माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांसाठी खुशखबर; नेरळ-माथेरान मिनीट्रेन पुन्हा धावणार
जगभरातील पर्यटकांची लाडकी नेरळ माथेरान नेरळ मार्गावर चालणारी मिनीट्रेन यावर्षी 15 ऑक्टोबर रोजी सुरू झालेली नाही.त्यामुळे पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली असून या महिन्याचे अखेरीस मिनी ट्रेनची नेरळ माथेरान नेरळ अशी प्रवासी सेवा सुरू होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Raigad News: माथेरानच्या शार्लोट लेकचा गाळ पुन्हा चर्चेत; 1000 ट्रक गाळाच्या नोंदीवरून प्रश्नचिन्ह
१९०७ मध्ये ब्रिटिश काळात नेरळ जंक्शन स्थानकातून माथेरान साठी मिनी ट्रेन सुरू झाली.२१ किलोमीटर अंतरावर नॅरोगेज मार्गावर चालणारी मिनी ट्रेन नेहमीप्रमाणे १५ जून पासून पावसाळी सुट्टीवर गेलो होती,मात्र नेहमीप्रमाणे १५ ऑक्टोबर रोजी सुरू होणारी प्रवासी वाहतूक यावर्षी अद्याप सुरू झालेली नाही. यावर्षी १५ सप्टेंबर पासून पाऊस झालेला नाही आणि त्यामुळे मिनीट्रेनचा मार्ग सुस्थितीत आहे.
परंतु मध्य रेल्वे कडून काही बदल या मार्गावरील वाहतुकीत करण्याच्या हालचाली सुरू आहेत.त्यामुळे नेरळ माथेरान नेरळ मार्गावर प्रवासी सेवा सुरू होण्यात चालढकल सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. युनोस्को वर्ल्ड हेरिटेज ट्रेन मध्ये समाविष्ट असल्याने मिनी ट्रेन आणखी आकर्षक बनवण्यात भर देण्यात येत आहे.या गाडीवर नेरळ माथेरान नेरळ मार्गावर प्रवासी वाहतूक करीत असते त्यावेळी अधिकारी कर्मचारी वर्गावर होणारा खर्च प्रवासी वाहतूक मधून भरून निघत नाही.परंतु केवळ हेरिटेज नामावलीमध्ये समाविष्ट असल्याने नेरळ माथेरान मार्गावर चालवली जाणारी मिनीट्रेन मध्य रेल्वे कडून चालवली जाणार आहे.यावर्षी १५ ऑक्टोबर रोजी नेरळ माथेरान नेरळ मिनी ट्रेनची प्रवासी वाहतूक सुरू झाली नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
नेरळ माथेरान नेरळ या मार्गावरील पर्यटकांची आवडती टॉय ट्रेन सेवा येत्या शुक्रवार ३० नोव्हेंबर पासून पूर्ववत होत असल्याची माहिती मध्य रेल्वे कडून जाहीर करण्यात आले आहे.त्यानुसार नेरळ माथेरान नेरळ मार्गावर नेरळ येथून दररोज सकाळी माथेरान साठी दोन तर माथेरान वरून नेरळ साठी दुपारी दोन प्रवासी गाड्या सोडण्यात येणार आहे.नेरळ येथून सकाळी आठ वाजून ५० मिनिटांनी तसेच दुसरी प्रवासी गाडी १० वाजून २५ मिनिटांनी माथेरान साठी रवाना होणार आहे.या दोन्ही गाड्यांचे तिकीट स्थानकात गाडी सुटण्याचे एक तास आधी सुरू होत असते.
नेरळ येथील लोको कार्यशाळा मध्ये एकूण आठ डिझेल इंजिन असून त्यातील तीन इंजिन नादुरुस्त अवस्थेत होती.तर पाच इंजिनाची दुरुस्ती उशिरा झाल्याने यावर्षी १५ ऑक्टोबर रोजी मिनी ट्रेनची नेरळ माथेरान नेरळ प्रवासी वाहतूक सुरू झाली नव्हती.
मात्र मिनीट्रेनच्या प्रवासी फेऱ्यांमध्ये कोणतीही वाढ होण्याची मावळली आहे.गेल्या दोन वर्षापासून नेरळ माथेरान नेरळ मार्गावर केवळ दोनच प्रवासी गाड्या चालवल्या जातात.त्यात वाढ करण्याची अनेक वर्षाची मागणी मध्य रेल्वे ने मान्य केली नाही.
Matheran News: पर्यटननगरी माथेरान अंधारात! अनेक पथदिवे बंद; रात्री पर्यटकांची गैरसोय
Ans: नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेनची प्रवासी वाहतूक ३० ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Ans: दिवाळीच्या सुट्टीत माथेरानला भेट देणाऱ्या पर्यटकांना निसर्गरम्य घाटातून मिनीट्रेनने प्रवास करण्याचा आनंद घेता येईल.
Ans: मिनीट्रेन नेरळ-माथेरान-नेरळ या मार्गावर प्रवासी वाहतूक करणार आहे. प्रवासाचे वेळापत्रक, तिकीट दर आणि उपलब्ध फेऱ्यांसाठी रेल्वेची अधिकृत माहिती तपासावी.






