Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Revenue Department: महसूल विभागाचा मोठा निर्णय: ११ जिल्ह्यांत नवी कार्यालये आणि १४३ पदांची भरती

ही कार्यालये ठाणे, रत्नागिरी, पुणे, सातारा, सोलापूर, जळगाव, नांदेड, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा आणि नागपूर या जिल्ह्यांत स्थापन करण्यात येणार आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 11, 2026 | 10:28 AM
महसूल विभागाचा मोठा निर्णय: ११ जिल्ह्यांत नवी कार्यालये आणि १४३ पदांची भरती

महसूल विभागाचा मोठा निर्णय: ११ जिल्ह्यांत नवी कार्यालये आणि १४३ पदांची भरती

Follow Us
Follow Us:
  • ११ नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेची घोषणा
  • ठाणे, पुणे, रत्नागिरी, नागपूर आणि नांदेडसह एकूण ११ जिल्ह्यांत ही कार्यालये कार्यान्वित
  • यासाठी एकूण १४३ नवीन पदांच्या निर्मितीला मंजुरी
 

राज्यातील प्रशासकीय कामकाजाचा वाढता व्याप लक्षात घेऊन ११ नव्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयांची निर्मिती करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत केली. या कार्यालयांमुळे नागरिकांना आणि विशेषतः दूरवरच्या भागातील लोकांना प्रशासनाच्या सेवा अधिक जवळच्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. लोकप्रतिनिधींनी विविध भागांतून दिलेल्या निवेदनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील जिल्हा कार्यालयांवरील वाढता ताण, नागरीकरणामुळे वाढलेली लोकसंख्या तसेच दुर्गम भागातील नागरिकांना सेवा मिळण्यात येणाऱ्या अडचणींचा विचार करून शासनाने अप्पर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्याचा प्रस्ताव विचाराधीन ठेवला होता. त्यानुसार सर्व विभागीय आयुक्तांकडून प्रस्ताव मागवण्यात आले होते.

‘या’ जिल्ह्यांत असणार कार्यालये

ही कार्यालये ठाणे, रत्नागिरी, पुणे, सातारा, सोलापूर, जळगाव, नांदेड, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा आणि नागपूर या जिल्ह्यांत स्थापन करण्यात येणार आहेत. संबंधित ठिकाणांची अंतिम निवड विभागीय आयुक्त करतील, तसेच मोजणी प्रकरणांचा जलद आणि पारदर्शक निपटारा करण्यासाठी परवानाधारक भूमापक व भूमापन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून या निर्णयाचा हजारो शेतकऱ्यांना लाभहोईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.

Pune Ring Road Update: ८ बोगदे आणि २६ अंडरपास; असा असेल पुण्याचा ‘गेमचेंजर’ रिंग रोड प्रकल्प

नागपुरात स्वतंत्र तहसीलदार कार्यालय स्थापन करा : राऊत

नागपूर शहरातील नागरिकांना महसुली व प्रशासकीय कामांसाठी होणारी धावपळ कमी करण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात स्वतंत्र तहसीलदार कार्यालय सुरू करण्याची मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व आमदार डॉ. नितीन राऊत यांनी विधानसभेत केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधले. सभागृहात बोलताना राऊत म्हणाले की, नागपूर हे राज्याचे उपराजधानीचे शहर असून येथे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. मात्र एवढ्या मोठ्या शहरासाठी सध्या केवळ एकच तहसीलदार कार्यालय कार्यरत आहे. त्यामुळे विविध प्रमाणपत्रे, महसुली कामे आणि इतर शासकीय सेवांसाठी नागरिकांना शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत वारंवार जावे लागते.

गॅस महाग आणि बुकिंगला 25 दिवस! बजेटमध्ये मिळणारी ही किचन उपकरणे करतील मोठी बचत, आत्ताच करा खरेदी

मतदारसंघांची जबाबदारी एकाच कार्यालयावर

सहा मतदारसंघाची जबाबदारी एकाच कार्यालयावर असल्यामुळे तेथे मोठी गर्दी होते आणि अनेक कामे वेळेत पूर्ण होत नाहीत, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. नागरिकांना त्यांच्या परिसरातच शासकीय सेवा मिळाव्यात आणि प्रशासन अधिक कार्यक्षम व्हावे यासाठी मतदारसंघनिहाय तहसीलदार कार्यालये सुरू करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

१४३ पदे निर्माण करण्यास परवानगी

प्रस्तावांचा अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय सचिव समितीने जानेवारी २०२६ मधील बैठकीत ११ नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयांना मान्यता दिली. प्रत्येक कार्यालयासाठी १३ पदांप्रमाणे एकूण १४३ पदे निर्माण करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. त्यानंतर १० फेब्रुवारी रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अप्पर जिल्हाधिकारी वेतनश्रेणीतील ११ पदांना अंतिम मान्यता देण्यात आली.

 

Web Title: New additional collector offices announced for 11 districts revenue minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 10:28 AM

Topics:  

  • Chandrashekhar Bavankule
  • Maharashtra Government
  • Revenue Department

संबंधित बातम्या

शासनाच्या दिनदर्शिकेला हरताळ? धाराशिवमध्ये 26 ऐवजी 25 जूनलाच साजरी केली राजर्षी शाहू महाराजांची जयंती
1

शासनाच्या दिनदर्शिकेला हरताळ? धाराशिवमध्ये 26 ऐवजी 25 जूनलाच साजरी केली राजर्षी शाहू महाराजांची जयंती

‘तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी 250 कोटींची सुपारी, पुढील आठवड्यात…’; जितेंद्र आव्हाडांनी नेमकं काय म्हटलं?
2

‘तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी 250 कोटींची सुपारी, पुढील आठवड्यात…’; जितेंद्र आव्हाडांनी नेमकं काय म्हटलं?

‘…यासाठी ‘ग्रीड सपोर्ट चार्ज’ आकारण्यात आला आहे’; ‘ग्रीड सपोर्ट चार्ज’वर Devendra Fadnavis यांचे भाष्य
3

‘…यासाठी ‘ग्रीड सपोर्ट चार्ज’ आकारण्यात आला आहे’; ‘ग्रीड सपोर्ट चार्ज’वर Devendra Fadnavis यांचे भाष्य

हरित महाराष्ट्राच्या दिशेने पाऊल; तापमान वाढीला ब्रेक लागणार! वनविभागाची तब्बल 30 लाख वृक्ष…
4

हरित महाराष्ट्राच्या दिशेने पाऊल; तापमान वाढीला ब्रेक लागणार! वनविभागाची तब्बल 30 लाख वृक्ष…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.