Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“उध्दव ठाकरेंच्या काळात गुंडाराज,वसुली सरकार कसं होतं हे जनतेने पाहिलं आहे”, नितेश राणे यांचा हल्लाबोल

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात शाब्दीक चकमक वारंवार सुरु आहे. अशातच आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सणसणीत शब्दांत टीका केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 14, 2024 | 04:19 PM
उध्दव ठाकरेंच्या काळात गुंडाराज,वसुली सरकार कसं होतं हे जनतेने पाहिलं आहे, नितेश राणे यांचा हल्लाबोल

उध्दव ठाकरेंच्या काळात गुंडाराज,वसुली सरकार कसं होतं हे जनतेने पाहिलं आहे, नितेश राणे यांचा हल्लाबोल

Follow Us
Close
Follow Us:

कणकवली  ( भगवान लोके ): विधानसभेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील आरोप प्रत्यारोपांची फैरी सुरुच आहे. याचपार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तीव्र शद्धांत शाब्दिक वार केले आहेत. कणकवली येथे पत्रकार परिषदेत बोलताना नितेश राणे म्हणाले की, गेल्या अडीच वर्षात उद्धव ठाकरे सत्तेत असताना राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं. गुंडाराज, वसुली सरकार कसे असते हे उध्दव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री काळात पाहिले. मोक्का लागलेले आरोपी घेवून संजय राऊतांसारखे लोक पत्रकार परिषदेत बसायचे.

हेही वाचा- एमआयडीसीसाठी शेती महामंडळाची जागा उपलब्ध करुन देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय; उपमुख्यमंत्री पवारांच्या पाठपुराव्याला यश

उध्दव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मन्सुक हिरेन, दिशा सालियन अशा हत्या झाल्या. सचिन वाझे सारखे अधिकारी वसुली गँग चालवायचे. आता आमचे महायुती सरकार मध्ये तीन सिंघम राज्याच्या मंत्रिमंडळात आहेत. म्हणूनच दोन आरोपी पकडले गेलेत.ठाकरे मुख्यमंत्री असताना मन्सूक हिंरेनचे आरोपी का पकडले गेले नाहीत ? दिशा सालियान चे आरोपी जेल मध्ये का गेले नाहीत, असा सवाल भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केला.

हेही वाचा- राज्यातील दोन मोठ्या नदीजोड प्रकल्पांना मंजुरी, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 19 महत्त्वाचे निर्णय

नितेश राणे म्हणाले की , ठाकरे सरकारमध्ये संजय राऊत सारख्या शक्ती कपूरकडून महिला सुरक्षित नव्हत्या आणि आता आम्हाला लेक्चर देत आहेत.तुमच्या मालकाच्या घरात गुंडाच्या टोळ्या आहेत. काही टिळक नगरमधील टोळ्या आणि काही दाऊद गँगचे पण आहेत. त्यांची नाव आम्ही द्यायची का ? असा सवाल राणेंनी केला.पुढे नितेश राणे असंही म्हणाले की, सर्वात मोठा गुंडांचा लीडर मोतोश्रीच्या तिसऱ्या मजल्यावर बसलेला आहे.आम्हाला तोंड उघडायला लावू नका. नाहीतर तुमचं वस्त्रहरण करु असा इशारा दिला.असंख्य गुन्हे आहेत ,ज्यात गोळ्या घालणे गरजेचे होते. पाटकर प्रकरणात गोळ्या घालायच्या का? गुजरातचे खरे ब्रँड ॲम्बॅसेडर उद्धव ठाकरे आहेत.त्यामुळे संजय राऊत यांनी इतरांना बोलण्यापूर्वी तुमचा मालक आणि त्यांचा मुलगा गुजराती कार्यक्रमाला नाच्या सारखे नाचत असतात ते पाहा.स्वतः पनवती असलेल्या लोकांनी इतरांवर टीका करू नये. कितीही बोंबलात तरी देवा भाऊ काय आहे. हे जनतेला माहित आहे.माता बहिणींनी देवा भाऊवर विश्वास ठेवला आहे असं आ. नितेश राणे यांनी सांगितले.

 

 

 

Web Title: Nitesh ranes attack people have seen what goondraj recovery government was like during uddhav thackerays era

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2024 | 04:18 PM

Topics:  

  • BJP
  • Mahavikas Aghadi
  • Mahayuti
  • Nitesh Rane
  • Vidhansabha Election

संबंधित बातम्या

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….
1

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….

Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या
2

Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
3

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल
4

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.