Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिलांवर गलिच्छ भाषेत आरोप करणारे हिरो बनण्याच्या प्रयत्नात झिरो झाले, नीलम गोऱ्हेची संजय राऊतांवर टीका

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) नेहमीच कोणत्या कोणत्या कारणामुळे चर्चेत येतात. शिवसेना पक्ष फुटल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून अनेक आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 20, 2024 | 12:05 PM
महिलांवर गलिच्छ भाषेत आरोप करणारे हिरो बनण्याच्या प्रयत्नात झिरो झाले, नीलम गोऱ्हेची संजय राऊतांवर टीका
Follow Us
Close
Follow Us:

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) नेहमीच कोणत्या कोणत्या कारणामुळे चर्चेत येतात. शिवसेना पक्ष फुटल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून अनेक आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. त्या सध्या वाशिमच्या दौऱ्यावर आहेत.तिथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये नवनीत राणांवर (Navneet Rana) संजय राऊत यांनी टीका केली आहे. यावरून नीलम गोऱ्हे यांनी संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

स्वतःला हिरो बनवण्याच्या नादात झिरो होत आहेत

नीलम गोऱ्हे म्हणाल्या, महिलांवर गलिच्छ भाषेमध्ये आरोप करणारे काही लोक स्वतःला हिरो बनवण्याच्या नादात झिरो होत चालले आहेत.एका महिलेबद्दल लोकप्रतिनिधीने अशा भाषेचे वापर करून टीका करणे हे अजिबात योग्य नाही. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे योग्य राहील आणि याबाबत निवडणूक आयोग दखल घेऊन योग्य ती कारवाई करेल. तसेच अशा काही लोकांच्या सकाळच्या डराव- डरावमध्येही काही तथ्य नसतं. त्यामुळे त्यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे म्हणत शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे.

कुटुंबातील महिलांना असे शब्द बोललेले चालतील का?

काहींना असं वाटतं आपण शिवराळ भाषा बोलून हिरो ठरतो. मात्र महिलांबद्दल असे वाईट बोलणारे झिरो आहेत. राऊतांवर आरोप करणाऱ्या महिलांना त्यांनी किती गल्लीछ भाषेत शिविगाळ केली आम्ही एकल आहे. आपल्या कुटुंबातील महिलांना चालतील एवढेच शब्द इतर कुटुंबातील महिलांना वापरावे. संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्याबद्दल वापरलेले शब्द पुन्हा पुन्हा वापरणे योग्य नाही. त्यामुळे त्यांचा अपमान होईल. म्हणून मी ते शब्द बोलत नाही. मात्र त्यांनी केलेला शब्द प्रयोग हा अतिशय चुकीचा आणि एका महिलेचा अवमान करणार आहे, त्यामुळे याची निवडणूक आयोगाकडून दाखल घेऊन तात्काळ कारवाई केली जाईल, असे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर त्यांच्यावर अनेक टीका देखील करण्यात आल्या. त्यावेळी संजय राऊत यांनी म्हंटले होते, मातोश्रीविषयी अपशब्द वापरले, हिंदुत्वाविषयी अपशब्द वापरले. त्या बाईचा पराभव करणं शिवसैनिकांचं पहिलं कर्तव्य आणि नैतिक कर्तव्य आहे. ती नाची.डान्सर. बबली.तुम्हाला खुनावेल.पडद्यावरून इशारे करेल.पण भुरळून जाऊ नका.. अशा एका नटीने विश्वामित्रांनाही फसवले होते,असे संजय राऊत म्हणाले.

Web Title: Neelam gorhe criticizes sanjay raut for trying to become a hero who accuses women with dirty language nrsk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2024 | 12:05 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Navneet Rana
  • sanjay raut
  • shivsena

संबंधित बातम्या

Ramdas Kadam: बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहावरुन राजकारण; उद्धव ठाकरेंच्या नेत्यांची आता सटकली
1

Ramdas Kadam: बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहावरुन राजकारण; उद्धव ठाकरेंच्या नेत्यांची आता सटकली

“युतीची दोन्ही बाजूने पूर्ण तयारी आहे; राज-उद्धव युतीबाबत खासदार संजय राऊत यांचे सूचक विधान
2

“युतीची दोन्ही बाजूने पूर्ण तयारी आहे; राज-उद्धव युतीबाबत खासदार संजय राऊत यांचे सूचक विधान

Eknath Shinde News: लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेचे सूचक विधान; म्हणाले…
3

Eknath Shinde News: लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेचे सूचक विधान; म्हणाले…

Eknath Shinde On Thackeray: “हे तर कारस्थान करणारे…”; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना धू-धू धुतले
4

Eknath Shinde On Thackeray: “हे तर कारस्थान करणारे…”; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना धू-धू धुतले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.