Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Neelam Gorhe : “दोघींना घराण्याचा वारसा मिळाला…”, महिला आरक्षणावरून नीलम गोऱ्हेंची सुळे-शिंदेंवर टीका

महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सुप्रिया सुळे आणि प्रणिती शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. काँग्रेस खासदारांकडून असत्य विधाने करून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 22, 2026 | 06:08 PM
"दोघींना घराण्याचा वारसा मिळाला...", महिला आरक्षणावरून नीलम गोऱ्हेंची सुळे-शिंदेंवर टीका; काँग्रेस खासदारांवर दिशाभूल केल्याचा आरोप

"दोघींना घराण्याचा वारसा मिळाला...", महिला आरक्षणावरून नीलम गोऱ्हेंची सुळे-शिंदेंवर टीका; काँग्रेस खासदारांवर दिशाभूल केल्याचा आरोप

Follow Us
Follow Us:
  • घराण्याचा वारसा मिळाल्याने त्यांना महिला आरक्षणाचे वावडे
  • शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हेंची सुप्रिया सुळे, प्रणिती शिंदेंवर खरमरीत टीका
  • राजीव गांधी यांनी महिलांच्या न्याय हक्कांना डावलले
  • असत्य विधाने करुन महिला आरक्षणाबाबत काँग्रेस खासदार करतायेत दिशाभूल
मुंबई : महिला आरक्षण विधेयकाविरोधात भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांना महिला आरक्षणाबद्दल प्रेम आहे, पण ते पुतना मावशीचं आहे, अशी खरमरीत टीका शिवसेना नेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. या दोघींना घराण्याचा वारसा मिळाला आहे. महिला आरक्षणाचा फायदा सामान्य महिलांना मिळणार होता, पण त्याबाबत सुळे आणि शिंदे यांनी घेतलेली भूमिका आरक्षणविरोधी आहे, बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

नारी शक्ती वंदन अधिनियमला विरोध करणाऱ्या काँग्रेस खासदारांचा डॉ. गोऱ्हे यांनी समाचार घेतला. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, शाहबानो प्रकरणात मुस्लिम महिलांच्या हक्कांबाबत राष्ट्रीय स्तरावर विचारमंथन झाले होते. राजीव गांधी यांनी मुस्लिम महिला संरक्षण विधेयक मांडले होते. मात्र मुस्लिम समाजाती धनदांडग्यांसाठी तलाक घेणाऱ्या महिलांना पोटगीचा अधिकार मिळणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आली. मुस्लिम महिलांच्या न्याय हक्कांवर कायमचा प्रहार करण्याचे काम राजीव गांधी यांनी केले, अशी टीका डॉ. गोऱ्हे यांनी केली. मात्र २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायद्यात सुधारणा केली आणि तलाक पिडित मुस्लिम महिलांना पोटगीचा अधिकार देण्याचे काम केले, असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या. मात्र काँग्रेस महिला खासदाराने महिला आरक्षणाची गरज नाही, कारण राजीव गांधी यांनी १९८६-८७ साली आरक्षण दिलं होते असे विधान केले ते असत्य आहे. जर राजीव गांधी यांनी आरक्षण दिले होते तर मग १९९६ साली संसदेत महिला आरक्षण विधेयक आणण्याची गरज का पडली, असा सवाल डॉ. गोऱ्हे यांनी उपस्थित केला.

नायगावात ‘इंग्रजी माध्यम’चा गाजावाजा; CBSE पॅटर्नच्या नावाखाली पालकांची दिशाभूल

राजीव गांधी यांनी १९८६-८७ साली कोणतेही महिला आरक्षण विधेयक आणले नाही. महिला आरक्षणाचे पहिले विधेयक १९९६ साली आणले गेले, असे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. काँग्रेसने आरक्षणाबाबत खोटी माहिती देऊन महिलांची दिशाभूल करु नये. महिला आरक्षणाची गरज नाही, अशी काँग्रेस खासदारांची भूमिका निंदनीय आहे. मग महापालिकांमध्ये राखीव जागांवर का महिला उमेदवार देतात, असा सवाल डॉ. गोऱ्हे यांनी काँग्रेस नेत्यांना केला. महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएला मोठं श्रेय मिळेल. त्यामुळेच मतदार संघ पुनर्रचनेला विरोध करताना काँग्रेसने महिला आरक्षण विधेयकालाही विरोध केला. सर्वसामान्य महिला राजकीयदृष्ट्या सक्षम होऊ नये, म्हणून काँग्रेसकडून विरोध केला जात आहे.

जागतिक पातळीवर राष्ट्रीय संसदेत महिलांचे प्रमाण २७.५ टक्के आहे तर भारतात मात्र हे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा कमी आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अहवालानुसार २०६३ साली संधी समानता येईल. ४० वर्ष महिलांना राजकीय आरक्षणापासून वंचित ठेवावे, अशी काँग्रेसची कुटनिती आहे. रवांडामध्ये महिलांचे संसदेतील प्रमाण ६४ टक्के, क्यूबामध्ये ५७ टक्के, बोलिविया ५१ टक्के, मेक्सिको, यूएई आणि एडोरमामध्ये ५० टक्के प्रमाण आहे. मागील २१ वर्षात सभापती पदावरील महिलांचे प्रमाण कमी झाल्याबद्दल डॉ. गोऱ्हे यांनी चिंता व्यक्त केली. तत्पूर्वी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पर्यटकांना यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी आदरांजली वाहिली. या हल्ल्यावेळी पर्यटकांना मदत करणाऱ्या आदिल या घोडेस्वाराला शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हक्काचे घर दिले, असे त्या म्हणाल्या.

Devendra Fadnavis: “लज्जास्पद आणि अशोभनीय”, मल्लिकार्जुन यांच्या ‘दहशतवादी’ विधानावर मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रत्युत्तर

Web Title: Neelam gorhe criticism women reservation congress mps news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 06:08 PM

Topics:  

  • Neelam Gorhe
  • praniti shinde
  • supriya sule

संबंधित बातम्या

विधान परिषद निवडणुकीवरून मविआ मध्येच वादंग! बाळासाहेब थोरात सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरून भडकले…
1

विधान परिषद निवडणुकीवरून मविआ मध्येच वादंग! बाळासाहेब थोरात सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरून भडकले…

Inflation Protest : महागाईविरोधातील आंदोलन आक्रमक; सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार पोलिसांच्या ताब्यात
2

Inflation Protest : महागाईविरोधातील आंदोलन आक्रमक; सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार पोलिसांच्या ताब्यात

लाडकी बहीण योजनेतून तब्बल १.२५ कोटीहून अधिक महिलांना अपात्र, सुप्रिया सुळेंचा खळबळजनक दावा
3

लाडकी बहीण योजनेतून तब्बल १.२५ कोटीहून अधिक महिलांना अपात्र, सुप्रिया सुळेंचा खळबळजनक दावा

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेला मोठा कात्री! ८० लाख महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळली
4

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेला मोठा कात्री! ८० लाख महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.