कल्याण-अमजद खान : कल्याण लाेकसभा ही काठावर पास होण्यासारखी स्थिती आहे. अँटी इन्कम्बन्सी आहे. लाखो मताधिकाऱ्याने काेणी निवडणूक जिंकणार असे चित्र नाही. महायुतीत धूसफूस सुरु आहे. त्यात ही राष्ट्रवादी आली आहे. ज्यांना निवडून यायचे आहे. त्यांनी सावरुन घ्यावे असा सल्ला मनसे आमदार राजू पाटील यांनी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना त्यांचा नमोल्लेख न करता दिला आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांच्या भूमीपूजना दरम्यान मनसे आमदार राजू पाटील यांनी यांनी हे विधान केले आहे.
स्टेशनचे नाव बदलण्याऐवजी त्या रेल्वे स्थानकाची रुप रेषा बदलली पाहिजे. लोकल प्रवाशांना काय समस्या आहेत. हे खासदारांनी पाहून घेतले पाहिजे अशी सूचना देखील राजू पाटील यांनी खासदार राहूल शेवाळे यांनी केली. शेवाळे यांनी आठ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मागणीवर आमदार पाटील यांनी उपरोधिक सल्ला दिला आहे.
बैलगाडा शर्यती करणाऱ्यांना एक आवाहन करावेसे वाटते. एक चांगल्या प्रकारे बैलगाडा शर्यती सुरु व्हाव्यात यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले. राज्यात बैलगाडा शर्यतीवर बंदी होती. इतक्या प्रयत्नांती बैलगाडा शर्यती सुरु झाल्या. बळीराजा असलेल्या शेतकऱ्यांकरीता एक विरंगळा बैलगाडा शर्यती सुरु केलेल्या आहेत. त्याला असे स्वरुप येऊ नये. बैलगाडा शर्यतीमुळे मारामाऱ्या हाेत असतील, मुडदे पडत असतील तर त्या न झालेल्या बऱ्या. अशा गोष्टी टाळण्याकरीता बैलगाडा समितीेन कठेार पाऊल उचलले पाहिजे. अन्यथा याचे परिणाम भयंकर होणार आहेत अशी शक्यता मनसे आमदार राजू पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
दोन दिवसात 40 विकास कामांचे भूमीपूजन
गेल्या दोन दिवसांपासून कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात भूमीपूजनाचे कार्यक्रम सुरु आहेत. त्यामध्ये ठाणे जिल्हा परिषद, नवी मुंबई महापालिका, ठाणे महापालिका आणि कल्याण डोंबिवली महापालिका अशा चार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध लेखाशीर्षाखाली विकास कामे मंजूर करण्यात आली आहे. जवळपास 26 कोटी 50 लाख रुपये खर्चाची कामे मंजूर झाली आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या कामांचे भूमीपूजन सुरु केले आहे. आत्तापर्यंत 40 पेक्षा जास्त विकास कामांचे भूमीपूजन झाले असल्याची माहिती मनसे आमदार राजू पाटील यांनी दिली आहे.