सजावटीच्या सामान खरेदीसाठी मुंबईमधील 'या' मार्केटना नक्की भेट द्या
ऑगस्ट महिना संपल्यानंतर गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागते. संपूर्ण मुंबई, पुणे, कोकणसह इतर राज्यांमध्ये बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे. बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिल्यामुळे मुंबईच्या मार्केटमध्ये सामान खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले आहे. मुंबईमध्ये मानाच्या आणि मोठ्या गणपतींच्या आगमन सोहळ्याला सुरुवात झाली असून मुंबईमध्ये एक वेळच उत्साह निर्माण झाला आहे. गणपती बाप्पाच्या येण्याची चाहूल लागल्यानंतर सगळीकडे आनंद आणि उत्साह असतो. गणपती बाप्पा सोबत गौरीचे सुद्धा आगमन होते.
गणपती आणि गौरीच्या आगमन सोहळ्यासाठी सगळीकडे जोरदार तयारी केली आहे. मुंबईच्या मार्केटमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. बाजारात सजावटीचे वेगवेगळे साहित्य उपलब्ध झाल्याने नागरिक दुकानांमध्ये मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना शेवट्याच्या टप्प्यातील सामान खरेदी नागरिकांकडून केली जात आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला गणपती बाप्पाच्या खरेदीसाठी मुंबईमधील कोणती मार्केट प्रसिद्ध आहेत, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
हे देखील वाचा: Ganesh Chaturthi 2024: गणेश चतुर्थीला गणपती बसवणार आहात; तर ‘या’ नियमांचे अवश्य पालन करा
गणपती बाप्पाच्या खरेदीसाठी मुंबईमधील कीर्तीकर मार्केट सगळीकडे प्रसिद्ध आहे. या मार्केटमध्ये सजावटीच्या सामानापासून ते गणपती बाप्पाच्या हार आणि फुलांपर्यंतचे सगळे साहित्य मिळते. १०० रुपयांपासून ते अगदी पाच हजार रुपये किंमतीच्या वस्तू सुद्धा या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. हे मार्केट दादर स्थाकानावरून अगदी जवळ असल्यामुळे तुम्ही इथे कधीही जाऊ शकता. गणपती बाप्पा आणि गौराईच्या डेकोरेशनचे सर्व साहित्य कीर्तिकर मार्केटमध्ये उपलब्ध आहे.
मुंबईमधील सगळ्यात जुने आणि सर्व प्रकारच्या वस्तू मिळणारे क्रॉफर्ड मार्केट तुम्हाला माहीतच असेल. मुंबईमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या मार्केटबद्दल एक वेगळेच आकर्षण आहे. या मार्केटमध्ये सर्व प्रकारच्या वस्तू उपलब्ध असतात. वर्षाच्या बाराही महिने सुरु असलेले मार्केट फिरण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या राज्यांमधून येत असतात. क्रॉफर्ड मार्केटमध्ये महिलांच्या दागिन्यांपासून तते सजावटीच्या सामानापर्यंत प्रत्येक साहित्य या मार्केटमध्ये मिळते.
सजावटीच्या सामान खरेदीसाठी मुंबईमधील ‘या’ मार्केटना नक्की भेट द्या
दादरच्या रानडे रोडवर असलेले मार्केट फिरण्यासाठी रोज मोठी गर्दी असते. सणासुदीच्या दिवसांमध्ये इथे लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. दादर स्थानकात उतरून बाहेर आल्यानंतर या मार्केटची सुरुवात होते. रानडे रोड मार्केटमध्ये पूजेच्या फुलांपासून कपडे, दागिने, सजावटीचे साहित्य इत्यादी अनेक वस्तू मिळतात. या सर्व वस्तू कमीत कमी साहित्यामध्ये चांगल्या दर्जाच्या मिळत असल्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी असते.
हे देखील वाचा: गणेशोत्सवात गणपती बाप्पाची कोणत्या रंगाची मूर्ती घरी आणावी? जाणून घ्या
विलेपार्ले मार्केटमध्ये सजावटीचे साहित्य चांगल्या आणि स्वस्त दरात मिळते. विलेपार्ले स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर या मार्केटची सुरुवात होते. छोट्याशा जागेत असलेले हे मार्केट फिरण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करतात. रेडी थीम डेकोरेशन, फुलांचे साहित्य इत्यादी अनेक गोष्टी या मार्केटमध्ये उपलब्ध असल्यामुळे तुम्हीसुद्धा विलेपार्ले मार्केटला नक्की भेट देऊ शकता.