Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कांद्यावरून पुन्हा वांदा! केंद्र सरकारकडून कांदा निर्यातीवर बंदी; शेतकरी वर्गात नाराजी ?

गेल्या काही महिन्यापासून शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग अगोदरच निराश आहे. त्यातच आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना निराश करणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली असल्याचे समोर आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 09, 2023 | 11:09 AM
कांद्यावरून पुन्हा वांदा! केंद्र सरकारकडून कांदा निर्यातीवर बंदी; शेतकरी वर्गात नाराजी ?
Follow Us
Follow Us:

रांजणी : गेल्या काही महिन्यापासून शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग अगोदरच निराश आहे. त्यातच आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना निराश करणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली असल्याचे समोर आले आहे. स्थानिक बाजारपेठांमधील कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. 31 मार्च 2024 सालापर्यंत कांदा निर्यात बंदी राहणार असल्याचे परिपत्रक सरकारकडून नुकतेच काढण्यात आले आहे.

दरम्यान कांदा निर्यात बंदीचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. सरकारच्या या निर्णयानंतर शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून. ठीक ठिकाणी आंदोलने देखील आता सुरू करण्यात आली आहेत. केंद्र शासनाकडून 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र शासनाने निर्यात बंदीचा घेतलेला निर्णय हा योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेतले जाते. गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी पिकवलेला कांदा अद्यापही बराखीमध्ये साठवून ठेवला आहे. हा कांदा बाजारात नेण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला खरा मात्र निर्यात बंदीमुळे कांद्याला चांगला बाजार भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग अगोदरच निराश असल्याचे चित्र दिसून येते. त्यातच केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्याने शेतकरी आणि कांदा व्यापाऱ्यांनी तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर पुणे लासलगाव मनमाड नांदगाव शहर बहुतांश बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव बंद आहेत.

जिल्ह्यात स्थानिक बाजारात स्थानिक विक्रेते 70 ते 80 रुपये किलो दराने कांद्याची विक्री करत आहेत. मात्र आता निर्यात बंदी केल्याने दरात घसरण होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने ऑक्टोबर मध्ये ग्राहकांना दिलासा देण्यासाठी किरकोळ बाजारात पंचवीस रुपये प्रति किलो या सवलतीच्या दराने कांदा देण्याचा निर्णय घेतला होता. एकीकडे अवकाळी आणि गारपिटीने बळीराजा होरपळला आहे. शेतकऱ्याला हिवाळी अधिवेशनादरम्यान आर्थिक मदत होईल आणि दिलासा मिळेल अशी आशा होती. मात्र केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाने पुन्हा नाराजी पसरली आहे. अनेक ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलने देखील सुरू केले आहेत.

निर्यात बंदीची सूचना किमान आठ दिवस अगोदर देणे गरजेचे होते परंतु केंद्र शासनाने घेतलेला निर्णय शेतकरी आणि व्यापारी यांच्या मुळावर असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे. जोपर्यंत कांद्यावरील निर्यात बंदी उठवली जात नाही तोपर्यंत आर्थिक व्यवहार सुरळीत होत नाही. एकूणच भारताचा कांदा हा विविध देशांमध्ये निर्यात केला जातो. भारतीय कांद्याला परदेशात मोठी मागणी देखील आहे. बांगलादेश, मलेशिया आणि संयुक्त अरब अमिरातीत हे तीन प्रमुख कांद्याचे आयातदार देश आहेत. परंतु अचानक सरकारने कांदा निर्यात बंदीचे हत्यार उपसले आहे याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे

Web Title: Onion export ban by central government resentment in the farming class nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2023 | 11:09 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • maharashtra
  • navarshtra

संबंधित बातम्या

Ratnagiri Heavy Rain : खेड शहरावर पुन्हा पुराचे सावट; जगबुडी नदी ७.७० मीटरवर, बाजारपेठेत पाणी शिरले
1

Ratnagiri Heavy Rain : खेड शहरावर पुन्हा पुराचे सावट; जगबुडी नदी ७.७० मीटरवर, बाजारपेठेत पाणी शिरले

Satara Heavy Rain : १६ गावांचा संपर्क तुटला, दरडी, पूल खचले,नेटवर्क बंद…; साताऱ्यात मुसळधार पावसाचा कहर
2

Satara Heavy Rain : १६ गावांचा संपर्क तुटला, दरडी, पूल खचले,नेटवर्क बंद…; साताऱ्यात मुसळधार पावसाचा कहर

Konkan Rain : रत्नागिरीत दरड दुर्घटनांची मालिका सुरूच; दहिवलीत चार घरे ढिगाऱ्याखाली, दोघांचा दुर्दैवी मृत्यू
3

Konkan Rain : रत्नागिरीत दरड दुर्घटनांची मालिका सुरूच; दहिवलीत चार घरे ढिगाऱ्याखाली, दोघांचा दुर्दैवी मृत्यू

लोणावळा, मावळ अन् खेडमध्ये ‘पीडीआरएफ’ची धाडसी मोहीम, शेकडो नागरिकांचे प्राण वाचवले; शोधकार्य सुरूच
4

लोणावळा, मावळ अन् खेडमध्ये ‘पीडीआरएफ’ची धाडसी मोहीम, शेकडो नागरिकांचे प्राण वाचवले; शोधकार्य सुरूच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.