Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati News: अमरावतीच्या विकासाला नवी गती! बेलोरा विमानतळ ठरणार विदर्भातील नवे एव्हिएशन हब

बेलोरा विमानतळाचा विस्तार केवळ प्रवासी सेवापुस्ता मर्यादित राहणार नसून त्याचा थेट लाभ अमरावतीसह संपूर्ण विदर्भातील व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्राला मिळणार आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 02, 2026 | 12:59 PM
अमरावतीच्या विकासाला नवी गती! बेलोरा विमानतळ ठरणार विदर्भातील नवे एव्हिएशन हब

अमरावतीच्या विकासाला नवी गती! बेलोरा विमानतळ ठरणार विदर्भातील नवे एव्हिएशन हब

Follow Us
Follow Us:

अमरावती: एकेकाळी केवळ प्रादेशिक विमानतळ म्हणून ओळखला जाणारा बेलोरा विमानतळ आता विदर्भातील महत्त्वपूर्ण एव्हिएशन हब बनण्याच्या दिशेने वेगाने झेप घेत आहे. एप्रिल २०२५ पासून नियमित व्यावसायिक विमानसेवा सुरू झाल्यानंतर विमानतळावरील हालचालींमध्ये सातत्याने वाढ झाली. त्यामुळे आता नाईट लँडिंग सुविधा, अत्याधुनिक फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन (एफटीओ) आणि भविष्यात देशातील विविध शहरांशी थेट हवाई संपर्काची शक्यता यामुळे अमरावतीच्या आर्थिक विकासाला नवी गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी (एमएडीसी) बेलोरा विमानतळाचा प्रादेशिक एव्हिएशन हब म्हणून सर्वांगीण विकास करीत आहे.(फोटो सौजन्य – istock)

Amravati News: परतवाडा महामार्गाचे चौपदरीकरण करा! अरुंद रस्ता, वाढती वर्दळ आणि वाढत्या अपघातांचा धोका कायम

विमानतळावरील धावपट्टी, आधुनिक टर्मिनल आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) सुविधा सध्या कार्यरत असून, नाईट लैंडिंगसाठी आवश्यक असलेली एअरफिल्ड ग्राउंड लाइटिंग (एजीएल) आणि इतर तांत्रिक कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर रात्रीच्या वेळेस तसेच प्रतिकूल हवामानातही विमानांची सुरक्षित उड्डाणे आणि लँडिंग शक्य होणार आहे. त्यामुळे विमानसेवा अधिक नियमित, विश्वासार्ह आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर ठरणार आहे.

विदर्भाच्या विकासाचे नवे प्रवेशद्वारः

तज्ज्ञांच्या मते, नाईट लँडिंग सुविधा, फ्लाइंग ट्रेनिंग सेंटर आणि भविष्यातील विस्तारित हवाई सेवांमुळे बेलोरा विमानतळ हा केवळ अमरावतीचाच नव्हे, तर संपूर्ण विदर्भाच्या आर्थिक प्रगतीचा महत्त्वाचा आधारस्तंभ ठरू शकतो. उद्योग, व्यापार, पर्यटन, शिक्षण आणि रोजगार या सर्व क्षेत्रांना नवी ऊर्जा देत बेलोरा विमानतळ विदर्भाच्या विकासाचे नवे प्रवेशद्वार म्हणून उदयास येण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

बेलोरा विमानतळावर उभारण्यात येत असलेले अत्याधुनिक फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन (एफटीओ) हे विदर्भासाठी मोठे आकर्षण ठरणार आहे. येथे वैमानिक प्रशिक्षणासाठी देशभरातून विद्यार्थी येण्याची शक्यता असून, विमानवाहतूक क्षेत्राशी संबंधित प्रशिक्षक, तंत्रज्ञ आणि इतर कुशल मनुष्यबळासाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. त्यामुळे अमरावतीची ओळख केवळ प्रवासी विमानसेवेपुरती मर्यादित न राहता एव्हिएशन शिक्षण आणि प्रशिक्षण केंद्र म्हणूनही निर्माण होणार आहे.

Amravati News: विमानतळाच्या नाईट लॅण्डिंगला तांत्रिक अडथळे! नागरिकांचा हिरमोड; डीव्हीओआर यंत्रणा सज्ज तरीही प्रतीक्षा कायम

बेलोरा विमानतळाचा विस्तार केवळ प्रवासी सेवापुस्ता मर्यादित राहणार नसून त्याचा थेट लाभ अमरावतीसह संपूर्ण विदर्भातील व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्राला मिळणार आहे. आतापर्यंत उद्योगपती, निर्यातदार आणि व्यावसायिकांना मुंबई, पुणे किंवा नागपूरमार्गे दीर्घ प्रवास करावा लागत होता. सुधारित हवाई संपर्कामुळे व्यावसायिक बैठका, गुंतवणूकदारांच्या भेटी, औद्योगिक प्रकल्प आणि कॉर्पोरेट व्यवहार अधिक वेगाने पार पडतील. स्थानिक व्यापारी संघटनांच्या मते, बेलोरा विमानतळ पूर्ण क्षमतेने विकसित झाल्यानंतर अमरावती हे नव्या उद्योगांसाठी आकर्षक गुंतवणूक केंद्र म्हणून उदयास येईल, संत्रा, कापूस, सोयाबीन आणि इतर कृषी उत्पादनांच्या व्यापाराला चालना मिळेल. तसेच प्रक्रिया उद्योग, गोदाम व्यवस्था, कोल्ड स्टोरेज आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातही मोठ्या गुंतवणुकीची अपेक्षा आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: New momentum for amravatis development belora airport set to become vidarbhas new aviation hub

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 12:59 PM

Topics:  

  • amaravati news
  • maharashtra

संबंधित बातम्या

गणेशम फेज २ सोसायटीत आग, दोन चिमुरड्यांची सुखरूप सुटका; मोठा अनर्थ टळला
1

गणेशम फेज २ सोसायटीत आग, दोन चिमुरड्यांची सुखरूप सुटका; मोठा अनर्थ टळला

Water Storage Crisis: पाणीटंचाईचे संकट गडद! धरणे-तलाव कोरडे; २२६ पैकी केवळ ५ प्रकल्पांत ५० टक्क्यांहून अधिक साठा
2

Water Storage Crisis: पाणीटंचाईचे संकट गडद! धरणे-तलाव कोरडे; २२६ पैकी केवळ ५ प्रकल्पांत ५० टक्क्यांहून अधिक साठा

विसर्जनप्रसंगी विद्यार्थ्यांवर काळाने घातला घाला; दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
3

विसर्जनप्रसंगी विद्यार्थ्यांवर काळाने घातला घाला; दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

MSRTC NCMC Card: एसटीच्या NCMC कार्डसाठी महत्त्वाचे बदल; आधार OTPसह हरवलेल्या कार्डचीही सुविधा
4

MSRTC NCMC Card: एसटीच्या NCMC कार्डसाठी महत्त्वाचे बदल; आधार OTPसह हरवलेल्या कार्डचीही सुविधा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.