धाराशिव: राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात शिवप्रेमींसह सर्व सामान्य जनतेतही संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा निेषेध करण्यासाठी आज महाविकासा आघाडीच्या वतीने मुंबईत जोडे मारो आंदोलनही करण्यात आले. तत्पूर्वी या प्रकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील माफी मागत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पण एका चूक झाकण्याचा प्रयत्न केला असता दुसरी चूक समोर येते,असही काहीसे महायुतीबाबत घडताना दिसत आहे.
ठाकरे गटाचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी महायुतीच्या कारभाराचे धिंडवडे काढणारा एक नवा प्रताप समोर आणला आहे. राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा कोसळला तो पुतळा उभारण्यासाठी 2 कोटी 40 लाखांचा खर्च करण्यात आला होता, अशी माहिती आहे.
हेदेखील वाचा: मुंबईमधील ‘या’ मार्केटमध्ये मिळते गौरी गणपतीच्या सजावटीचे सुंदर सामान,
पण नेमका एवढाच खर्च पुतळ्याचे अनावण करण्यासाठी येणाऱ्या पंतप्रधानांसाठी हॅलिपॅड उभारण्यासाठी करण्यात आल्याचा दावा ओमराजे यांनी केला आहे. म्हणजेच ज्या दिवशी पंतप्रधान मोदी मालवणमध्ये पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी येणार होते. त्यादिवशी मालवणमध्ये त्यांच्या हॅलीपॅडसाठी तितकाच खर्च करण्यात आल्याचा आरोप केला आहे. हॅलीपॅड बनवण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदा आणि तारखांमध्येही साधर्म्य असल्याचे सांगत त्यांनी महायुतीच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Informative News
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २.४० कोटींचा आणि पुतळा अनावरण कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी तात्पुरतं हेलिपॅड उभारण्याचा खर्च आहे २.०२ कोटी… वारेSS व्वाSS सरकार! घरापेक्षा दरवाजे-खिडक्या महाग असाच या सरकारचा दळभद्री कार्यक्रम म्हणावा लागेल.
७८ लाख, ४४… pic.twitter.com/btBfsXQ5G2
— Omprakash Rajenimbalkar (@OmRajenimbalkr) August 31, 2024
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एक ट्विट करत, महायुतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच, महायुती सरकारचा कारभार म्हणजे घरापेक्षा दारे-खिडक्या महाग असा दळभद्री कार्यक्रम म्हणावा लागेल, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 2.40 कोटींचा आणि पुतळा अनावरण कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी तात्पुरतं हेलिपॅड उभारण्याचा खर्च आहे 2.02 कोटी. वारेSS व्वाSS सरकार! घरापेक्षा दरवाजे-खिडक्या महाग असाच या सरकारचा दळभद्री कार्यक्रम म्हणावा लागेल. 78 लाख 44 लाख अणि 79 लाख असा खर्च तीन तात्पुरते हेलिपॅड उभारण्यासाठी राज्य सरकारने केला.
हेदेखील वाचा: व्हॅनचालकाचे विद्यार्थिनीला अश्लील इशारे; मुलीने भावाला फोन करून सांगताच…
सर्वांत आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे टेंडर डिसेंबर 2023 मध्ये निघालं आणि वर्क ऑर्डर मात्र दोन महिने आधीच सप्टेंबर 2023 मध्ये देण्यात आल्या. याचाच अर्थ गाव वसण्याआधीच लुटेरे हजर होते. तात्पुरतं हेलिपॅड उभारण्यासाठी एवढा खर्च येतो का ? आणि दलाली खाण्यासाठी एवढ्या किमतीचं टेंडर काढलं जातं का ? यावर संशोधन होणं गरजेचं आहे. राज्य सरकारने यावर उत्तर द्यावं ! ” असे ट्विट करत ओमराजे निंबाळकर यांनी महायुती सरकारच्या गैरकारभारांचे वाभाडे काढले आहेत.
तसेच, कोट्यवधी रुपये खर्च करूनही महाराजांचा पुतळा कोसळला, पण तितकाच खर्च पंतप्रधानांचे हॅलिकॉप्टर उतरवण्याच्या व्यवस्थेवर खर्च करण्यात आला होता. याकडे ओमराजेंनी लक्ष वेधले आहे.
हेदेखील वाचा: TCIL मध्ये नर्सिंग, फार्मासिस्ट तसेच विविध पदांसाठी भरती सुरु; ‘या’ तारखेपर्यंत करता