
रस्त्यांवर गॅरेज मालकांची मनमानी
वसई/रविंद्र माने: वसई, वसई-विरारमधील सर्वच मुख्य रस्त्यांवर गॅरेज व्यावसायिकांनी अवैधपणे रस्ता व्यापला असून, त्यामुळे येथे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. याकडे तक्रार करूनही पालिका तसेच वाहतूक पोलिस काहीही अॅक्शन घेत नसल्याचा आरोप स्थानिकांचा आहे. मुख्य रस्त्यांवर गाड्या दुरुस्ती गॅरेज थाटले असून, वाहन विक्रीही सर्रास सुरू आहे.
तालुक्यातील नायगाव, वसईरोड, नालासोपारा आणि विरार या प्रमुख शहरांमध्ये सध्या वाहतूक कोंडी ही समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे विरार पूर्वेकडील काही रस्ते वन-वे केले असले तरी रस्त्यांवर अनधिकृतपणे केली जाणारी चारचाकी गाड्यांची विक्री आणि गाड्या दुरुस्ती करणाऱ्या गरजमुळे वाहतुकीची सतत कोंडी होत असते. या कोंडीत रुग्णवाहिका, शववाहिनी, अग्निशमन दल अशा अत्यावश्यक वाहनांसह शाळेच्या गाड्या अडकून पडत आहेत.
Vasai-Virar : ठेकेदारांचा हलगर्जीपणामुळे वसई विरारमध्ये अपघाताच्या प्रमाणात वाढ
सहापदरी रस्ता झाला चारपदरी; पोलिसांचाही कानाडोळा
वसई रोड येथील माणिकपूर पोलिस ठाणे अंबाडी रोड-गुरुद्वारा, पंचवटी नाका ते सेंट फ्रान्सिस विद्यालय, १०० फुटी रोड नालासोपारा पश्चिम पोलीस ठाण्यासमोरील दारुल मामुल इमारत ते एकविरा बार, श्रीप्रस्था चौथा रस्ता, पूर्वेला पूर्वला तुळीज, आचोळे, गालानगर विरारला मनवेलपाडा, बोळींज स्टेशनरोड अशा सर्वच प्रमुख रस्त्यांवर नव्या-जुन्या कार विक्री करणाऱ्या दलालांनी दुकाने थाटून बेकायदा रस्ता व्यापून टाकला आहे. याच रस्त्यांवर दुचाकी दुरुस्त करणारे आणि टायर पंक्चर काढणाऱ्याऱ्यांनी आपली गॅरेज बाटली आहे. त्यामुळे दुतर्फा सहा पदरी असलेले रस्ते चार पदरी झाले आहेत.
रस्त्यावरच वाहन दुरुस्ती केली जाते, त्यामुळे ऑईल रस्त्यावर सांडल्याचे वित्र परिसरात दिसत असून, त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. विशेषतः दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता आहे. माणिकपुर पोलिस ठाण्यालगत आणि नालासोपारा पोलिस ठाण्यासमोरच हे धंदे सुरू आहेत. तासभर गाडी उभी करणाऱ्यांवर कारवाई करताना वाहतूक पोलिसांनीही या धंद्यांकडे कानाडोळा केला आहे. या धंद्यांवर कारवाई करुन रस्ते मोकळे करण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.
वाहतूक पोलिस आणि वसई-विरार महापालिकेकडे वारंवार लेखी तक्रारी दिल्या आहेत. मात्र तरीही कोणतीही कारवाई न करता, त्यांना संरक्षण देण्याचे काम केले जात आहे. हे रस्ते मोकळे करुन काही भाग सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनांना पे अँड पार्कची सुविधा देण्यात यावी – एलायस डिसिल्व्हा, सामाजिक कार्यकर्ता ८८ वसई-विरार शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे, त्यामुळे या अतिक्रमणांवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावेत – कुमार राऊत, सचिव, समाजवादी पार्टी. वाहतूक व्यवस्था सुरूळीत राहिल, यासाठी नेहमीच प्रयत्न असतो. त्यानुसार पदपथ, रस्ते मोकळे करण्यासाठी उपाययोजना आखली जात आहे. रस्त्यावर गॅरेज टाकणारे आणि गाड्या विक्री करणाऱ्यांवर आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत – प्रशांत लांघी, वाहतूक पोलिस निरीक्षक