अयोध्या : अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळा (Ram Temple inauguration) अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. देशभरामध्ये या सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे. सत्ताधारी पक्षाने (BJP) मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी विविध राज्यामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. अयोध्यानगरी (Ayodhya) देखील राम मंदिर उद्घाटनासाठी सजली आहे. आता मात्र फक्त अयोध्या नाही तर संपूर्ण देशातील रेल्वे स्थानके (Railway stations) सजवली जाणार आहेत.
On the occasion of pranpratishtha of Ram Temple in Ayodhya, the railway stations across the country will will have decorative lighting and flowers: Sources — ANI (@ANI) January 17, 2024
देशभरातील राम भक्त या मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी आतुर झाले आहे. प्रत्येक जण त्यांच्या परीने या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करत आहेत. देशभरात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान, देशातील सर्व रेल्वे स्थानकांची सजावट केली जाणार आहे. देशभरातील सर्व रेल्वे स्टेशन्स फुलांची आरास अन् रोषणाईनं उजळून निघणार आहे. याबाबत एएनआयनं ट्वीट करत वृत्त दिलं आहे.






