File Photo : Crime
अमरावती : धावण्याची स्पर्धा आटोपून घरी जाणाऱ्या विद्यार्थिनीला व्हॅन चालकाने अश्लील इशारे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दत्तापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भगतसिंग चौकात शुक्रवारी (दि. 30) दुपारी घडली. याप्रकरणात पोलिसांनी आरोपी चालक योगेश नावाच्या तरुणाला अटक केली आहे.
हेदेखील वाचा : धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; 8 वर्षांपासून सुरु होता प्रकार अन् नंतर…
धामणगाव रेल्वे येथे राहणारी 15 वर्षीय मुलगी दहावीत शिकत असून, ती शुक्रवारी धावण्याची स्पर्धा संपल्यानंतर भगतसिंग चौकात बसची वाट पाहत उभी होती. त्यावेळी तेथे उपस्थित असणारा व्हॅन चालक योगेश हा मुलीला म्हणाला की, मॅडम, माझ्या ऑटोमध्ये बसा. त्यावेळी विद्यार्थिनीने मला ऑटोमध्ये बसायचे नाही. त्यावेळी योगेशने विद्यार्थिनीचा पाठलाग करून, तुला काय अडचण आहे, असे म्हणत अश्लील इशारे केले. हा प्रकार पाहून विद्यार्थीनी चांगलीच घाबरली होती. तिने तत्काळ तिच्या भावाला फोन करून, घटनास्थळी बोलावले.
दरम्यान, या घटनेची तक्रार मुलीने दत्तापूर पोलिसांत नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी योगेशविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला.
भावाने मारहाण केल्याची चालकाची तक्रार
याच प्रकरणी चालक योगेशला या मुलीच्या भावाने मारहाण केल्याची तक्रार दत्तापूर पोलिस ठाण्यात दिली. यात म्हटले की, एक मुलगी ऑटोची प्रतिक्षा करत होती. त्यावेळी तिला गाडीत बस असे म्हटले. परंतु, तिने भावाला फोन करून बोलाविले. त्यानंतर दोन जणांनी मारहाण केल्याचा आरोप व्हॅनचालक योगेश याने केला आहे.
गुन्हेगारी घटनांमध्ये होतीये सातत्याने वाढ
राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या घटना तर घडत आहेत. याशिवाय, महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ होत असल्याचे म्हटले जात आहे. असे असताना आता व्हॅनचालकाने विद्यार्थिनीला अश्लील इशारे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
हेदेखील वाचा : लिव्ह-ईन रिलेशनच्या कारणातून तरुणाला बेदम मारहाण; जबड्याचे हाड फ्रॉक्चर