इंग्रजी माध्यम शाळा CBSE पॅटर्न अभ्यासक्रम सांगून पालकांची फसवणूक केली जात आहे (फोटो - istcok)
Nanded News : नागेश कल्याण : नायगाव : नायगाव तालुक्यात गेल्या काही वर्षांत इंग्रजी माध्यम शाळांची संख्या झपाट्याने वाढली आहे. मात्र, “CBSE पॅटर्न”, “इंटरनॅशनल स्टैंडर्ड” आणि “स्मार्ट एज्युकेशन” अशा आकर्षक जाहिरातींमागील वास्तव चिंताजनक असल्याचे समोर येत आहे. अनेक शाळांकडे अधिकृत मान्यता नसतानाही अशा दाव्यांद्वारे पालकांची दिशाभूल केली जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
महाराष्ट्रात शिक्षणाची चौकट National Education Policy 2020, NCERT आणि MSCERT यांच्या मार्गदर्शनाखाली ठरते. या चौकटीनुसार माध्यम कोणतेही असले तरी अभ्यासक्रम समान असतो. इंग्रजी माध्यम म्हणजे फक्त शिकवण्याची भाषा इंग्रजी- अभ्यासक्रम मात्र राज्याचाच असतो. तरीही काही शाळा “वेगळा syllabus” असल्याचा भास निर्माण करून अतिरिक्त शुल्क आकारत आहेत. बालभारतीच्या अधिकृत पुस्तकांऐवजी खासगी प्रकाशकांची महागडी पुस्तके सक्तीने विकत घेण्यास भाग पाडले जाते. यामुळे पालकांवर हजारो रुपयांचा अतिरिक्त आर्थिक बोजा पडत आहे.
हे देखील वाचा : “नारीशक्ती भाजपचा मुखवटा टराटराsss फाडतील..! विरोधकांकडून वरळीतील महिलेचे कौतुक अन् BJPचा खरपूस समाचार
अधिक फीस भरुनही राज्याचाच अभ्यासक्रम
विशेष म्हणजे, तालुक्यात एकाही शाळेला CBSE मान्यता नसतानाही “CBSE पॅटर्न “चा दावा केला जातो.
हा प्रकार फसवणुकीच्या स्वरूपाचा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. “अधिक फी भरूनही राज्याचाच अभ्यासक्रम शिकवला जातो, मग अतिरिक्त पैसे कशासाठी ?” असा सवाल पालक उपस्थित करत आहेत. शिक्षण विभागाने याकडे गांभीर्याने पाहून चौकशी करणे आणि दोषी शाळांवर कारवाई करणे आवश्यक आहे.
पालकांनीही प्रवेश घेताना शाळेची मान्यता, अभ्यासक्रम आणि पुस्तके याची खातरजमा करणे गरजेचे आहे.
एकूणच, “इंग्रजी माध्यम “च्या नावाखाली शिक्षणाचे व्यापारीकरण होत असल्याची भीती व्यक्त होत असून, यावर तातडीने आळा घालण्याची गरज आहे.
हे देखील वाचा : महिलेने अपमान केल्याच्या प्रकारावर गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया; नेमकं काय घडलं वरळीत?
विकासनगरकर ड्रेनेजपासून वंचित, नागरिकांचा तीव्र संताप
नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या अमृत २.० योजनेअंतर्गत शहरात विविध विकासकामे सुरू असताना विजयनगर, तारोडा (बु.) येथील सर्वे नं.७० मधील अभियांत्रिकी सहकारी गृहनिर्माण संस्था अर्थात विकासनगर सोसायटीतील सुमारे २५ टक्के भाग अद्यापही ड्रेनेज सुविधेपासून वंचित असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नागरिकांच्या माहितीनुसार, पूर्वेकडील सूर्यवंशी यांच्या घरापासून पश्चिमेकडील डॉ. दवणे यांच्या घरापर्यंत तसेच उत्तरेकडील धुतराज यांच्या घरापासून दक्षिणेकडील
अंबुलगेकर यांच्या घरापर्यंत आणि दुसऱ्या लाईनमध्ये तामटे ते कावळे यांच्या घरांपर्यंत सुमारे 25 घरांमध्ये ड्रेनेज लाईनचे कामच झालेले नाही. परिणामी घरगुती सांडपाणी सोसायटीत साचत असून रहिवाशांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या भागात नाल्याचीही व्यवस्था नसल्याने डुकरांचा वावर वाढला असून डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.






