Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महापौर रवि लांडगे यांच्या कार्यकाळाला एक महिना; शहरातील प्रश्नांवर उपाययोजनांचा निर्धार

शहरातील भटक्या श्वानांच्या प्रश्नावरही श्वान संगोपन केंद्र उभारणे, विशेष वाहने उपलब्ध करणे आणि स्वयंसेवी संस्थांशी समन्वय साधून धोरण तयार करण्याचा विचार सुरू आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 07, 2026 | 02:58 PM
महापौर रवि लांडगे यांच्या कार्यकाळाला एक महिना; शहरातील प्रश्नांवर उपाययोजनांचा निर्धार

महापौर रवि लांडगे यांच्या कार्यकाळाला एक महिना; शहरातील प्रश्नांवर उपाययोजनांचा निर्धार

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर रवि लांडगे यांच्या कार्यकाळाला एक महिना पूर्ण झाला असून, शहरातील पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि कचरा व्यवस्थापनाशी संबंधित समस्यांवर प्राधान्याने उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

६ फेब्रुवारी २०२६ रोजी महापौरपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर गेल्या महिनाभरात शहरातील विविध भागांना भेट देत नागरिकांच्या समस्या आणि नगर सदस्यांनी मांडलेल्या मुद्द्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या भेटीदरम्यान शहरातील प्रमुख प्रश्नांची यादी तयार करून त्यावर टप्प्याटप्प्याने काम सुरू करण्यात आले आहे.

पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असल्याने चिखली व आकुर्डी येथील जलशुद्धीकरण केंद्रांना भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला आहे. सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. शहरातील भटक्या श्वानांच्या प्रश्नावरही श्वान संगोपन केंद्र उभारणे, विशेष वाहने उपलब्ध करणे आणि स्वयंसेवी संस्थांशी समन्वय साधून धोरण तयार करण्याचा विचार सुरू आहे.

हेदेखील वाचा : PCMC Water Supply: पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागणार कधी? १६७ एमएलडी अतिरिक्त पाण्यासाठी शहरवासीयांची प्रतीक्षा कायम

क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी अण्णासाहेब मगर स्टेडियमचे आधुनिकीकरण करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम उभारण्याचा मानस आहे. तसेच पर्यावरण संवर्धनासाठी शहरातील उद्यानांमध्ये ‘ऑक्सिजन सेंटर’ उभारण्याचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे महापौर रवि लांडगे यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवडकरांची पाण्याची चिंता कायम

गेल्या सव्वासहा वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठ्याचा सामना करणाऱ्या पिंपरी-चिंचवडकरांची प्रतीक्षा संपण्याचे नाव घेत नाहीये. भामा आसखेड पाणी योजनेचे काम वारंवार मुदतवाढ देऊनही पूर्ण न केल्याने, अखेर महापालिका प्रशासनाने निष्क्रिय ठेकेदाराला घरचा रस्ता दाखवला आहे. प्रकल्पाचे उर्वरित ३० टक्के काम पूर्ण करण्यासाठी आता नवीन निविदा प्रक्रिया राबवली जात असून, यामुळे शहराला अतिरिक्त १६७ एमएलडी पाणी मिळण्यास पुन्हा विलंब होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: One month into mayor ravi landage term completed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 02:58 PM

Topics:  

  • Pimpri Chinchwad
  • Ravi Landge

संबंधित बातम्या

मुख्य लेखाधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा, महापौरांचे प्रशासनाला आदेश; नेमकं प्रकरण काय?
1

मुख्य लेखाधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा, महापौरांचे प्रशासनाला आदेश; नेमकं प्रकरण काय?

Smart City News: पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीचा गाशा गुंडाळला! १३७८ कोटींचा चुराडा करून कंपनी कायमची बंद
2

Smart City News: पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीचा गाशा गुंडाळला! १३७८ कोटींचा चुराडा करून कंपनी कायमची बंद

पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत जाहिरात फलकांवर ‘हातोडा’; महापालिकेची धडक कारवाई
3

पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत जाहिरात फलकांवर ‘हातोडा’; महापालिकेची धडक कारवाई

PCMC News: नवी सांगवी आणि पिंपळे गुरवमधील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा
4

PCMC News: नवी सांगवी आणि पिंपळे गुरवमधील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.