07:00 PM
शिंदेंची खेळी अन् शरद पवारांना दणका (फोटो सौजन्य-X)

शिंदेंची खेळी अन् शरद पवारांना दणका (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Follow Us:

Maharashtra Politics news in Marathi : काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत एक मोठा निर्णय दिला. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यांत घेण्याच्या शक्यतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने असा आदेश दिला आहे आणि त्याबाबतची अधिसूचना पुढील चार आठवड्यात जारी करावी. अशामध्ये आता राज्यात यासाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. याचपार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली लोकसभा क्षेत्रातील कळवा, खारेगाव, विटावा परिसरातील सहा माजी नगरसेवकांनी आज (8 मे) शिवसेनेचे मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी शिवसेना खासदार नरेश म्हस्के, शिवसेना सचिव राम रेपाळे उपस्थित होते. नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाने पालिका निवडणुकीपूर्वी ठाण्यात शिवसेना आणखी भक्कम झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाला खिंडार पडले असून कळवा मुंब्रा विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी मोठा धक्का आहे.

‘या’ किल्ल्यावर भगवा ध्वज जीर्ण अवस्थेत; मनसेचा मनपा प्रशासनाला इशारा 24 तासांत ध्वज बदला अन्यथा….

आज ठाणे मनपाचे माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, माजी नगरसेविका मनाली पाटील, माजी नगरसेवक महेश साळवी, माजी नगरसेविका मनिषा साळवी, माजी नगरसेविका व ठाणे महिला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, माजी नगरसेवक सचिन म्हात्रे यांनी भगवा झेंडा हाती घेऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केला. ठाणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतून दररोज शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. ठाणे जिल्हा हा धर्मवीर आनंद दिघे आणि शिवसेनेचा गड आहे. ठाणे महानगरपालिकेतील 78 नगरसेवक शिवसेने सोबत आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना कधी काम करत नाही. शिवसेनेचे काम वर्षाचे बारा महिने ३६५ दिवस सुरु असते याचा अनुभव जनतेने घेतलाय. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षातील लोकप्रतिनिधी शिवसेनेत प्रवेश करत आहेत.

ठाणे जिल्ह्यात दररोज शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. ठाणे जिल्हा हा धर्मवीर आनंद दिघे आणि शिवसेनेचा गड मानला जातो. ठाणे महानगरपालिकेतील 78 नगरसेवक शिवसेनेसोबत आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना कधी काम करत नाही. शिवसेनेचे काम वर्षाचे बारा महिने 365 दिवस सुरु असते याचा अनुभव जनतेने घेतलाय. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षातील लोकप्रतिनिधी शिवसेनेत प्रवेश करत आहेत. यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार बाबुराव कदम कोहळीकर, शिवसेना सचिव राम रेपाळे, माजी नगरसेवक योगेश जानकर तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

महालक्ष्मी दर्शनासाठी निघालेल्या कारचा मंगळवेढ्याजवळ भीषण अपघात; हैद्राबाद येथील दाम्पत्य…

Web Title: Ncp sp ex corporators joined eknath shinde shivsena in thane news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2025 | 02:39 PM

Topics:  

  • Ekanath shinde
  • Nationalist Congress Party
  • Sharad Pawar
  • thane

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
2

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
3

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Sharad Pawar : ‘आपण कुठेही जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत या’; शरद पवारांचा NDA चर्चेला पूर्णविराम
4

Sharad Pawar : ‘आपण कुठेही जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत या’; शरद पवारांचा NDA चर्चेला पूर्णविराम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.