फोटो सौजन्य - Social media
टेलिकम्युनिकेशन कंसल्टंट इंडीया लिमिटेडने देशामध्ये भरतीची प्रक्रियेला सुरुवात केली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये अनेक पदांचा विचार केला जाणार आहे. या भरतीच्या माध्यमातून देशामध्ये रोजगाराची निर्मिती होत आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून अनेक नोकरीच्या शोषित असणाऱ्या उमेदवारांना रोजगार मिळणार आहे. तसेच टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात काम करू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरती प्रकियेमध्ये सहभाग घेऊ इच्छित असणाऱ्या उमेदवारांना २ सप्टेंबरपासून अर्ज करता येणार आहे. TCIL ने विविध पदांच्या भरतीसाठी उमेदवारांची नियुक्ती करण्याचे योजिले आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी TCIL च्या अधिकारीक संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरावा आणि आपली अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. उमेदवारांना TCIL च्या tcil.net.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. त्याचबरोबर येथेच भरती प्रक्रियेसंबंधित संपूर्ण माहिती मिळेल.
हे देखील वाचा : पुण्यात आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन ! युवकांना परदेशात रोजगार संधी प्राप्त होणार
TCIL ने इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याची मुभा २ सप्टेंबरपासून दिली असून सप्टेंबरच्या १३ तारखेपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. त्यामुळे वेळेमध्येच अर्ज करावे अन्यथा संधी गमवाल असे TCIL चे उमेदवारांना सांगणे आहे. या भरती प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवण्याची उमेदवर काही अटी शर्तींना पात्र असणे गरजेचे आहे. या अटी शर्ती TCIL ने भरती होऊ पाहणाऱ्या उमेदवारांसाठी जाहीर केले आहे. या भरती प्रक्रियेमध्ये वय आणि शिक्षणाससंदर्भात अटी शर्ती आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये कंपनीतील विविध पदांच्या रिक्त जागचा विचार केला जाणार असल्याने अगदी १० वी उत्तीर्ण पासून ते उच्च पदवीधर असणारे उमेदवारही या प्रक्रियेत सहभाग नोंदवू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवाराची 10वी/12वी/ ITI/ B.Sc/ B.Pharm/ PG पदवी- डिप्लोमा होणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर वयोमर्यादेनुसार उमेदवाराचे वय २७ वर्षे / ३० वर्षे / ३२ वर्षे असणे गरजेचे आहे. लक्षात असुद्या कि विविध पदांसाठी वयोमर्यादा वेगवेगळी आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत काही प्रमाणात सूट दिली जाईल. वयोमर्यादा तसेच शिक्षण अटीसंबंधित सखोल माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी TCIL ने जारी केलेल्या अधिसूचनेचा आढावा घ्यावा.
हे देखील वाचा :‘या’ नोकरींसाठी कॉलेज डिग्री असणे गरजेचे नाही; होते अफाट कमाई
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी TCIL च्या tcil.net.in या अधिकृत संकेतस्थळावर जावे. तेथे स्वतःला रजिस्टर करून घ्यावे. यानंतर आवश्यक ती माहिती भरून फॉर्म सबमिट करावे. यादरम्यान अर्ज शुल्क आकारला जाईल त्याचे भुगतान करावे. भरलेल्या फॉर्मला डाउनलोड करून भविष्यातील गरजेसाठी त्याची एखादी प्रत स्वतःकडे ठेवावी. महत्वाचे म्हणजे या प्रक्रियेदरम्यान उमेदवारांकडून अर्ज शुल्क आकारण्यात येणार आहे. जनरल प्रवर्गातील उमेदवारांना २००० रुपये अर्ज शुल्काची रक्कम म्हणून भरावी लागणार आहे. तर एससी, एसटी, ईडब्ल्यूएस तसेच पीडब्ल्यूडी प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. एकंदरीत, एससी, एसटी, ईडब्ल्यूएस तसेच पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया निशुल्क असणार आहे.