Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! गणेशोत्सव-नवरात्रात डोक्यावरच्या छताचे भाडे घेणार नाही पालिका, नो टेन्शन मंडळांसाठी मंडप उभारणी आता सोपी

ठाणे महानगरपालिकेने गणपती आणि नवरात्र मित्र मंडळांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मंडप उभारणीबाबत खासदार नरेश म्हस्के यांच्या पुढाकाराने हा नवे नियम लागू करण्यात येणार आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 15, 2025 | 06:14 PM
मोठी बातमी! गणेशोत्सव-नवरात्रात डोक्यावरच्या छताचे भाडे घेणार नाही पालिका, नो टेन्शन मंडळांसाठी मंडप उभारणी आता सोपी
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/ स्नेहा जाधव,काकडे : महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला मोठी परंपरा आहे तर नवरात्रोत्सवाला देखील धार्मिक महत्व आहे. गणेशोत्सवाच्या माध्यामातून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे जनजागृतीचे मोठे कार्य करत असतात. राष्ट्रभक्तीची भावना जागृत करणाऱ्या या सार्वजनिक मंडळांना रस्ते किंवा पदपथावर गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात तात्पुरता मंडप उभारण्याची परवानगी द्यावी तसेच त्यासाठी कोणतेही मंडप भाडे आकारले जाऊ नये, अशी विनंती ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे महापालिका प्रशासनाकडे केली होती. खासदार नरेश म्हस्के यांच्या विनंतीला मान देत ठामपा प्रशासनाने दोन्ही सणांना मंडळांकडून भाडे न आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

दरवर्षी असंख्य गणेश मंडळे आणि नवरात्रोत्सव मंडळे आपापल्या परिसरात उत्साहात, भक्तिभावाने आणि प्रेमाने हा सोहळा साजरा करतात. ही मंडळे फक्त उत्सवापुरती मर्यादित नसतात, तर वर्षभर विविध लोकोपयोगी उपक्रम, समाजसेवा, रक्तदान शिबिरे, पर्यावरण जनजागृती आणि नागरिकांसाठी उपयुक्त कार्यक्रम आयोजित करत असतात. या मंडळांचा सहभाग महापालिकेच्या विविध उपक्रमांमध्येही मोलाचा असतो. ही मंडळे ज्या मर्यादित निधीतून इतका मोठा उत्सव साजरा करतात, त्यामागे प्रचंड मेहनत, वेळ आणि नागरिकांच्या वर्गणीच्या रूपात मिळालेला थोडासा निधी असतो. मात्र त्या निधीतूनच मंडप भाडे, सजावट, सांस्कृतिक कार्यक्रम, सुरक्षा आणि इतर खर्च भागवणं अनेकदा कठीण जातं. म्हणूनच ज्या मंडळांनी वर्षभर समाजासाठी योगदान दिले, त्यांना महापालिकेनेही आर्थिक दिलासा द्यावा यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे महापालिका आयुक्तांना गणेशोत्सव व नवरात्रोत्सव २०२५ साठी ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व सार्वजनिक मंडळांना मंडप भाडे पूर्णपणे माफ करण्याची विनंती करणारे पत्र लिहिले होते.

खासदार नरेश म्हस्के यांच्या पत्राचा गांभीर्याने विचार करून, आयुक्तांच्या परवानगीने ठाणे महापालिकेने आता गणेशोत्सव व नवरात्रोत्सव २०२५ साठी ठाण्यातील सर्व सार्वजनिक मंडळांना रस्ते किंवा पदपथावर तात्पुरता मंडप उभारण्याची परवानगी आणि त्यासाठी कोणतेही मंडप भाडे आकारले जाणार नसल्याचा असा निर्णय घेतला आहे. तसे लेखी आदेशही दिले आहेत.

या निर्णयामुळे मंडळांना अधिक उत्साहाने सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम राबवता येणार आहेत. पैशाचा ताण कमी झाल्यामुळे ते अधिकाधिक लोकांपर्यंत चांगले उपक्रम पोहोचवू शकतील. हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल ठाणे महापालिकेचे व आयुक्तांचे खासदार नरेश म्हस्के यांनी आभार मानले आहेत.

Web Title: On the initiative of naresh mhaske thane municipality will no longer charge rent for the construction of pavilions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2025 | 06:14 PM

Topics:  

  • muncipal corporation
  • Thane news

संबंधित बातम्या

कोरोना काळातील कर्मचाऱ्यांना बाप्पा पावणार! ठाणे पालिकेच्या सेवेत कायम करण्याबाबत हालचाली सुरु
1

कोरोना काळातील कर्मचाऱ्यांना बाप्पा पावणार! ठाणे पालिकेच्या सेवेत कायम करण्याबाबत हालचाली सुरु

Thane News : पंचशील निवास इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळला
2

Thane News : पंचशील निवास इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळला

Thane News : गडकरी रंगायतनातील फलकांवरून आनंद परांजपे यांचा संताप
3

Thane News : गडकरी रंगायतनातील फलकांवरून आनंद परांजपे यांचा संताप

Thane News : “भीक नको न्याय हवा !” राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलनाचा चौथा दिवस
4

Thane News : “भीक नको न्याय हवा !” राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलनाचा चौथा दिवस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.