Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: “शेतमजुराच्या मुलाला ZP अध्यक्ष…”; सोलापूरमध्ये जयकुमार गोरेंचे मोठे विधान

Solapur ZP News: सोलापूर जिल्हा परिषदेत आज भाजपचा अध्यक्ष विराजमान झाला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपला मोठे यश प्राप्त झाले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 18, 2026 | 06:24 PM
Maharashtra Politics: “शेतमजुराच्या मुलाला ZP अध्यक्ष…”; सोलापूरमध्ये जयकुमार गोरेंचे मोठे विधान
Follow Us
Follow Us:

सोलापुरात भाजपचा दणदणीत विजय
विरोधकांचा सुपडा साफ- जयकुमार गोरे
सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये भाजपला मोठे यश

सोलापूर: सोलापूर जिल्हा परिषदेत आज भाजपचा अध्यक्ष विराजमान झाला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपला मोठे यश प्राप्त झाले आहे. त्यावर आता ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी भाष्य केले आहे. मला आज मनापासून आनंद झाला असून, मी भाजप पक्षाच्या आमच्या नेतृत्वाचे आभार मानतो असे जयकुमार गोरे म्हणाले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या विजयवार बोलताना मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, ” एका शेतकऱ्याच्या, शेतमजुराच्या मुलाला आज जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली गेली आहे. ही केवळ भाजपमध्येच होऊ शकते. त्यामुळे मी त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्षांचे मी मनापासून आभार मानतो. तसेच एका शेतमजुराच्या, शेतकऱ्याच्या मुलाला आणि निष्ठावंत कार्यकर्ता असलेल्या कार्यकर्ता इंद्रजीत पवार यांना उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली, याचा मला मनापासून आनंद आहे.”

“प्रत्येक कुटुंबाला घर मिळावे हा पंतप्रधान मोदींचा…”; काय म्हणाले मंत्री जयकुमार गोरे?

जयकुमार गोरे यांनी विरोधकांवर देखील टीका केली आहे. ते म्हणाले, “निवडणुकीचा निकाल हेच विरोधकांना उत्तर आहे. मला वेगळं उत्तर द्यायची आवश्यकता वाटत नाही. या निकालातून कोणाचा सुपडा साफ झाला आहे, हे दिसून येत आहे. भाजपला नगरपालिका, महापालिका आणि आता जिल्हा परिषद निवडणुकीत प्रचंड यश मिळालं आहे. आज या सर्व संस्था भाजपच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. त्यामुळे आमच्यावर मोठी जबाबदारी आहे. लोकांनी टाकलेल्या विश्वासाला पात्र राहून ताकदीने लोकांची सेवा करणे ही आमची जबाबदारी आहे.”

Solpaur News : युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम; एलपीजी पुरवठ्यावर ताण, प्रशासन सतर्क

पुढे बोलताना मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, “ध्यक्षपदाचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असतो. या कालावधीत किती जणांना संधी द्यायची, हा पक्षांतर्गत विषय आहे आणि पक्ष त्याबाबत निर्णय घेईल. आम्हाला पुढील पाच वर्षांत प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात २१ कोटींची कामं करायची आहेत. आम्हाला कायम आव्हान स्वीकारून काम करायला आवडतं. त्यामुळे हे आव्हान आम्ही स्वीकारले आहे. जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आलं, तेव्हा तेव्हा मुख्यमंत्री महोदय त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत.तिवृष्टीमुळे ज्यांचं नुकसान झालं, त्यांना ८०-९०% नुकसानभरपाई मिळाली आहे. ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, त्यांना मदत करण्याची सरकारची भूमिका असेल. अधिवेशन सुरू असताना समाधान अवताडे यांच्यावर तालिका अध्यक्षपदाची जबाबदारी आहे, त्यामुळे ते तिथे उपस्थित आहेत. आम्ही सर्व एकत्र आहोत, म्हणूनच आज हे विजयाचे निकाल पाहायला मिळत आहेत.”

Web Title: Bjp win solapur zp election jaykumar gore fadnavis maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 06:21 PM

Topics:  

  • BJP
  • Jaykumar Gore
  • Maharashtra Politics
  • Solapur News

संबंधित बातम्या

Satara News: वाईच्या विकासाच्या आड येऊ नका; मी थांबणार नाही!; नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा घणाघात
1

Satara News: वाईच्या विकासाच्या आड येऊ नका; मी थांबणार नाही!; नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा घणाघात

Suvendu Adhikari Helicopter Emergency Landing: सुवेंदू अधिकारींच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग
2

Suvendu Adhikari Helicopter Emergency Landing: सुवेंदू अधिकारींच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

Buldhana Sarpanch Ends his Life: बीडनंतर आता बुलढाणा हादरले; करमोडा गावच्या सरपंचाची व्हिडिओ बनवून आत्महत्या
3

Buldhana Sarpanch Ends his Life: बीडनंतर आता बुलढाणा हादरले; करमोडा गावच्या सरपंचाची व्हिडिओ बनवून आत्महत्या

Solapur News: आजपासून दूध महाग; विक्री दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ, दुग्धजन्य पदार्थही १० टक्क्यांपर्यंत महाग
4

Solapur News: आजपासून दूध महाग; विक्री दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ, दुग्धजन्य पदार्थही १० टक्क्यांपर्यंत महाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.