इस्लामपूर : इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Islampur Agricultural Produce Market Committee) पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी प्रणित राजारामबापू पाटील शेतकरी विकास पॅनेलने विरोधी शेतकरी परिवर्तन पॅनेलचा 17-1 ने धुव्वा उडवत बाजार समितीवर झेंडा फडकवला. तर हमाल गटात विरोधी शेतकरी परिवर्तन पॅनेलचे संजय दाजी लाखे (Sanjay Lakhe) हे विजयी झाले. सुमारे 850 ते 900 च्या फरकाने उमेदवार विजयी झाले.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, आ. मानसिंगराव नाईक, आष्टयाचे युवा नेते वैभव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राजारामबापू पाटील शेतकरी विकास पॅनेल तर विरोधी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील, जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, युवा नेते सम्राट महाडिक, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार, युवा नेते वैभव पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी परिवर्तन पॅनेलमध्ये सरळ लढत झाली. विजयानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.
यामध्ये सहकारी संस्था गट सर्वसाधारण मतदार संघातून राजारामबापू शेतकरी पॅनेलचे विजयी उमेदवार –
शिवाजी वसंत आपुगडे (फाळकेवाडी)- १२२७ मते,अशोक बाबुराव पाटील (तांबवे)-१२३४ मते, चंद्रकांत हिंदूराव पाटील (येडेनिपाणी)- १२१२ मते, विश्वासराव सपंतराव पाटील (कणेगाव) १२२० मते, संपतराव जयकरराव पाटील (कापूसखेड) १२२० मते, संदीप संपतराव पाटील (पेठ) १२१४ मते, शंकर सिताराम मोहिते (भवानीनगर) १२०४ मते,
महिला मतदारसंघ – अपर्णा शिवाजी ढोले (काकाचीवाडी) १२७२ मते, सुवर्णा तानाजी साळुंखे (गौंडवाडी) १२६६मते
इतर मागास प्रवर्ग संघ – विलास यशवंत देसावळे (बहादूरवाडी)- १२८५ मते, ,
भ.वि.जा./ज मतदासंघ -विकास शामराव नांगरे (हुबालवाडी)१२७६ मते,
ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघ – अल्लाउद्दीन हाशमुद्दीन चौगुले (बागणी) ७६४ मते, आबासाहेब आनंदराव पाटील ( कोळे) ७८८ मते,
अनु.जाती / जमाती मतदारसंघ -महेश सर्जेराव भोपळे (कुंडलवाडी) ७८४ मते, आर्थिक दुबर्ल मतदारसंघ- जितेंद्र बाबासो पाटील (शिगाव) ७९१ मते.
आडते व व्यापारी मतदारसंघ – जालिंदर गुरूलिंंग इंगळे (आष्टा) ९२५ मते, अनिल शंकर पावणे (इस्लामपूर) ९१३ मते हे उमेदवार विजयी झाले. तर विरोधी शेतकरी परिवर्तन पॅनेलचे उमेदवार हमाल व तोलाईदार मतदारसंघातून संजय दाजी लाखे (इस्लामपूर) यांनी ११७ मते मिळवत विजय संपादन केला.
पराभूत उमेदवारांना मिळालेली मते – राष्ट्रवादी चे हमाल व तोलाईदार मतदारसंघाचे उमेदवार – कुमार सर्जेराव लाखे (इस्लामपूर) ११२ मते हे पराभूत झाले.