Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Purandar Airport : विमानतळ भूसंपादनबाबतच्या हरकतींवर ‘या’ तारखेपासून होणार सुनावणी

पुरंदर विमानतळासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनाबाबत सात गावांमधील शेतकऱ्यांनी सुमारे २ हजारांहून अधिक हरकती घेतल्या आहेत. या हरकतींवर सोमवारपासून (दि. ९ जून) सुनावणी घेण्यात येणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 06, 2025 | 11:55 AM
पुरंदरच्या भूसंपादनबाबतच्या हरकतींवर 'या' तारखेपासून होणार सुनावणी

पुरंदरच्या भूसंपादनबाबतच्या हरकतींवर 'या' तारखेपासून होणार सुनावणी

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुरंदर विमानतळासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनाबाबत सात गावांमधील शेतकऱ्यांनी सुमारे २ हजारांहून अधिक हरकती घेतल्या आहेत. या हरकतींवर सोमवारपासून (दि. ९ जून) सुनावणी घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली. या विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव या सात गावांमधून सुमारे २ हजार ६७३ हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने या गावांतील शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर विमानतळासाठी जागा आरक्षित करण्यात आली असून, त्यावर शिक्के मारण्यात आले आहेत. त्यामुळे या जमिनीची आता खरेदी विक्री होऊ शकणार नाही. त्यानुसार भूसंपादनासाठी ३२ (२) च्या नोटीस शेतकऱ्यांना देण्यात आल्या होत्या. या नोटिसीनंतर हरकती नोंदविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने २९ मेपर्यंत मुदत देण्यात आली होती. शेतकऱ्यांनी त्यावर २ हजार ५२ हरकती नोंदविल्या. त्याची सुनावणी आता सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहे. भूसंपादनासाठी तीन अधिकारी नियुक्त करण्यात आले असून हेच अधिकारी ही सुनावणी घेतील.

भूसंपादन, तसेच जमिनीचा मोबदला ठरविण्यासाठी या जमिनीची मोजणी आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने तीन मे रोजी यासाठी ड्रोन सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, गावकऱ्यांनी आंदोलन करीत त्याला जोरदार विरोध केला. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ५ मे रोजी बैठक घेऊन सर्वेक्षण थांबविण्याची सूचना केली. भूसंपादनासाठी त्या जागेचे सर्वेक्षण आणि मोजणी करण्याची आवश्यकता आहे. ते होत नसल्याने भूसंपादन रखडण्याची शक्यता आहे.

Web Title: Objections to purandar airport land acquisition to be heard from monday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2025 | 11:55 AM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Cmomaharasahtra
  • pune news
  • Purandar Airport
  • Purandar airport project

संबंधित बातम्या

Pune News : अवकाळी पावसाचा पुणे जिल्ह्याला तडाखा; १२ तालुक्यांतील १०५ गावे बाधित, दोघांचा मृत्यू
1

Pune News : अवकाळी पावसाचा पुणे जिल्ह्याला तडाखा; १२ तालुक्यांतील १०५ गावे बाधित, दोघांचा मृत्यू

Pune Rain News : पुण्यातील रस्त्यांची अवकाळी पावसात झाली नदी; उपमहापौर परशुराम वाडेकर उतरले रस्त्यावर
2

Pune Rain News : पुण्यातील रस्त्यांची अवकाळी पावसात झाली नदी; उपमहापौर परशुराम वाडेकर उतरले रस्त्यावर

एमएनजीएलचे कनेक्शन तात्काळ उपलब्ध करुन द्या, मनुष्यबळाची आवश्यकता असल्यास…; चंद्रकांत पाटलांचे अधिकाऱ्यांना निर्देश
3

एमएनजीएलचे कनेक्शन तात्काळ उपलब्ध करुन द्या, मनुष्यबळाची आवश्यकता असल्यास…; चंद्रकांत पाटलांचे अधिकाऱ्यांना निर्देश

अवकाळी पावसामुळे आंबेगाव तालुक्यातील शेतकरी हवालदिल; दिलीप वळसे पाटलांनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना
4

अवकाळी पावसामुळे आंबेगाव तालुक्यातील शेतकरी हवालदिल; दिलीप वळसे पाटलांनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.