Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुढील वर्षी दहावीचे पेपर असणार पोलिस कस्टडीत; पेपर चोरीनंतर महत्त्वाचा निर्णय

दहावीच्या विद्यार्थ्यांचा बुधवारी (दि.१८) शेवटचा भूगोल विषयाचा पेपर असताना मंगळवारी पहाटेच्या सुमारास सांगोला येथील विद्या मंदिर प्रशालेच्या बोर्ड कस्टडीतून ५० प्रश्नपत्रिकांची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 22, 2026 | 09:56 AM
पुढील वर्षी दहावीचे पेपर असणार पोलिस कस्टडीत; पेपरचोरीनंत महत्त्वाचा निर्णय

पुढील वर्षी दहावीचे पेपर असणार पोलिस कस्टडीत; पेपरचोरीनंत महत्त्वाचा निर्णय

Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पुढील वर्षापासून पुणे बोर्डाच्या दहावी व बारावीच्या प्रश्नपत्रिका संबंधित पोलिस ठाण्याच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे. सांगोला येथील पेपर चोरी प्रकरणानंतर आता जिल्हा शिक्षण विभागाने मोठे पाऊल उचलले आहे. त्यामुळे पेपरचोरी प्रकरणाला आळा बसणार असल्याचे म्हटले जात आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांचा बुधवारी (दि.१८) शेवटचा भूगोल विषयाचा पेपर असताना मंगळवारी पहाटेच्या सुमारास सांगोला येथील विद्या मंदिर प्रशालेच्या बोर्ड कस्टडीतून ५० प्रश्नपत्रिकांची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला होता. याबाबत सांगोल्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले (वय ३४) यांनी सांगोला पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फिर्याद दिली होती. १६ मार्चला दुपारी साडेचार ते १७ मार्च रोजी सकाळी साडेआठ यावेळेत ही घटना घडली होती. सांगोला विद्यामंदिर येथील बोर्ड कस्टडी रूममध्ये ठेवलेल्या पेटी क्रमांक ५४४९ मधील भूगोल विषयाच्या २५-२५ प्रश्नपत्रिकांची पाकिटे अज्ञात व्यक्तीने कुलूप तोडून चोरून नेल्या होत्या.

हेदेखील वाचा : १२ बोगस शिक्षकांसह १५ कर्मचारी निलंबित ! Buldhana जिल्हा परिषदेत बोगस दिव्यांग प्रमाणपत्रप्रकरणी कारवाई

याप्रकरणी १७ मार्च रोजी सांगोला पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तपास करून पेपर चोरी करणाऱ्याला साहित्यासह पकडले, अभ्यास न केल्याने दहावीतीलच एका अल्पवयीन मुलाने हे कृत्य केल्याचे उघड झाले. पेपर चोरीच्या प्रकरणानंतर पुणे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.

आता मराठवाडा पॅटर्न

सोलापूर जिल्ह्यात दहावी व बारावीच्या परीक्षेच्यावेळी पुणे बोर्डकडून आलेले पेपर तालुक्याच्या कस्टडीत ठेवले जात होते. मराठवाड्यात मात्र यापेक्षा जास्त काळजी घेतली जात आहे. मराठवाड्यात संबंधित परीक्षा केंद्राच्या पोलीस ठाण्याच्या कोठडीमध्ये हे पेपर ठेवले जातात. पेपरच्या दिवशी दोन तास आधी संबंधित केंद्रप्रमुख पोलीस ठाण्यात जाऊन पत्र दिल्यानंतर डायरीत नोंद करूनच प्रश्नपत्रिका ताब्यात दिल्या जातात. सोलापूर जिल्ह्यातील पद्धत धोकादायक ठरल्याने आता मराठवाडा पॅटर्न अवलंबण्यात येणार आहे.

प्रश्नपत्रिकांबाबत ज्यादा खबरदारी घेतली जाणार

सांगोल्यातील प्रकरणाबाबत माध्यमिक शिक्षण विभाग पुणे बोर्डाला अहवाल सादर करणार आहे. आता पुढील वर्षापासून प्रश्नपत्रिकांबाबत ज्यादा खबरदारी घेण्यात येणार आहे. मराठवाड्याप्रमाणेच सोलापूर जिल्ह्यातही बोर्डाकडून आलेल्या प्रश्नपत्रिका पोलीस ठाण्याच्या कस्टडीत ठेवण्याचा प्रस्ताव दिला जाणार आहे.

– सचिन जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

Web Title: Next year class 10 exam papers to be held in police custody

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 09:56 AM

Topics:  

  • Maharashtra Education
  • Solapur News

संबंधित बातम्या

Education News : “पूर्व प्राथमिक शाळांना शासन मान्यता अनिवार्य करा”, कायदा तयार करण्याची राज्य शिक्षक परिषदेची मागणी
1

Education News : “पूर्व प्राथमिक शाळांना शासन मान्यता अनिवार्य करा”, कायदा तयार करण्याची राज्य शिक्षक परिषदेची मागणी

अभ्यास झाला नाही म्हणून थेट प्रश्नपत्रिकाच चोरल्या; सांगोल्यात दहावीच्या पेपर चोरीचा छडा
2

अभ्यास झाला नाही म्हणून थेट प्रश्नपत्रिकाच चोरल्या; सांगोल्यात दहावीच्या पेपर चोरीचा छडा

Maharashtra Politics: “शेतमजुराच्या मुलाला ZP अध्यक्ष…”; सोलापूरमध्ये जयकुमार गोरेंचे मोठे विधान
3

Maharashtra Politics: “शेतमजुराच्या मुलाला ZP अध्यक्ष…”; सोलापूरमध्ये जयकुमार गोरेंचे मोठे विधान

Solpaur News : युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम; एलपीजी पुरवठ्यावर ताण, प्रशासन सतर्क
4

Solpaur News : युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम; एलपीजी पुरवठ्यावर ताण, प्रशासन सतर्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.