Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेवरुन नीलम गोऱ्हेंचं शिवेंद्रराजेंना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना पत्र लिहून कुंडमळा पुल दुर्घटनेबाबत चिंता व्यक्त केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 16, 2025 | 05:54 PM
इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेवरुन नीलम गोऱ्हेंचं शिवेंद्रराजेंना पत्र; केली 'ही' मोठी मागणी

इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेवरुन नीलम गोऱ्हेंचं शिवेंद्रराजेंना पत्र; केली 'ही' मोठी मागणी

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे झालेल्या दुर्दैवी पुल दुर्घटनेत अनेक निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडले व काहीजण गंभीर जखमी झाले. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना पत्र लिहून या घटनेबाबत चिंता व्यक्त केली आहे. संबंधित पुलाच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झालेला असतानाही काम न झाल्याने ही दुर्घटना घडली असून यासंदर्भात चौकशी करण्यात यावी, अशी मागणी गोऱ्हे यांनी केली. डॉ. गोऱ्हे यांनी केवळ कुंडमळा पुलच नव्हे तर राज्यातील इतर धोकादायक पुलांचीही माहिती देत त्यांच्यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित केली आहे.

खडकवासला धरण पायथ्याजवळील कोंढवे धावडे ते उत्तमनगर या रस्त्यावरचा पुल देखील धोकादायक स्थितीत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले आहे त्याचबरोबर, जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदीवरील बांभोरी पुल, नाशिक जिल्ह्यातील बागलान तालुक्यातील ताहराबाद येथील पुल, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मार्गावरील कयाधू नदीवरील पुल, वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील तांबा गावाजवळील पुल ही देखील धोकादायक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी या सर्व पुलांचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यकतेनुसार नवीन पुलांचे बांधकाम अथवा दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्याची शिफारस केली आहे. याबरोबरच त्यांनी विभागीय आयुक्त पुणे, नाशिक, संभाजीनगर, नागपूर तसेच संबंधित जिल्हाधिकारी पुणे, वर्धा, हिंगोली, नाशिक व जळगाव यांना याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यासाठी सूचना देण्याची शिफारस देखील केली आहे.

राज्यातील नागरिकांचा जीव धोक्यात न येण्यासाठी व भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी धोरणात्मक व प्रभावी निर्णय घेणे ही काळाची गरज असल्याचे मत डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केले आहे. सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही बाब अत्यंत महत्त्वाची असून शासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी त्यांची ठाम मागणी आहे.

Web Title: Neelam gorhe has written a letter to shivendra raje regarding the bridge accident on the indrayani river and made a big demand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2025 | 05:54 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • dr. Neelam Gorhe
  • pune news

संबंधित बातम्या

गोल्ड मेडलिस्ट, उद्योगपती ते पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार
1

गोल्ड मेडलिस्ट, उद्योगपती ते पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार

Atharva Sudame : रिलस्टार अथर्व सुदामेच्या अडचणीमध्ये पुन्हा वाढ! ‘त्या’ रिलवरुन PMPML ची थेट नोटीस
2

Atharva Sudame : रिलस्टार अथर्व सुदामेच्या अडचणीमध्ये पुन्हा वाढ! ‘त्या’ रिलवरुन PMPML ची थेट नोटीस

“महाराष्ट्रात मराठीच सक्तीची…”; साहित्यरसिकांनी CM फडणवीसांकडे केली महत्वाची मागणी
3

“महाराष्ट्रात मराठीच सक्तीची…”; साहित्यरसिकांनी CM फडणवीसांकडे केली महत्वाची मागणी

राजकीय घडामोडींना वेग; अजित पवारांसाेबत गेलेल्यांचे भाजपसमोर आव्हान
4

राजकीय घडामोडींना वेग; अजित पवारांसाेबत गेलेल्यांचे भाजपसमोर आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.